×

शेतकरी आंदोलन गावा-गावापर्यंत पोहचवा

Published On :    23 Jan 2021
साझा करें:

वामन मेश्राम यांचे कार्यकर्त्यांना आवाहन



पुणे: दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेले शेतकरी आंदोलन सार्‍या देशभरातील गावा-गावात पोहचवा असे आवाहन भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांनी एमटीव्हीच्या माध्यमातून कार्यकर्त्यांना केले आहे. हे आंदोलन भारत मुक्ती मोर्चा, बहुजन क्रांती मोर्चा, राष्ट्रीय किसान मोर्चाच्या माध्यमातून केले जाणार आहे.


संयुक्त शेतकरी संघर्ष समितीद्वारा शेतकर्‍यांचे आंदोलन सुरू आहे. शेतकर्‍यांच्या मागण्या मान्य करायला सरकार राजी नसल्याचे दिसून येते. हे आंदोलन जवळजवळ दोन महिने सुरू आहे. परंतु शेतकर्‍यांच्या मागण्या मान्य करण्यासाठी सरकारचा मनसुबा दिसत नाही. जोपर्यंत सरकारकडे ईव्हीएम मशीन आहे तोपर्यंत शेतकर्‍यांनी कुठल्याही प्रकारे आंदोलन करू दे आम्हांला काहीच फरक पडत नाही अशी सरकारची धारणा आहे. कारण आम्हांला ईव्हीएम मशीनच्या माध्यमातून निवडणुका जिंकण्याची संधी मिळणारच आहे.  


काही दिवसांपूर्वी हैद्राबाद महापालिकेची निवडणूक झाली. त्यावेळी तेथील मुख्यमंत्र्यांनी ईव्हीएम मशीनवर निवडणुका घेऊ नयेत असे सांगितले. ईव्हीएमवर त्यांनी बंदी लादली. त्यानंतर हिंदू-मुसलमान असा मामला निर्माण करून भारतीय जनता पार्टीला ४८ जागा मिळाल्या. गेल्यावेळी त्यांच्याकडे केवळ ३ जागा होत्या. मात्र ईव्हीएम मशीनच्या माध्यमातून निवडणुका झाल्या असत्या तर हैद्राबाद महापालिकेवर भारतीय जनता पार्यीचा महापौर बसला असता. परंतु ईव्हीएम मशीनच्या माध्यमातून निवडणुका न झाल्याने तेथे महापौर बसवताना त्यांना समस्या आल्या. हे एक उदाहरण आहे असे मेश्राम म्हणाले.


हे सारे लक्षात घेऊन शेतकरी आंदोलन व्यापक बनवण्यासाठी आम्ही एक निर्णय घेतला आहे. भारत मुक्ती मोर्चा, बहुजन क्रांती मोर्चा, राष्ट्रीय किसान मोर्चाच्या माध्यमातून ३१ राज्य, ५६० जिल्हे व देशातील सर्व ग्रामपंचायतीच्या अनुमतीने मोर्चा काढण्याचे आवाहन करत आहोत. मोर्चा काढून शेतकरी आंदोलन सार्‍या देशभरात पसरवण्याचे काम केले जाणार आहे. बामसेफ, भारत मुक्ती मोर्चा, बहुजन क्रांती मोर्चा, राष्ट्रीय किसान मोर्चाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सार्‍या ताकदीनिशी हे आंदोलन देशातील प्रत्येक गावात पोहचवावे असे निर्देश मेश्राम यांनी दिले.

संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
इंधन दरवाढीमागे सात वर्षात १३७ टक्क्यांच्या करवाढीचा ब
विधानसभा निवडणुकांसाठी कोरोना आड येत नाही का?
मराठी शाळांचे कोट्यवधी रुपये सरकारच्या ताब्यात
आता शिव संवादातून होणार आक्रोश मेळावा
रेल्वे भाडे न सांगता तीन पटीने वाढवले
छत्तीसगडमध्ये दहा महिन्यांत १४१ शेतकर्‍यांच्या आत्महत
जातनिहाय जनगणनेवर न्यायालयाची केंद्राला नोटीस
शेतकरी आणि कृषी बिलाशी आपला काय संबंध ही धारणा सोडा..!
शोषणकारी व्यवस्थेला म्हणावे लागेल पुन्हा चलेजाव
‘संविधानाच्या पडद्याआड संघोट्यांचा लिंबू’ या पुस्तकाच
केंद्राने राज्याचे २९ हजार कोटी जीएसटीचे थकवले
राज्याचा ८ मार्चला अर्थसंकल्प सादर होणार
आर्य भारताचे मूलनिवासी नाहीत, ते स्थलांतरित
भारतातील तब्बल ३७.५ कोटी बालकांच्या आरोग्य आणि शिक्षणाच
भारत उपासमारीच्या खाईत असताना अब्जाधीशांच्या श्रीमंती
जास्त वेळ काम करूनही भारतीयांना मिळते तुटपुंजी मजुरी
...तर भाजपाला मोजावी लागेल मोठी किंमत
इंधन दरवाढीचा फटका पालेभाज्यांवर
केंद्रातील भाजपा सरकारने देश काढला विक्रीला
गेल्या वर्षी भारतावर झाले सर्वाधिक सायबर हल्ले
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper