×

पीडितेबरोबर बलात्कार्‍याला लग्नाचा सल्ला देणार्‍या सरन्यायाधीश बोबडे यांच्याविरोधात महिला शक्तीचा आक्रोश

Published On :    3 Mar 2021
साझा करें:

अनेक महिलांनी खुल्या पत्रातून राजीनामा देण्याची केली मागणी



नवी दिल्ली:  अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरणातील खटल्याच्या वेळी सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी आरोपीला पीडित मुलीशी लग्न करून तुरूंगातून सुटू शकतोस असा सल्ला दिला होता. बोबडे यांच्या  या सूचनेवर महिला शक्तींनी तीव्र आक्षेप नोंदवत आक्रोश केला आहे.  सरन्यायाधीश बोबडे यांच्या सूचनेविरोधात तीन हजाराहून अधिक महिलांनी खुल्या पत्रावर सही केली आहे. बोबडे यांनी त्यांच्या वक्तव्याबद्दल दिलगिरी व्यक्त करावी आणि पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी या पत्राद्वारे केली आहे.


१ मार्च २०२१ रोजी मोहित सुभाष चव्हाण विरुद्ध महाराष्ट्र शासन आणि इतरांच्या सुनावणीदरम्यान, भारताच्या सर्व स्त्रीवादी चळवळी आणि जागरूक नागरिकांच्या वतीने आम्ही तुमच्या वक्तव्याचा जाहीर निषेध करत आहोत.


सत्र न्यायालयाने मोहित सुभाष चव्हाण यांना दिलेल्या जामीन आदेशाचा मुंबई हायकोर्टाने निषेध करत असे म्हटले आहे की, न्यायाधीशांचे हे मत अशा गंभीर प्रकरणांमध्ये त्यांच्यातील संवेदनशीलता नसल्याचे स्पष्टपणे प्रतिबिंबित करते. पीडितेला न्याय मिळावा म्हणून ते पूर्णपणे भीतिदायक आणि सर्व न्यायाचे दरवाजे बंद करण्यासारखे होते.


बलात्कार करणार्‍या व्यक्तीशी तडजोड करणारे तडजोड सुचविणारे पोलिस अधिकारी असोत की न्यायाधीश असोत - सर्व महिलांच्या पुरुषप्रधान विचारांशी भारतातील महिलांना संघर्ष करावा लागतो. मुख्य न्यायाधीश म्हणून तुमची उपस्थिती देशातील प्रत्येक स्त्रीसाठी धोकादायक आहे. सर्वोच्च न्यायालयाने सर्व न्यायालयांना हा संदेश दिला आहे की न्याय हा या देशातील महिलांचा घटनात्मक हक्क नाही. लग्नाचा सल्ला देणे म्हणजे बलात्काराचा परवाना आहे आणि यामुळे बलात्काराचे सर्व अपराध धुवून काढले जाऊ शकतात. आपण या दिलेल्या लज्जास्पद निणयामुळे देशातील सर्व महिलांची क्षमा मागितली पाहिजे. आपण एका क्षणाचाही विलंब न लावता आपण सरन्यायाधीशपदाचा राजीनामा द्यावा अशी अशी मागणी करण्यात आली आहे.

संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
चार बँकांच्या खासगीकरणाची लगबग
अनिल देशमुख यांच्या सचिवाची कसून चौकशी
महाराष्ट्रात भाजपचा मुख्यमंत्री नाही याची किंमत महाराष
शेतकर्‍यांच्या जीवावर ‘नाफेड’कमावते नफा
राफेल डीलमध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी १० लाख य
लॉकडाऊनच्या भीतीने कांद्याचे दर कोसळले
ज्या राज्यात निवडणुका आहेत तेथे नाही फक्त महाराष्ट्रात
शेतकरी आंदोलनाला कव्हरेज देणार्‍या व डॉ.आंबेडकर जयंतील
कृषी कायद्यांविरोधात शेतकर्‍यांचे आंदोलन पेटले असताना
झिरो बॅलन्स खात्यातून पाच वर्षात सर्व्हिस चार्जच्या ना
उद्योगपती, एमडी ते सामाजिक क्रांतीचे जनक
क्रांतीसूर्य जोतिबा
आधुनिक भारताचे प्रमुख शिल्पकार राष्ट्रपिता महात्मा ज्य
परिवर्तन पेरणारे महात्मा
आधुनिक भारताचे सामाजिक क्रांतिकारक- राष्ट्रपिता जोतीरा
पर्यायी साहित्याचे प्रणेते
महात्मा फुले यांना अभिप्रेत असणारा शिक्षक
महिलांचे मार्गदाते
आज सर्वात जास्त शंका निवडणूक आयोगाच्या प्रामाणिकपणावर
महात्मा फुलेंच्या साहित्याचे नवे खंड आता हिंदी, इंग्रजी
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper