×

व्यवस्थेच्या ठेकेदारांना लसीची ऍलर्जी

Published On :    23 Jan 2021
साझा करें:

कोरोना विषयी जनजागृती लोकांमध्ये होऊन सत्य परिस्थिती सर्वांना माहिती होत आहे. कोरोनाच्या नावाखाली सुरवातीपासूनच आर्थिक, मानसिक आणि आता शारीरिक कमकुवत बनवण्याचे काम हाती घेतलेले दिसून येते.कोरोना विषयी जनजागृती लोकांमध्ये होऊन सत्य परिस्थिती सर्वांना माहिती होत आहे. कोरोनाच्या नावाखाली सुरवातीपासूनच आर्थिक, मानसिक आणि आता शारीरिक कमकुवत बनवण्याचे काम हाती घेतलेले दिसून येते. स्वतःला विद्वान समजणारा देश कोरोना फ्ल्यूला महामारी समजून स्वतः त्यावर कोणताही तर्क वा विचार करत नाहीत. सुरवातीच्या काळात सरकारने मिडीयाच्या माध्यमातून कोरोना विषयी प्रचंड भीती व दहशत निर्माण करून लोकांना भयभीत करून सोडले. 


लोकांची मानसिकता बदलून कोरोनाची दहशत व पोटाची आग यामध्ये संघर्ष निर्माण होऊन पोट भरण्यासाठी लागणारा पैसा व काम बंद झाल्याने उपासमारीची वेळ आली आणि खर्‍या अर्थाने जनता खचून गेली होती. कोरोना एवढे मोठे षडयंत्र आहे की कोरोनाचे लक्षण, कोरोणाचे दुष्परिणाम, कोरोना विषयीचे तर्क सगळं काही अयशस्वी झाले आहे. शासकीय पातळीवर देशातील नागरीकांच्या मुलभूत हक्कावर नियंत्रण मिळवून मुलभूत हक्काचा वापर न होऊ देणे यासाठीच बहुतेक कोणाचाचे षडयंत्र रचले गेले असे म्हणणे वावगे ठरणार नाही. कारण कोरोना मुळे फक्त लोकांच्या मुलभूत हक्कावरच नियंत्रण आलेले असून प्रवाहात येण्याचे सर्व मार्ग बंद झाले, परंतु राजकारण, राजकीय नेते, आणि राजकीय सत्ता यावर कोणताही परिणाम झाला नाही. लॉकडाऊन मध्ये घराच्या बाहेर न पडलेल्या नेत्यांनी निवडणुकीमध्ये प्रचाराची कोणत्याही कसर सोडली नाही. 


याचा दुसरा अर्थ असा की लॉकडाऊन व कोरोना फक्त सर्वसामान्य लोकांसाठीच होता. राजकीय नेत्यांना लॉकडाऊन मध्ये कोणतीच अडचण भासली नाही. याचा अर्थ राजकीय लोकांवर कोरोनाचा कोणताचा परिणाम झाला नाही. कोरोना फ्ल्यू त्या विषयी दिलेली माहिती, लक्षणे व दुष्परिणाम बघितलं तर सध्या भारतामध्ये पूर्ण अयशस्वी कार्यक्रम आहे. जागतिक आरोग्य संघटनेने ठरवून दिलेल्या गाईडलाईनचा कधी आपण अभ्यास करून तर्क लावला नाही. कोरोना षडयंत्राच्या विरोधात बोलणारा देशद्रोही ठरू लागले. कोरोना महामारी आहे आणि तो संसर्ग जन्य व्हायरस आहे. असे आपण मान्य केले तर सुरवातीला कोरोना पॉझिटीव्ह लोकांच्या संपर्कात आलेल्या सर्वांची तपासणी करून जास्तीत जास्त लोकांचे पॉझिटिव्ह निकाल येत होते. कोरोना हा जिवघेणा आहे, कोरोनाची लक्षणे लवकर दिसत नाहीत तरी तपासणी करून घ्यावी म्हणजे कोरोना विषयी समजून येते. मिडीयावाल्यांनी तर जाहीर करून टाकले होते की अर्ध्यापेक्षा जास्त लोकांना कोरोना होऊन बरा पण झाला. नंतर त्यांच्या शरिरात कोरोना सक्रीय झाल्याचे निष्पन्न झाल्याचा दावा काही तज्ञांनी केला होता. 


कोरोना खरचं संसर्गजन्य महामारी होती, कोरोना होऊन गेल्यावरही जर माहिती होत होते तर आज एखाद्याला कोरोना झाला तर त्याचा घरीच इलाज करण्यात येतो आणि विशेष म्हणजे आज दुसर्‍याला जास्त प्रमाणात होत नाही, कोरोनाची लक्षण ताप, सर्दी, खोकला, तोंडाची चव, श्‍वास घेण्यास अडचण सुद्धा निर्माण होत नाही. अनलॉकच्या नंतर कोरोना सुद्धा थकून गेला. देशात एकच रुग्ण असताना कोरोनाची प्रचंड भिती मनात निर्माण करून दिली आणि देशात करोडो पॉझिटिव्ह असताना कोरोनाने कोणाचे जिव घेतले नाही वा कोणाला संसर्ग होऊन कोणी अशक्त झाले नाही. थोडक्यात काय तर कोरोना फक्त एक षडयंत्रच आहे दुसरे काहीच नाही. षडयंत्रच नसते तर कोरोना काळात निवडणुका झाल्या नसत्या, मंदीराच्या भुमिपूजनाला एवढी गर्दी झालीच नसती. कोरोना षडयंत्रच आहे हे सिद्ध होते.


 कोरोनाच्या नावाखाली लोकांना बेरोजगार करून उपासमारीच्या माध्यमातून मानसिक खच्चीकरण आणि अशक्त बनवण्याचा प्रयत्न केला जात आहे. शिक्षण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य या दोन विषयीच कोरोना आणि लॉकडाऊन जास्त कडक आहे. याची जाणीव आपल्याला राहिलेली नाही. सर्व प्रकारचे जिवघेणे प्रयोग झाल्यानंतर अजून एक प्रयोग आणला तो म्हणजे लस. कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी कोरोनाची लस शोधून काढली. फेक महामारीवर लस शोधून काढली म्हणजे त्याचे दुष्परिणाम होणार हे सर्वज्ञात आहेच. कोरोना नावाची महामारी खरी नसली तरी त्यावर निर्माण केलेली लस मात्र खरी आहे. 


ही लस निर्मितीपासून तर विक्रीपर्यंत अनेक प्रकरणे समोर आलेत. कोरोना संरक्षणासाठी बनवलेल्या लसीमुळे एचआयव्हीची बाधा होणे, मानसिक संतुलन बिघडणे, शारीरिक व्यंग निर्माण होणे, कायमस्वरूपी अपंगत्व निर्माण होणे, नंपुसकत्व निर्माण होणे, चक्कर येऊन कोसळणे व मृत्यू होणे, घशाला कोरड पडून सतत खोकला येऊन मृत्यू होणे, अशा प्रकारचे गुणकारी निकाल वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या लसीने दिलेले आहेत. म्हणूनच तर कोरोनाच्या नावाखाली करोडो रूपये कमवाणार्‍या डॉक्टर लोकांनी स्वतः ला लस टोचून घेण्यास नकार दिला आणि भयानक परिस्थिती समोर आणली. वैद्यकीय संशोधनावर वैद्यकीय शास्त्रात पारंगत लोकच जर शंका घेत असतील तर ती लस सर्वसामान्य लोकांना देऊन त्यांच्या जिवनाशी व जिवाशी खेळून काय फायदा.


प्रत्येक गोष्ट करायची तर अगोदर राजकारणी नेत्यांच्या माध्यमातून फोटो काढून केली जाते हीच आज पर्यंतची परंपरा आहे. स्थानिक पातळीवर क्रिकेटच्या खेळाची सुरवात जरी करायची तरी नेत्यांच्या हातात बॅट दिली जाते, मॅरेथॉन असेल तर सर्वात समोर दाखवले जाते, एखाद्या जागेचे उद्घाटन असेल तर हातात टिकास दाखवली जाते फोटो घेतला जातो आणि मग बाकीचे लोक मेहनत करून ते काम पुर्ण करतात. पण समोर मात्र राजकीय नेताच असतो. कोरोना लस मार्केट मध्ये आली पण एकाही बहादूर नेत्याने सर्वात अगोदर मी घेतो असे म्हटले नाही आणि घेतली सुद्धां नाही. लसीचे एवढे मोठे दुष्परिणाम असून कधीच मिडीयाने त्यावर चर्चा केली नाही, लोक लसीमुळे मरत असताना विकलेला मिडीया मालकाशी एकनिष्ठ आहे. सत्य परिस्थिती मिडीया लपवून देशातील नागरिकांची दिशाभूल करत आहे. 


लस अगोदर राज्यकर्त्यांना द्यावी असा आवाज जेव्हा जनसामान्यांमधून बाहेर येऊ लागला तेव्हा कोरोना लसीचे फोटोसेशन सुरू झाले. राजकीय नेते खुर्चीवर बसतात, परिचारिका हातात इंजेक्शन घेऊन त्याच्या हातावर ठेवते फोटो काढला की इंजेक्शन बाजूला घेते एवढ्या मोठ्या प्रमाणात लोकांची दिशाभूल सुरू असताना लस सुरक्षित आहे असे कसे म्हणता येईल. लसीकरणाचे फक्त फोटो काढून व्हायरल होत आहेत याचा एक व्हिडिओ सुद्धा व्हायरल झाला परंतु मिडीयाने अजूनही त्यांना प्रश्न विचारला नाही की तुम्ही लस घेण्याचे फक्त नाटक करता लस का घेत नाही? राजकारणी नेत्यांना कोरोना नाही याची जाणीव आहे, आणि लस ही कोरोनावर खात्रीशीर नाही याची माहिती आहे. म्हणून जनतेला अपंग व अशक्त करून आपले पोट भरण्यासाठी राजकारणी लोक लसीकरणाचे फक्त नाटक करत आहेत. 


कोरोनाची भिती निर्माण करणार्‍या मिडीयाला मरणारांची संख्या, नेत्यांचे नाटकं दिसत नाहीत म्हणजे कीती नवलच! आज लस टोचण्याचे नाटक करणारे व्हिडीओ व्हायरल झाले त्यामुळे उद्या अनेक नेते समोर येऊन लस टोचतानाचे फोटो व्हायरल करतील, परंतु ती लस नसून शुद्ध पाणी असेल, स्वतः ला शुद्ध पाण्याची लस टोचून घेऊन लोकांना जिवघेण्या लसीची सक्ती सरकार नेमके का आणि कोणासाठी करत असेल? सरकारवर असे कोणाचे बंधन आहे की लोकांचा जिव गेला तरी चालेल पण लस द्या? सरकार स्वतः हून तर अस काही करत नाही ना? याही विषयावर मिडीयाने नाही पण सर्व सामान्य लोकांनी चर्चा करणे महत्त्वाचे आहे. सुरक्षितता आणि अफवेच्या नावाखाली लोकांचा आवाज दाबण्याचे काम या व्यवस्थेकडून होत आहे. सर्व भार फक्त जनतेवर देऊन, जनतेला पुन्हा मानसिक आणि आर्थिक गुलामगिरी मध्ये ढकलण्यासाठी कोरोनाच्या पडद्यामागून ही व्यवस्था वार करत आहे. ही व्यवस्था जोपर्यंत कळणार नाही तोपर्यंत आपण आपले अस्तित्व टिकवू शकणार नाही. व्यवस्थेचे जे काही लाभार्थी आहेत त्यांना लसीची ऍलर्जी असताना देशात सक्ती करणे हे सुद्धा षड्यंत्रच आहे.


विनोद पंजाबराव सदावर्ते
मो: ९१३०९७९३००

संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
इंधन दरवाढीमागे सात वर्षात १३७ टक्क्यांच्या करवाढीचा ब
विधानसभा निवडणुकांसाठी कोरोना आड येत नाही का?
मराठी शाळांचे कोट्यवधी रुपये सरकारच्या ताब्यात
आता शिव संवादातून होणार आक्रोश मेळावा
रेल्वे भाडे न सांगता तीन पटीने वाढवले
छत्तीसगडमध्ये दहा महिन्यांत १४१ शेतकर्‍यांच्या आत्महत
जातनिहाय जनगणनेवर न्यायालयाची केंद्राला नोटीस
शेतकरी आणि कृषी बिलाशी आपला काय संबंध ही धारणा सोडा..!
शोषणकारी व्यवस्थेला म्हणावे लागेल पुन्हा चलेजाव
‘संविधानाच्या पडद्याआड संघोट्यांचा लिंबू’ या पुस्तकाच
केंद्राने राज्याचे २९ हजार कोटी जीएसटीचे थकवले
राज्याचा ८ मार्चला अर्थसंकल्प सादर होणार
आर्य भारताचे मूलनिवासी नाहीत, ते स्थलांतरित
भारतातील तब्बल ३७.५ कोटी बालकांच्या आरोग्य आणि शिक्षणाच
भारत उपासमारीच्या खाईत असताना अब्जाधीशांच्या श्रीमंती
जास्त वेळ काम करूनही भारतीयांना मिळते तुटपुंजी मजुरी
...तर भाजपाला मोजावी लागेल मोठी किंमत
इंधन दरवाढीचा फटका पालेभाज्यांवर
केंद्रातील भाजपा सरकारने देश काढला विक्रीला
गेल्या वर्षी भारतावर झाले सर्वाधिक सायबर हल्ले
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper