×

शिक्षणाचे ब्राम्हणीकरण जोरात सुरू

Published On :    3 Mar 2021
साझा करें:

आता मदरशांमध्येही गीता, रामायण, वेद शिकवून मुलांच्या मेंदूवर ब्राम्हणी विचारांचा पगडा टाकणार



नवी दिल्ली:  नव्या शिक्षण नीतीच्या नावाखाली देशात शिक्षणाचे ब्राम्हणीकरण जोरात सुरू झाले असून आता मदरशांमध्येही गीता, रामायण, वेद शिकवून मुलांच्या मेंदूवर ब्राम्हणी विचारांचा पगडा टाकण्याचा निर्णय आरएसएस या ब्राम्हणी संघटनेच्या केंद्रातील भाजपा सरकारने घेतला आहे. त्यामुळे एकप्रकारे ब्राम्हणवादाला प्रोत्साहन देण्यासाठीच अशाप्रकारे पाऊल उचलण्यात आले आहे.


शिक्षण मंत्रालयाअंतर्गत येणार्‍या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कुलिंग प्राचिन भारतीय ज्ञान आणि पंरपराप्रकरणी १०० मदरशांमध्ये नवा अभ्यासक्रम सुरु केला जात आहे. हा अभ्यासक्रम नव्या शिक्षण नीतिचा एक भाग असल्याचे सरकारकडून सांगण्यात आले आहे. एनआयओएसच्या ३,५ आणि ८ वर्गासाठी बेसिक कोर्सची सुरुवात करण्यात येईल. एनआयओएसच्या प्राचिन भारताच्या अभ्यासात जवळपास १५ कोर्स आहेत. यात वेद, योग, विज्ञान, संस्कृत भाषा, रामायण, गीतासह अन्य कोर्सचा समावेश आहेत. हे सर्व कोर्स ३,५ आणि ८ वी वर्गाच्या प्रारंभिक शिक्षणाच्या समान आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, एनआयओएसच्या चेअरमन सरोज शर्मा यांनी म्हटलं की, आम्ही हा कार्यक्रम १०० मदरशांमध्ये सुरु करत आहोत. भविष्यात आम्ही यात ५०० मदरशांचा समावेश करणार आहोत.


केंद्रीय मंत्री रमेश पोखरियाल यांनी मंगळवार नोएडातील एनआयओएसच्या केंद्रीय मुख्यालयात स्टडी मटेरियल जारी केला होता. त्यांनी म्हटलं होतं की, भारत प्राचिन भाषा, विज्ञान, कला, संस्कृती आणि परंपरेचा खजिना आहे. आता देशाच्या प्राचिन पंरपरा पुनर्जीवित करुन ज्ञानाच्या क्षेत्रात सुपरपॉवर बनण्यास आपण तयार आहोत. आम्ही या कोर्सचा लाभ मदरसा आणि जगात असणार्‍या भारतीय समाजापर्यंत पोहोचवू.


एनआयओएस दोन राष्ट्रीय बोर्डपैकी एक आहे, जो प्रायमरी, सेकंडरी आणि सीनियर सेकंडरी स्तरावरील कोर्स ओपन आणि डिस्टेंस एज्यूकेशनच्या माध्यमातून करतात. याच्या योगाच्या कोर्समध्ये पतंजली, कृतासूत्र, योगसूत्र, व्यायाम, सूर्य नमस्कार, आसन प्राणायाम, तणाव दूर करण्यासाठी व्यायाम, स्मरण शक्ति वाढवणारा व्यायाम यांचा समावेश होतो.  विज्ञान कोर्समध्ये पाणी, हवा, वेद, उत्पत्तीचे सूत्र, पृथ्वी आणि नैसर्गिक संसाधनाच्या संबंधी विषय आहेत. एआयओएसच्या असिस्टेंड डायरेक्टर शोएब रजा खान यांचं म्हणणं आहे की, हा अभ्यासक्रम सर्वांसाठी उपलब्ध आहे. ओपन एज्यूकेशन अंतर्गत विद्यार्थी याची निवड करण्यासाठी स्वतंत्र असतील. हे अनिवार्य नाही.


दरम्यान केंद सरकारने वेद, रामायण, संस्कृत भाषा, गीता, पतंजलीवर अभ्यासक्रम देणार आहे. हे सर्व पाहिले तर ब्राम्हणी धर्मग्रंथ आहेत. स्वत:च्या फायद्यासाठी त्यांनी तयार केले आहेत. अशा प्रकारचा अभ्यासक्रम शिकवून मुलांचा मेंदू ब्राम्हणी विचारधारेत त्यांना गहाण ठेवायचा आहे. बाल मनावर अशा प्रकारे शिक्षण बिंबवले तर ते ब्राम्हणी व्यवस्था आणखी मजबूत करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. त्यामुळे केवळ मदरशांमधील विद्यार्थ्यांनीच नव्हे तर बहुजन विद्यार्थ्यांनी ब्राम्हणी हातचलाखीपासून सावध असायला हवे अशा प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.

संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
चार बँकांच्या खासगीकरणाची लगबग
अनिल देशमुख यांच्या सचिवाची कसून चौकशी
महाराष्ट्रात भाजपचा मुख्यमंत्री नाही याची किंमत महाराष
शेतकर्‍यांच्या जीवावर ‘नाफेड’कमावते नफा
राफेल डीलमध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी १० लाख य
लॉकडाऊनच्या भीतीने कांद्याचे दर कोसळले
ज्या राज्यात निवडणुका आहेत तेथे नाही फक्त महाराष्ट्रात
शेतकरी आंदोलनाला कव्हरेज देणार्‍या व डॉ.आंबेडकर जयंतील
कृषी कायद्यांविरोधात शेतकर्‍यांचे आंदोलन पेटले असताना
झिरो बॅलन्स खात्यातून पाच वर्षात सर्व्हिस चार्जच्या ना
उद्योगपती, एमडी ते सामाजिक क्रांतीचे जनक
क्रांतीसूर्य जोतिबा
आधुनिक भारताचे प्रमुख शिल्पकार राष्ट्रपिता महात्मा ज्य
परिवर्तन पेरणारे महात्मा
आधुनिक भारताचे सामाजिक क्रांतिकारक- राष्ट्रपिता जोतीरा
पर्यायी साहित्याचे प्रणेते
महात्मा फुले यांना अभिप्रेत असणारा शिक्षक
महिलांचे मार्गदाते
आज सर्वात जास्त शंका निवडणूक आयोगाच्या प्रामाणिकपणावर
महात्मा फुलेंच्या साहित्याचे नवे खंड आता हिंदी, इंग्रजी
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper