×

जातनिहाय जनगणनेवर न्यायालयाची केंद्राला नोटीस

Published On :    27 Feb 2021
साझा करें:

म्हणणे मांडण्यासाठी केली सूचना



नवी दिल्ली: भारतात जनगणनेचे वारे वाहू लागलेले आहेत. यादरम्यान सर्वोच्च न्यायालयात जातनिहाय जनगणनेवर शुक्रवारी सुनावणी झाली. मागासवर्गासाठी जातनिहाय जनगणना करण्याच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला, तसेच राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाला म्हणणे मांडण्यासंदर्भात नोटीस जारी केली आहे. याच मागणीशी संबंधित असलेल्या दुसर्‍या एका याचिकेवर पुढील सुनावणी होईल, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.


यंदा देशाची जनगणना सुरू होईल. आजमितीला देशाची लोकसंख्या सुमारे १३८ कोटींवर गेली आहे. जनगणनेनंतर नेमका आकडा स्पष्ट होईल. जनगणनेची प्रक्रिया अद्याप सुरू झालेली नसली, तरी जातनिहाय जनगणना व्हायला हवी, याबाबत चर्चा सुरू झालेली आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी पहिल्यांदा ही मागणी केली होती. आता केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनीही ही मागणी पुढे केली आहे.


अर्थात, जातनिहाय जनगणनेची मागणी देशात पहिल्यांदाच होत आहे, असेही नाही. मागील जनगणना २०११ मध्ये झाली होती. तेव्हाही मुलायमसिंह यादव, लालूप्रसाद यादव आणि शरद यादव या नेत्यांनी जातनिहाय जनगणनेची मागणी केली होती. यावेळी केंद्रातील सत्ताधारी ‘रालोआ’तील घटक पक्ष ही मागणी करत आहेत.  भारतात चालू वर्षातच जनगणनेचे काम सुरू होणार आहे. गतवर्षीच त्याला सुरुवात होणार होती; पण कोरोनामुळे जनगणना पुढे ढकलण्यात आली होती. केंद्र सरकारने आता ही प्रक्रिया सुरू करण्याची तयारी सुरू केली आहे.


मोबाईल, डिजिटल जनगणना

यावेळी शक्यतोवर जनगणनेचे काम मोबाईलसह अन्य डिजिटल माध्यमांतून करावे, असा प्रस्ताव आहे. घरोघरी फिरून जनगणनेचे काम शक्यतो केले जाणार नाही. जिथे अगदीच अशक्य आहे, तिथेच असे केले जाईल. देशाची अंदाजे लोकसंख्या सध्या १,३८,७६,६१,३८९ म्हणजे सुमारे १३८ कोटींवर गेली आहे. साधनसामग्रीच्या तुलनेत ही लोकसंख्यावाढ म्हणजे स्फोट आहे, असे तज्ज्ञांच्या एका वर्गाकडून मानले जाते. कुटुंबनियोजनाचा प्रचार, प्रसार मर्यादित झाल्याचा हा परिणाम असल्याचे मानले जाते.

संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
चार बँकांच्या खासगीकरणाची लगबग
अनिल देशमुख यांच्या सचिवाची कसून चौकशी
महाराष्ट्रात भाजपचा मुख्यमंत्री नाही याची किंमत महाराष
शेतकर्‍यांच्या जीवावर ‘नाफेड’कमावते नफा
राफेल डीलमध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी १० लाख य
लॉकडाऊनच्या भीतीने कांद्याचे दर कोसळले
ज्या राज्यात निवडणुका आहेत तेथे नाही फक्त महाराष्ट्रात
शेतकरी आंदोलनाला कव्हरेज देणार्‍या व डॉ.आंबेडकर जयंतील
कृषी कायद्यांविरोधात शेतकर्‍यांचे आंदोलन पेटले असताना
झिरो बॅलन्स खात्यातून पाच वर्षात सर्व्हिस चार्जच्या ना
उद्योगपती, एमडी ते सामाजिक क्रांतीचे जनक
क्रांतीसूर्य जोतिबा
आधुनिक भारताचे प्रमुख शिल्पकार राष्ट्रपिता महात्मा ज्य
परिवर्तन पेरणारे महात्मा
आधुनिक भारताचे सामाजिक क्रांतिकारक- राष्ट्रपिता जोतीरा
पर्यायी साहित्याचे प्रणेते
महात्मा फुले यांना अभिप्रेत असणारा शिक्षक
महिलांचे मार्गदाते
आज सर्वात जास्त शंका निवडणूक आयोगाच्या प्रामाणिकपणावर
महात्मा फुलेंच्या साहित्याचे नवे खंड आता हिंदी, इंग्रजी
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper