×

शेतकरी आणि कृषी बिलाशी आपला काय संबंध ही धारणा सोडा..!

Published On :    27 Feb 2021
साझा करें:

बहुसंख्य लोकांना वाटते की हे कृषिबिल शेतकर्‍यांसाठी आहे म्हणून त्यांचे ते पाहून घेतील. डॉक्टर, वकील, प्राध्यापक, शिक्षक, सरकारी अधिकारी, कर्मचारी आणि कामगार यांना सुद्धा या शेतकरी व कृषी बिलांचे काही घेणेदेणे नाही असे वाटते. खरचं कृषी बिलाचं मूक समर्थन करणार्‍या सुशिक्षित सुरक्षित नोकरी करणार्‍यांनो हे तुम्हाला माहित आहे का?



भारत हा कृषिप्रधान देश होता. हे फक्त पंजाब- हरयाणा राज्यातील शेतकरी ९२ दिवस झाले तरी चिवट पणे जनआंदोलन करून दाखवून देत आहेत. बाकीच्या राज्यातील शेतकरी भाजपच्या आमदार खासदारांचे वाढदिवस मोठ्या आनंदाने साजरे करतांना दिसतात. बहुसंख्य लोकांना वाटते की हे कृषिबिल शेतकर्‍यांसाठी आहे म्हणून त्यांचे ते पाहून घेतील. डॉक्टर, वकील, प्राध्यापक, शिक्षक, सरकारी अधिकारी, कर्मचारी आणि कामगार यांना सुद्धा या शेतकरी व कृषी बिलांचे काही घेणेदेणे नाही असे वाटते. खरचं कृषी बिलाचं मूक समर्थन करणार्‍या सुशिक्षित सुरक्षित नोकरी करणार्‍यांनो  हे तुम्हाला माहित आहे का?


आपण कृषी बिलाचे वाचन का केले पाहिजे. ते समजून का घेतले पाहिजे. आपण शेतकरी किंवा शेती तज्ञ नसलो तरी देशातील शेती मालाचे कायमस्वरूपी ग्राहक मात्र शंभर टक्के आहोत. हे कधीच विसरू नये. म्हणूनच शेतकरी बिल काय भानगड आहे ती माहिती करून घेतली पाहिजे.


कंपन्यानी पॅकिंगमध्ये दिलेल्या प्रत्येक वस्तूवर एमआरपी सर्व करासह असे लिहलेले असते किंवा स्टँप मारलेला असतो किंवा स्टिकर लावलेलं असते. ते पाहून त्यांची किंमत जे लिहलेली आहे ती द्यावी लागते, भाव करता येत नाही. का असे असते? कारण कंपन्यांना मोफत जमीन दिली जाते, सवलतीच्या दरात वीज पाणी आणि टॅक्स माफ केलेला असतो. उत्पादन किती आणि विक्री किती यांचा इमानदारीने कोणीच हिशोब लिहत नाही. यावर कुठेही कोणतेच नियंत्रण ठेवले जात नाही. मात्र शेतकर्‍यांच्या शेतीतील मालाचे तसे आहे काय? त्याला कोणताच हमी भाव मिळत नाही. सर्व व्यापारी वर्गाच्या मर्जीवर ठरते.


नवीन कृषी बिलात शेतकर्‍याचा माल हमीभाव पेक्षा कमी दरात घेता येणार नाही असे कायद्यात लिहिलले आहे काय?तर नाही हे दर कोण ठरविणार अदानी, अंबानीनी नोकरीवर ठेवलेले तज्ञ अधिकारी. हे तुम्हाला कायमस्वरूपी ग्राहक असणार्‍यांना माहीत आहे का? महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एम.आय.डी.सी) भारतात प्रत्येक राज्यात अशा औद्योगिक विकास संस्था स्थापन करण्यात आल्या होत्या, त्यामुळे स्थानिक लोकांचा किती विकास झाला हा संशोधनाचा विषय आहे. लघु उद्योग जगताला जमिनीचा ताबा मिळाल्यावर वीज, पाणी पुरवठा सवलतीच्या दरात मिळतो,अनेक प्रकारचा कर व जकात माफ असतो. सर्व व्यवस्थित झाले की स्थानिक कामगार परवडत नाही म्हणून पर राज्यातील कामगार आणून ठेवले जातात. ज्या शेतकर्‍यांची जमीन या प्रकल्पात गेली त्यांना काय मिळाले? त्यांची न्यायालयीन लढाई अजूनही सुरू आहे. पनवेल, पेण,उरण,नागोठणे, रोहा, भागाड, कोकणातील प्रकल्पगस्तांची दुसरी पिढी (नारायण नागू पाटील,दि.बा.पाटील,आता राजाराम पाटील) आज ही रस्त्यावर उतरून संघर्ष करीत आहेत. विकास करण्यासाठी शेतकर्‍यांच्या शेतजमिनी घेतल्या प्रकल्प उभे राहिले विकसित कोण झाले? विकास कोणाचा झाला. तेव्हा ही स्थानिक शेतकरी आंदोलने करीत होती आणि उभा महाराष्ट्र राज्यातील माणूस तटस्थ होता. आज शेतकरी प्रकल्पगस्त पुनर्वसन गस्त आंदोलनजीवी झाला आहे.


पंजाब, हरियाणा राज्यातील शेतकर्‍यांच्या शेतजमिनी २०१८ पासून केंद्र सरकारने घेतल्या आणि अदानी ऍग्री कल्चर कंपनीला गोडाऊन बनविण्यासाठी दिल्या,म्हणूनच पंजाब, हरियाणा राज्यातील शेतकरी जीवतोड मेहनत घेऊन आंदोलन करीत आहे. शेतकर्‍यांच्या जमिनीचा ताबा आणि जमिनीवरचे सगळे व्यवहारांचे अधिकार शेतकर्‍यांकडे रहाणार नाहीत ते अदानी ऍग्री कंपनीकडे असतील हे ग्राहक म्हणून तुम्हाला माहीत आहे का?


शेतकर्‍यांनी करार केल्यानंतर खासगी उद्योजकाशिवाय  इतरांना ग्राहकाला माल देता येणार नाही. शेतकरी गावांतील समाजातील लोकांना लग्न, मृत्यू, पूजा सार्वजनिक भंडारा, यासाठी मदत करण्यासाठी नेहमीच पुढे असतो, एकवेळ करार झाला तर तो स्वतःच्या कुटुंबातील व्यक्तीसाठी सुद्धा स्वतःच्या शेतातील माल विना परवानगी वापरू शकणार नाही, हे ग्राहक म्हणून तुम्हाला माहीत आहे का?
भाजपा सरकारचे कृषी बिल देशभरात कुठेही माल विकता येईल असे सांगते, पण ज्या राज्यांनी हे कायदे राबवायला नकार दिलाय त्यांनी माल येऊ न दिल्यास शेतकरी काय करू शकतील? तालुक्यातून जिल्ह्यात जिल्ह्यातून दुसर्‍या जिल्ह्यात गेल्यावर पोलीस, टोलनाके दया दाखवतील काय? जकात घेणार नाहीत पण प्रवेश फ्री प्रत्येक ठिकाणी द्यावीच लागेल. हे कृषिबिल कायद्यात कुठेही लिहिलेलं नाही हे ग्राहक म्हणून तुम्हाला माहीत आहे का?


शेतकर्‍याचा कृषीमाल आतापर्यंत नाशवंत माल साठवणुकीवर मर्यादा होत्या, त्या उठवल्यात आणि आता मोठे गुंतवणूकदार मोठी गोडाऊन्स बनवून हा माल प्रिझर्व करतील आणि चढ्या दराने जनतेला विकू शकतील. हे कोणाला विक्री करतील ग्राहक म्हणून तुम्हालाच ना. हे ग्राहक म्हणून तुम्हाला माहीत आहे का? आजपर्यंत कांदा शेतकर्‍यांनी मुबलक प्रमाणात पिकविला तर त्यांचे भाव पाडले जायाचे, शेतकरी त्यांचा केलेला खर्च निघत नाही म्हणून रागाच्या भरात रस्त्यावर फेकून देत होता आणि थोड्या दिवसांनी कांदा व्यापारी ग्राहकांच्या डोळ्यात पाणी आणत असतो. तेव्हा सरकार व्यापारी वर्गाचे काहीच वाकडे करू शकत नाही. ग्राहक म्हणून तुम्ही व्यापार्‍यांचे काहीच करू शकत नाही. शेतकर्‍यांनी केलेला कोणताही करार रद्द करता येणार नाही. हे शेतकर्‍याला व सरकारला माहिती आहे. परंतु हे तुम्हाला ग्राहकांना माहीत आहे का?
शेतकर्‍याचा शंभर टक्के  मा, पीएमसी विकत घेण्यास बांधील नाही हे तुम्हाला ग्राहक म्हणून माहीत आहे का? शेतकर्‍याला स्वतःच्या मालाची विक्री करण्यासाठी एपीएम सी मार्केट मध्ये जागेचा कुठलाही व्यवहार करता येत नाही. त्यासाठी व्यापारी अडतदार परवाना लागतो. हे तुम्हाला ग्राहक म्हणून माहीत आहे का? भाजपा सरकारने शेतकर्‍यांची जमीन ताब्यात घेऊन अदानी ऍग्री कल्चर कंपनीला दिली म्हणूनच अदानीने कायदा येण्याआधीच मोठं मोठे गोडाऊन टाक्या तयार करून पूर्ण सेटअप रेडी केलाय हे तुम्हाला ग्राहक म्हणून माहीत आहे का?


शेतकरी आंदोलनाला किती ही दिवस होऊ द्या त्यांच्याशी आपला काय संबंध अशी भावना आणि मानसिकता सर्व सामान्य संघटित असंघटित कामगार, कर्मचारी, अधिकारी डॉक्टर,वकील, शिक्षण,प्राध्यापक, पत्रकार, संपादक, साहित्यिक यांची झाली आहे. भविष्यात ग्राहक म्हणून शेतकर्‍यांचा कोणता ही माल यांना खरेदी करण्याची गरज भासणार नाहीच असेच या सर्वांना वाटत असेल तर ते भविष्यात मोठ्या संकटात सापडल्या शिवाय राहणार नाहीत. हे मात्र शंभर टक्के सत्य असेल. हे आजच लिहून ठेवा. शेतकरी आणि कृषिबिलाशी आपला काय संबंध?असे समजून न घेणारे अनेक प्रश्न आज देशात भाजपच्या सरकारने मोदी यांच्या कुशल नेतृत्वाखाली निर्माण करून ठेवले आहेत. बहुसंख्य लोकांविरोधात भांडवलंदाराची ब्राम्हणशाही लोकशाहीचा खून करून हुकूमशाही लादत आहेत. राजस्थान, पंजाब, हरियाणा,  उत्तरप्रदेश, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, जम्मू, मध्यप्रदेश, ओरिसा राज्यातील ठराविक शेतकरी लढत आहेत. त्यांना बदनाम करण्याचे अयशस्वी प्रयत्न केले जात आहेत.


आता विवेकबुद्धी जागृत असणार्‍या सामान्य लोकांनीच ठरवायचे आहे की आपण शेतकरी आंदोलनाला पाठिंबा द्यायचा की येणार्‍या काळात आणखी महागाई झेलत गुलमीकडे वाटचाल करायची? शोषणकारी सर्व यंत्रणा बहुसंख्य मागासवर्गीय वर्गाचेच शोषण करणार आहे. कारण सर्वात मोठा ग्राहक कोण आहे? म्हणूनच शेतकरी आणि कृषिबिलाशी आपला काय संबंध? असा प्रश्न पडत असलेल्या लोकांनी गांभीर्याने विचार करावा. दिल्लीतील शेतकर्‍यांना त्यांच्या आंदोलनाला आपण पाठींबा देत नसाल तर स्थानिक पातळीवर ग्राहक म्हणून शेतकर्‍यांचा माल विकत घेतांना कोणत्याही अन्न,धान्य,कडधान्य सर्व प्रकारच्या डाळी,भाजीपाला यांचे भाव विचारू नये जे मागितले ते चुपचाप देऊन टाकावे. कारण शेतकरी आणि कृषिबिलाशी आपला काय संबंध? तो समजून घ्यावा हीच अपेक्षा आहे.

सागर रामभाऊ तायडे
९९२०४०३८५९

संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
चार बँकांच्या खासगीकरणाची लगबग
अनिल देशमुख यांच्या सचिवाची कसून चौकशी
महाराष्ट्रात भाजपचा मुख्यमंत्री नाही याची किंमत महाराष
शेतकर्‍यांच्या जीवावर ‘नाफेड’कमावते नफा
राफेल डीलमध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी १० लाख य
लॉकडाऊनच्या भीतीने कांद्याचे दर कोसळले
ज्या राज्यात निवडणुका आहेत तेथे नाही फक्त महाराष्ट्रात
शेतकरी आंदोलनाला कव्हरेज देणार्‍या व डॉ.आंबेडकर जयंतील
कृषी कायद्यांविरोधात शेतकर्‍यांचे आंदोलन पेटले असताना
झिरो बॅलन्स खात्यातून पाच वर्षात सर्व्हिस चार्जच्या ना
उद्योगपती, एमडी ते सामाजिक क्रांतीचे जनक
क्रांतीसूर्य जोतिबा
आधुनिक भारताचे प्रमुख शिल्पकार राष्ट्रपिता महात्मा ज्य
परिवर्तन पेरणारे महात्मा
आधुनिक भारताचे सामाजिक क्रांतिकारक- राष्ट्रपिता जोतीरा
पर्यायी साहित्याचे प्रणेते
महात्मा फुले यांना अभिप्रेत असणारा शिक्षक
महिलांचे मार्गदाते
आज सर्वात जास्त शंका निवडणूक आयोगाच्या प्रामाणिकपणावर
महात्मा फुलेंच्या साहित्याचे नवे खंड आता हिंदी, इंग्रजी
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper