×

महागाईने होरपळलेल्या जनतेला केंद्र सरकार अजून एक धक्का देणार

Published On :    24 May 2022
साझा करें:

१४३ वस्तूंवरील जीएसटी वाढवण्याचे संकेत, जनतेचे मोडणार कंबरडे



नवी दिल्ली: गेल्या काही दिवसापासून महागाईने होरपळलेल्या जनतेला अजून एक केंद्र सरकार धक्का देण्याच्या तयारीत आहे. पुढील महिन्यात होणार्‍या जीएसटी कौन्सिलच्या बैठकीमध्ये केंद्र सरकार सुमारे १४३ वस्तूंवरील जीएसटीच्या दरात वाढ करण्याची शक्यता आहे. त्याबाबत सरकारने राज्यांकडून अभिप्राय आणि सूचना मागवल्या आहेत. या वाढीमुळे केंद्राच्या महसूलामध्ये वाढ होईल. तसेच राज्य सरकारांना नुकसान भरपाईसाठी केंद्र सरकारवर अवलंबून राहावे लागणार नाही.


सरकार या १४३ वस्तूंपैकी ९२ वस्तूंना १८ टक्के स्लॅबमधून हटवून २८ टक्क्यांच्या स्लॅबमध्ये आणण्याच्या प्रयत्नात आहेत. ही प्रस्तावित वाढ ही केंद्र सरकारने २०१९ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी आणि २०१७ आणि २०१८ मध्ये केलेल्या कपातीला संपुष्टात आणेल.


मिळालेल्या माहितीनुसार ज्या वस्तूंवरील जीएसटीच्या दरामध्ये वाढ करण्यात येणार आहे त्यामध्ये पापड, गुळ, पॉवर बँक, घड्याळे, सुटकेस, हँडबॅग, परफ्युम, कलर टीव्ही सेट (३२ इंचांपेक्षा कमी), चॉकलेट, च्युइंगम, अक्रोड, कस्टर्ड पावडर, नॉन अल्कोहोलिक बेवरेज, सिरेमिक सिंक वॉश बेसिन, काळे चष्मे, चष्म्यासाठीचे फ्रेम आणि चामड्याचे अपेरल आणि कपड्यांच्या सामानाचा समावेश आहे.


पापड आणि गुळासारख्या वस्तूंवरील जीएसटीचा दर हा शुन्यावरून वाढवून ५ टक्के केला जाऊ शकतो. चामड्याचे अपेरल आणि सहाय्यक उपकरणे, मनगटी घड्याळ, रेझर, परफ्युम, प्री-शेव, आफ्टर शेव्हची तयारी, डेंटल फ्लॉस, चॉकलेट, कोको पावडर, नॉन अल्कोहोलिक बेवरेज, प्लायउड, विजेची उपकरणे आदी तयार करण्याच्या वस्तूंवरील जीएसटी हा १८ टक्क्यांवरून २८ टक्क्यांपर्यंत वाढवण्याचे प्रस्तावित आहे.

संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
व्यक्ती केंद्री शिक्षणाची समाज विरोधी सिद्धता
महाराष्ट्रातील मराठा ब्राह्मणाच्या छायेत का गेला?
राज्यपाल-कोर्टाने बंडखोरांना बळ दिले
धक्कादायक! मुंबईत दररोज चार मुलींचे अपहरण
ओबीसींच्या भावी पिढीचे नुकसान टाळण्यासाठी
वेगळ्या ‘सरना’ धर्मासासाठी ५ राज्यातील आदिवासींची दिल्
एकनाथ शिंदे आता शिवसेनेचे नेते नाहीत, उद्धव ठाकरेंचं पत्
१५ ऑक्टोबर २०२२ रोजी नागपुरातील आरएसएस मुख्यालयावर एक ल
झाकीया जाफरी यांची याचिका फेटाळल्यानंतर ३०० वकीलांनी व
उदयपूर हत्या: हरियाणा रॅलीत मुस्लिम समुदायाविरोधात ‘प्
नवीन कामगार कायद्यांविरोधात ‘आरएमबीकेएस’चे राज्यभरात
प्रबोधनकार ठाकरेंचा वैचारिक वारसा आणि महाराष्ट्राचे रा
आता दहावीनंतर पुढे काय? पाल्यांचा कल ओळखून करिअर क्षेत्र
मुख्यमंत्रीपद देण्यामागे शिवसेना संपवण्यासाठी बंदुकी
एकनाथ शिंदेंना काय म्हणून सरकार स्थापन करण्यासाठी बोला
मैदानातील माणूस माझ्यासोबत असल्याने तुम्हांला रस्त्या
उपराष्ट्रपती पदाची निवडणूक ६ ऑगस्ट रोजी
आसाममध्ये पूर आणि भूस्खलनामुळे १५१ जणांनी गमावला जीव
मोहम्मद पैगंबरांवरील तुमच्या वक्तव्याने देशाची बदनामी,
खासदारांच्या रेल्वेतील फुकट प्रवासासाठी केंद्राकडून ५
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper