×

मैदानातील माणूस माझ्यासोबत असल्याने तुम्हांला रस्त्यावर निपटून टाकू

Published On :    1 Jul 2022
साझा करें:

बामसेफचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांचा आरएसएसला इशारा



कच्छ-गांधीधाम: ईव्हीएमच्या माध्यमातून मतांची चोरी करून तुम्ही विधानसभा व लोकसभेत बहुमत प्राप्त करता, मात्र मैदानात असलेला माणूस माझ्यासोबत आहे. त्यामुळे तुम्हांला रस्त्यावर निपटून टाकू असा इशारा बामसेफचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांनी आरएसएसला दिला आहे. गुजरात गांधीधाम कच्छ येथील कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी विविध मुद्दे उपस्थित करत नरेंद्र मोदी यांच्यावरही तोफ डागली.


ते म्हणाले, सार्‍या देशभरात एक विशाल आंदोलन उभे राहिले आहे. मी १८ वषार्र्पासून आजपर्यंत आंदोलन उभे करण्यासाठी काम करत आहोत. संघटनेला विशाल बनवण्यासाठी लगातार प्रयत्न केले. आज ३१ राज्यात,५६७ जिल्ह्यात, ४ हजारांपेक्षा जास्त तहसील, २२ हजारापेक्षा जास्त ब्लॉकमध्ये, १.५ लाखपेक्षा जास्त गावामध्ये हे आंदोलन पसरले आहे. एवढे मोठे आंदोलन व विशाल संघटन उभे राहिले आहे. काही लोकांना असे वाटू शकते की, असे काही नाही. त्यामुळे मी पुराव्याच्या आधारे काही बाबी सांगत आहे. 


कारण तुम्हांला सत्य समजून यायला हवे. १३ पॉईंट रोस्टरविरोधात व २०० पॉईंट रोस्टर लागू करण्यासाठी ५ मार्च, २०१९ ला आम्ही भारत बंद केला होता. मोठ्या प्रमाणात भारत बंद झाला. त्यामुळे संसदेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी संविधान संशोधन करून १३ पॉईंट रोस्टर समाप्त केले आणि २०० पॉईंट रोस्टर लागू केले. कुठल्या आंदोलनामुळे देशाच्या प्रधानमंत्र्याने संविधान संशोधन करून निर्णय बदलला असे एकही उदाहरण भारताच्या इतिहासात नाही. १९६४ मध्ये जमीन वाटपासंदर्भात दादासाहेब गायकवाड यांनी ४ लाख लोकांना घेऊन जेलभरो आंदोलन केले होते. आतापर्यंत जमीन वाटप झालेले नाही. आम्ही तुलना करून सांगत आहोत की काय केले?


दुसरी बाब २९ जानेवारी,२०२० ला सीएएच्या विरोधात भारत बंद केला. हा भारत बंद ५ मार्चपेक्षा मोठ्या प्रमाणात झाला. कारण ५ मार्चच्या आंदोलनात मुस्लिम लोक सहभागी नव्हते.  मात्र २९ जानेवारीच्या आंदोलनात मुस्लिम लोक मोठ्या प्रमाणात सहभागी होते. कारण ५ लाख मुस्लिम लोक आसाम एनआरसीच्या यादीत होते. सीएए कायदा संसदेत पास झाला तर देशभरात करोडो मुस्लिमांना काढले जाऊ शकते अशी भीती मुस्लिमांमध्ये निर्माण झाली, म्हणून ते भारत बंद आंदोलनात सहभागी झाले. 


दुसरा भारत बंद मोठ्या प्रमाणात झाल्याने आरएसएस, विश्‍व हिंदू परिषद, बजरंग दलाचे लोक चिंतेत आले. आम्ही ५० वर्षे मेहनत करून एससी, एसटी, ओबीसीला मुस्लिमांविरोधात लढवले व भिडवले. दंगलीत त्यांचा वापर केला. मात्र वामन मेश्राम यांनी एससी,एसटी,ओबीसीसोबत मुस्लिमांना या आंदोलनात जोडले. ५० वर्षाच्या आमच्या मेहनतीवर पाणी फेरले. त्याचा परिणाम असा झाला की, सीएएचा कायदा अद्यापि ठप्प पडलेला आहे. अजूनपर्यंत लागू केलेला नाही. त्याचबरोबर पुन्हा सीएए लागू करू नका, नाहीतर असा इशारा आम्ही मोदींना दिला. पुन्हा लागू केल्यास भारत बंद करू असा इशाराही मेश्राम यांनी दिला.


तिसरी बाब २५ मे २०२२ ला ओबीसीच्या जातीनिहाय जनगणनेसाठी भारत बंद केला. प्रधानमंत्री ओबीसी आहे तर ओबीसींची जातीनिहाय जनगणना करेल आम्ही विचार केला होता. यावरून मोदींकडे निर्णय घेण्याचा अधिकार नाही. निर्णय घेण्याचा अधिकार आरएसएसकडे आहे. चेहरा दाखवण्यासाठी मोदींना प्रधानमंत्री बनवला आहे. अशा लोकांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, नॉमिनेटेड प्राईम मिनिस्टर. नामधारी प्रधानमंत्री...! एक असतो नामधारी आणि दुसरा असतो कामधारी. हे काम करणारे नाहीत. नॉमिनेडेट प्राईम मिनिस्टर नॉमिनेटेड बाय आरएसएस ब्राम्हीन्स. 


डॉ.बाबासाहेब आंबेडकर या बाबीलाच घेऊन गांधीजींशी लढत व झगडत होते. आम्हाला नामधारी प्रतिनिधीत्व नकोत तर खरे प्रतिनिधीत्व हवेत. हा सामाजिक विषय होता. देशात लोकशाही आली तर खरे आणि सच्चे प्रतिनिधीत्व असावेत, त्याचे अधिकार मिळावेत अथवा ना मिळावेत अशी ती लढाई होती. नरेंद्र मोदी आरएसएसचे नॉमिनेटेड रिप्रेझेन्टेटिव्ह आहेत. त्यामुळे ते ओबीसी असूनही ओबीसींच्या जातीनिहाय जनगणेच्या निर्णय घेत नाहीत. या उदाहरणावरू ही बात सिद्ध होते. आम्ही या मुद्यावर भारत बंद केला. 


१९ लाख ४८ हजारांपैकी आता केवळ १ हजार ६ लोकांना भारतीय नागरिक नसल्याचे गृहमंत्री अमित शहा यांनी लिहून दिले आहे. संघटनशक्तीच्या आधारावर बाबी होतात. ओबीसींच्या जातीनिहाय जनगणनेचा निर्णय घेतला तर मोदींचे प्रधानमंत्री पद जाऊ शकते अशी परिस्थिती आहे. म्हणून आम्ही लढण्याचा निर्धार केला आहे. दुसर्‍यांदा ओबीसींच्या जातीनिहाय जनगणेसाठी भारत बंद केला जाऊ शकतो. २०२४ पर्यंत भारत बंद केला जाऊ शकतो. नरेंद्र मोदी २०२४ मध्ये भाजपाकडून निवडून येऊ नये यासाठी प्रयत्न केले जातील. सारी ताकद पणाला लावू असाही इशारा मेश्राम यांनी दिला.


नुपूर शर्माने मोहम्म्द पैगंबर यांच्याविषयी केलेल्या टीप्पणीमुळे देशाच्या विभाजनाचा धोका आहे. स्वातंत्र्याच्या आंदोलनातही धार्मिक वाद निर्माण करून नेहरू आणि गांधी यांच्यामुळे १४ ऑगस्ट १९४७ ला भारताचे विभाजन झाले व पाकिस्तानची निर्मिती झाली. मुस्लिमांना कॉर्नर करण्याचा आरएसएस व भाजपा, ब्राम्हणाद्वारे प्रयत्न करण्यात आले तर दुसर्‍यांदा देशाचे तुकडे होतील. 


१४ ऑगस्टला देशाचे तुकडे झाले, त्यावेळी आमच्या आंदोलनाची ताकद एवढी नव्हती की त्याला रोखले गेले असते. आता भारताचे एक इंचही विभाजन ब्राम्हणांच्या माध्यमातून करू दिले जाणार नाही. आमच्याकडे तेवढी ताकद आता आहे त्याला रोखण्यासाठी. सार्‍या ताकदीनिशी त्याला रोखले जाईल. भारताचे तुकडे करणार्‍यांविरोधात २५ जूनला भारत बंद करण्यात आला होता. 


संघटन शक्तीच्या बळावर जगात मोठे परिवर्तन होते. भारत बंद करण्यापर्यंत ही संघटन शक्ती आम्ही वाढवली, त्यामुळे आरएसएसची चिंता वाढली. तर काही राज्यांचे मुख्यमंत्री व नेते आमचे आहेत. केंद्रातील सरकार आमचे, संसदेत ३०३ लोकांचा बहुमत आमचा. तरीही भारत बंद वामन मेश्राम यांच्याकडून होत आहे, आम्हांला समजून येत नाही अशी आरएसएसची चिंता आहे. 


एवढे सारे आमचे आहे तरीही वामन मेश्राम भारत बंद करतात हे कसे काय? अरे बाबा, तुम्ही ईव्हीएममध्ये चोरी करून बहुमत घेऊ शकता. ज्यांच्या मतांची चोरी केली तो माणूस तर माझ्याकडे आहे ना. तुम्ही विधानसभा व लोकसभेत ईव्हीएमच्या माध्यमातून बहुमत घेत आहात. याचा पुरावा असा आहे, तुमच्यासारख्या लोकांना आम्ही रस्त्यावर निपटून टाकू असा इशारा मेश्राम यांनी दिला.

संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
प्रबुद्ध भारताला हिंदुस्थान बनवू नका
बिल्किस बानो प्रकरणातील दोषी ब्राह्मण, त्यांच्यावर चां
११ दोषींची सुटका करणार्‍या समितीत भाजपचे ४ सदस्य
सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे मोठ्या प्रमाणावर खाजगीक
विधानसभा असो वा लोकसभा, निवडणूक आयोगच भाजपाला जिंकून देत
लखीमपूर खेरी येथे संयुक्त किसान मोर्चाचे धरणे आंदोलन
२०२१-२२ मध्ये भारताने चीनकडून केली ७ लाख कोटींची आयात
बामसेफचे उद्या मराठवाडा विभागीय संमेलन
तामिळनाडू-महाराष्ट्रासह १३ राज्यांनी ५ हजार कोटींची थक
राष्ट्रभक्तीचा व्यापार म्हणजे बेशरमपणाचा कळस
ऍलोपॅथी आणि कोविड-१९ च्या उपचारांबाबत जनतेची दिशाभूल कर
भाजपा नेते शहानवाज हुसैन यांच्यावर बलात्काराचा गुन्हा
भारतातील अनुसूचित जाती आणि चीनमधील उइगुर गुलामीच्या वि
भारतात २७ कोटी लोक दारिद्रयरेषेखाली व २२ टक्के लोक गरिबी
डोनाल्ड ट्रम्प यांच्या २०२० मधील ३६ तासांच्या भारत दौर्
जम्मू-काश्मीरमध्ये निवडणूक जिंकण्यासाठी भाजपाकडून ईव्
राज्यांची धोरणे काय असावीत हे ठरवणारे तुम्ही कोण?
पीएम २.५ प्रदूषणामुळे २०१९ मध्ये दिल्लीत प्रति एक लाख लो
सैन्य भरतीसाठी ‘अग्नि’ परीक्षा देताना तरुण मैदानात कोस
राज्यात ४५ दिवसांत १३७ शेतकर्‍यांची आत्महत्या
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper