×

शेतकरी संघटना आता भाजपाला रडकुंडीला आणणार

Published On :    3 Mar 2021
साझा करें:

निवडणूक लागलेल्या राज्यात जाऊन भाजपाला हरविण्यासाठी प्रचार करणार



नवी दिल्ली:  विविध राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपाला रडकुंडी आणण्याची रणनीती शेतकरी संघटनांनी आखली आहे. निवडणूक लागलेल्या राज्यातील मतदारसंघात प्रत्यक्षात जाऊन भाजपाला हरविण्यासाठी प्रचार करण्याचा निर्णय शेतकरी संघटनांनी घेतला आहे.


आम्ही कुठल्या पक्षासाठी मते मागणार नाही. फक्त भाजपा उमेदवारांना पाडा, त्यांना कृषी कायद्यांबाबत शिक्षा द्या, असे आवाहन मतदारांना करणार असल्याचे संयुक्त किसान मोर्चाच्या नेत्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. पुढील काही दिवसात पश्‍चिम बंगाल, तामिळनाडू, पुद्दुचेरी, केरळ आणि आसाममध्ये विधानसभेची निवडणूक होत आहे. शेतकरी संघटनांनी या निवडणुकीच्या प्रचारात उतरून भाजपाचा चक्काचूर करण्याचा निर्धार केला आहे. संयुक्त किसान मोर्चाच्या नेत्यांनी सिंघू बॉर्डरवर हा निर्धार जाहीर केला. दुसर्‍या कुठल्याही पक्षाचे समर्थन करणार नाही. फक्त भाजपाला पराभूत करण्यासाठी  आवाहन करू, शेतकर्‍यांबद्दल भाजपा सरकारचा दृष्टीकोन कसा आहे याची माहिती देऊ असे राजेवाल यांनी सांगितले.


ईव्हीएमचे काय करणार?

गेली तीन महिने आंदोलन करूनही केंद्रातील भाजपा सरकार शेतकर्‍यांबाबत कुठलाही निर्णय घेत नाही. याचा अर्थ भाजपाला शेतकर्‍यांच्या मतांची गरज नाही. शेतकर्‍यांच्या मताविना भाजपा निवडून येऊ शकते. कारण त्यांच्याकडे ईव्हीएम आहे. या ईव्हीएमचे शेतकरी नेते काय करणार? ईव्हीएमविरोधात आवाज उठवला तरच भाजपाला जाग येईल, त्यामुळे शेतकरी नेत्यांनी ईव्हीएमविरोधात बोलण्याची गरज आहे. नाहीतर हे लोक घोटाळा करून पुन्हा सत्ता ताब्यात घेतीलच, हा त्यांचा काळाकुट्ट इतिहास आहे. 

संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
चार बँकांच्या खासगीकरणाची लगबग
अनिल देशमुख यांच्या सचिवाची कसून चौकशी
महाराष्ट्रात भाजपचा मुख्यमंत्री नाही याची किंमत महाराष
शेतकर्‍यांच्या जीवावर ‘नाफेड’कमावते नफा
राफेल डीलमध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी १० लाख य
लॉकडाऊनच्या भीतीने कांद्याचे दर कोसळले
ज्या राज्यात निवडणुका आहेत तेथे नाही फक्त महाराष्ट्रात
शेतकरी आंदोलनाला कव्हरेज देणार्‍या व डॉ.आंबेडकर जयंतील
कृषी कायद्यांविरोधात शेतकर्‍यांचे आंदोलन पेटले असताना
झिरो बॅलन्स खात्यातून पाच वर्षात सर्व्हिस चार्जच्या ना
उद्योगपती, एमडी ते सामाजिक क्रांतीचे जनक
क्रांतीसूर्य जोतिबा
आधुनिक भारताचे प्रमुख शिल्पकार राष्ट्रपिता महात्मा ज्य
परिवर्तन पेरणारे महात्मा
आधुनिक भारताचे सामाजिक क्रांतिकारक- राष्ट्रपिता जोतीरा
पर्यायी साहित्याचे प्रणेते
महात्मा फुले यांना अभिप्रेत असणारा शिक्षक
महिलांचे मार्गदाते
आज सर्वात जास्त शंका निवडणूक आयोगाच्या प्रामाणिकपणावर
महात्मा फुलेंच्या साहित्याचे नवे खंड आता हिंदी, इंग्रजी
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper