×

उदयपूर हत्या: हरियाणा रॅलीत मुस्लिम समुदायाविरोधात ‘प्रक्षोभक’ घोषणा

Published On :    2 Jul 2022
साझा करें:

ब्राम्हणवादी संघटना बजरंग दल-विहिंप कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल



गुडगाव : राजस्थानच्या उदयपूर शहरात एका शिंप्याच्या हत्येच्या निषेधार्थ हरियाणाच्या गुडगाव शहरात काढण्यात आलेल्या रॅलीमध्ये मुस्लिम समुदायाविरुद्ध प्रक्षोभक घोषणा दिल्याच्या आरोपावरून ब्राम्हणवादी संघटना विश्‍व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुडगाव पोलिसांनी शुक्रवारी ही माहिती दिली.


ही रॅली २९ जून रोजी आयोजित करण्यात आली होती आणि सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओच्या आधारे शहर पोलिस ठाण्यात एफआयआर नोंदवण्यात आला होता.पोलिस उपायुक्त (पश्चिम) दीपक शरण म्हणाले, सोशल मीडिया आणि काही यूट्यूब चॅनेलवर शेअर केलेल्या व्हिडिओंच्या आधारे एफआयआर नोंदवण्यात आला आहे. आम्ही वस्तुस्थितीची पडताळणी करत असून कायद्यानुसार कारवाई केली जाईल. 


इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, २९ जून  रोजी सायंकाळी ५ वाजता गुडगावमधील नेहरू पार्कमध्ये किमान ८० लोक जमले आणि हरीश बेकरी चौकात पांगण्यापूर्वी सदर बाजारच्या दिशेने कूच केले, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांना हटवण्यात आले. कार्यकर्त्यांनी ‘इस्लामिक जिहाद टेररिझम’चा पुतळाही जाळला.रॅलीच्या कथित व्हिडिओमध्ये, कार्यकर्ते जामा मशिदीजवळ मुस्लिम समुदायाविरोधात प्रक्षोभक घोषणा देताना ऐकू येतात. 


आंदोलकांनी ‘देश के गद्दारों, गोली मारो *****’च्या घोषणाही दिल्या. आंदोलनादरम्यान कायदा व सुव्यवस्था राखली जाईल, या अटीवर पोलिसांनी रॅलीला परवानगी दिली होती. सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओच्या आधारे शहर पोलिस ठाण्यात एफआयआर नोंदवण्यात आला, त्यानंतर पोलिसांनी या घटनेची स्वतःहून दखल घेतली.

संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
प्रबुद्ध भारताला हिंदुस्थान बनवू नका
बिल्किस बानो प्रकरणातील दोषी ब्राह्मण, त्यांच्यावर चां
११ दोषींची सुटका करणार्‍या समितीत भाजपचे ४ सदस्य
सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे मोठ्या प्रमाणावर खाजगीक
विधानसभा असो वा लोकसभा, निवडणूक आयोगच भाजपाला जिंकून देत
लखीमपूर खेरी येथे संयुक्त किसान मोर्चाचे धरणे आंदोलन
२०२१-२२ मध्ये भारताने चीनकडून केली ७ लाख कोटींची आयात
बामसेफचे उद्या मराठवाडा विभागीय संमेलन
तामिळनाडू-महाराष्ट्रासह १३ राज्यांनी ५ हजार कोटींची थक
राष्ट्रभक्तीचा व्यापार म्हणजे बेशरमपणाचा कळस
ऍलोपॅथी आणि कोविड-१९ च्या उपचारांबाबत जनतेची दिशाभूल कर
भाजपा नेते शहानवाज हुसैन यांच्यावर बलात्काराचा गुन्हा
भारतातील अनुसूचित जाती आणि चीनमधील उइगुर गुलामीच्या वि
भारतात २७ कोटी लोक दारिद्रयरेषेखाली व २२ टक्के लोक गरिबी
डोनाल्ड ट्रम्प यांच्या २०२० मधील ३६ तासांच्या भारत दौर्
जम्मू-काश्मीरमध्ये निवडणूक जिंकण्यासाठी भाजपाकडून ईव्
राज्यांची धोरणे काय असावीत हे ठरवणारे तुम्ही कोण?
पीएम २.५ प्रदूषणामुळे २०१९ मध्ये दिल्लीत प्रति एक लाख लो
सैन्य भरतीसाठी ‘अग्नि’ परीक्षा देताना तरुण मैदानात कोस
राज्यात ४५ दिवसांत १३७ शेतकर्‍यांची आत्महत्या
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper