×

गरीब व प्रामाणिकतेचा आव आणणार्‍या केजरीवाल सरकारची जाहिरातींवर ४९० कोटींची उधळपट्टी

Published On :    24 Jan 2022
साझा करें:

बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात



नवी दिल्ली: आम्ही प्रामाणिक व गरीब आहोत असा आव आणणार्‍या दिल्लीतील अरविंद केजरीवाल सरकारने कोरोना काळात जाहिरातींवर ४९० कोटींची उधळपट्टी केली आहे. त्यामुळे केजरीवाल सरकारही बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात असल्याचे समोर आला आहे. न्यूजलॉंड्रीच्या माध्यमातून आरटीआय अंतर्गत विचारलेल्या प्रश्‍नाला उत्तर देताना ही माहिती समोर आली आहे.


पूर्वी निवडणूक लढवण्याची ही परंपरागत पद्धत होती. आता मोठ्या प्रमणात पैसे खर्च करतात, मोठ्या जाहिराती दिल्या जातात. मात्र आम आदमी पक्ष तसा नाही. आमच्याकडे पैसे नाहीत. आम्ही एक प्रामाणिक पक्ष आहोत, असे वक्तव्य दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे आहे. केजरीवाल यांनी १२ जानेवारी रोजी पंजाबमधील मोहाली येथे निवडणूक प्रचारादरम्यान हा दावा केला होता. 


परंतु त्यांचा दावा फोल ठरला असून दिल्लीत कोरोना वाढला होता केजरीवाल सरकारने जाहिरातींवर दररोज सुमारे एक कोटी रुपये खर्च केले आहेत. न्यूजलॉंड्रीच्या माध्यमातून आरटीआय अंतर्गत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना, दिल्ली सरकारने म्हटले आहे की मार्च २०२० ते जुलै २०२१ या कालावधीत सरकारने जाहिरात आणि जाहिरातीवर एकूण ४९० कोटी रुपये खर्च केले आहेत.


केजरीवाल यांच्या वक्तव्यावर कॉंग्रेस नेते श्रीनिवास बीवी यांनी लिहिले आहे की, कोरोना आपत्तीच्या सर्वात मोठ्या टप्प्यात, १७ महिन्यांत, दिल्ली सरकारने केजरीवालांचा चेहरा दाखवणार्‍या जाहिरातींवर ४९० कोटी रुपये खर्च केले, जर तेच पैसे आरोग्याच्या पायाभूत सुविधांवर खर्च केले असते, मग आजही किती घरे उजळून निघाली असती माहीत नाही का? ही बाब लाजिरवाणी असल्याचा टोमणा मारला आहे.

संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
महागाईने होरपळलेल्या जनतेला केंद्र सरकार अजून एक धक्का
निवडणुका तूर्त ओबीसींच्या राजकीय आरक्षणाविनाच!
राष्ट्रीय पिछडा वर्ग मोर्चाचा उद्या भारत बंद, बामसेफसहि
५ वर्षांत सव्वा कोटी महिलांनी गमावला रोजगार
ज्ञानवापी मशीदीत शिवलींग नसून तो कारंजा आहे
केतकी चितळे पुन्हा वादात
राज्यातील ४५५ गावांना ४०१ टँकरने पाणीपुरवठा
२५ मे भारत बंदला रोखण्यासाठी ब्राम्हणवाद्यांकडून हनुमा
कोरोना काळात जगात दर ३० तासांनी एका अब्जाधीशाचा उदय, तर द
बिहारमध्ये जातनिहाय जनगणनेबाबत २७ मे रोजी सर्वपक्षीय ब
अनधिकृत शाळांचे फुटले पेव
ज्ञानवापीमध्ये शिवलिंग नाही, मुस्लिमांना केले जातेय टा
यूएपीएची तरतूद देशद्रोहापेक्षा धोकादायक
मध्य प्रदेशात २९ आणि राजस्थानमध्ये दररोज १४ मुले हरवतात
टुकार अभिनेत्री केतकी चितळेच्या जामीन अर्जावर २६ तारखे
ज्ञानव्यापी मशीद ब्राम्हणांचे नसून बुद्धीस्ट स्थळ
ज्ञानवापी मस्जिद आणि शिवलिंग या प्रकरणात 1991चा चा प्रार्थ
ज्ञानवापी मशीद प्रकरणावर वाराणसी न्यायालयाचा आदेश बेका
कर्नाटकच्या भाजप सरकारने शिक्षणात शालेय मंडळांमधील दहा
कोरोना आजाराच्या प्रारंभानंतर ज्येष्ठ नागरिकांना तिकी
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper