×

१ टक्का व्यक्तींकडे देशाची ७३ टक्के संपत्ती

Published On :    21 Jan 2021
साझा करें:

ऑक्स्फामच्या सर्वेक्षणात माहिती आली पुढे



नवी दिल्ली: भारतातील १ टक्के अतिश्रीमंतांकडे एकूण संपत्तीच्या ७३ टक्के संपत्ती आहे असे ऑक्स्फामच्या सर्वेक्षणात माहिती पुढे आली आहे. म्हणजे भारतात गरीब व श्रीमंतांमधील दरी कमी होण्याऐवजी ती दरी वाढत चालल्याचे दिसून येत आहे.


भारतात १९३९-४० मध्ये १ टक्के अतिश्रीमंतांकडे एकूण संपत्तीच्या २०.७ टक्के संपत्ती होती. जानेवारी २०१७ च्या सर्वेक्षणानुसार हेच प्रमाण ५८ टक्के होते. म्हणजेच एका वर्षातच श्रीमंतांकडील संपत्तीचा वाटा १५ टक्क्यांनी वाढला. याचाच अर्थ तेवढ्याच प्रमाणात उर्वरित नागरिकांकडील संपत्तीचे प्रमाण घटत गेले. याच सर्वेक्षणानुसार या काळातील इतर नागरिकांच्या संपत्तीतील वाढ मात्र, केवळ १ टक्के एवढी नगण्य होती.


अतिश्रीमंतांच्या संपत्तीवाढीतील विस्फोट हे आर्थिक धोरणे फसल्याचे लक्षण मानले जाते. जे देशासाठी अन्न उत्पादित करतात, आपापल्या श्रमकौशल्याने अवाढव्य निर्माण कार्यात आपला वाटा उचलतात, त्यांतील बहुतांशी नागरिकांना मुलाबाळांच्या शिक्षणाचा खर्च कसा उचलायचा? हा प्रश्‍न आहे. अनेकांना दोन वेळच्या जेवणाची भ्रांत असून उपासमारीत भारत देश आघाडीवर आहे. आजही भारतातील तळागाळातील १० टक्के लोकांचा राष्ट्रीय संपत्तीतील वाटा ०.२ टक्के एवढा अत्यल्प आहे.


ऑक्स्फाम इंडियाच्या कार्यकारी अधिकारी निशा अग्रवाल म्हणतात. मुळात भारताने आजही अंगीकारले असलेले समाजवादी धोरण आणि त्याला लाभलेली सत्ताप्राप्तीसाठी मोजक्याच उद्योजकांना जवळ करीत त्यांना व्यवस्थेचे लाभ अमर्यादपणे मिळू देणारी राजकीय व्यवस्थेची सक्रिय साथ या विषमतेला अधिक जबाबदार आहे. गेल्या एकाच वर्षात १ टक्के अतिश्रीमंतांच्या संपत्तीतील तब्बल १५ टक्के वाढ ही त्याचाच परिपाक आहे.


ऑक्स्फामचा अहवाल सांगतो की, याच अतिश्रीमंतांनी २०० अब्ज डॉलरचा कर बुडवला आहे. आणि त्याच्या वसुलीची कोणतीही सोय आपल्याकडे नाही. बँकांकडून घेतलेले कर्ज थकवणे अथवा बुडवण्याचे प्रमाण याच वर्गात सर्वाधिक आहेत. अवाढव्य भांडवल लागणार्‍या उद्योगांत याच वर्गाला अधिक सवलती देत वाव देण्याचे काम सरकारी धोरणे आणि छुपे हितसंबंध करतात. त्यामुळे देशात गरीब व श्रीमंतांमधील दरी दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. त्याला सरकारची भांडवलधार्जिणी नीती कारणीभूत आहे. ग्लोबल हंगर इंडेक्समध्ये भारत ९४ क्रमांकावर आहे. म्हणजेच भारतात उपासमारीने टोक गाठले आहे. यालाही शासक वर्ग जबाबदार आहे. देशाची अर्थव्यवस्था ५ ट्रिलीयन डॉलरवर नेण्याचे सरकारचे उद्दीष्ट आहे. परंतु देशातील उपासमारीने टोक गाठले आहे. मग अर्थव्यवस्थेचे उद्दीष्ट गाठणार कसे? भारतात विरोधाभास आहे.


देशाचा आजचा वास्तविक जीडीपी १.५ टक्के आहे. लॉकडाऊनच्या कालावधीतही मुकेश अंबानी आशियातील सर्वाधिक श्रीमंत कसे काय बनू शकतात? याला कारण असमानता होय. आज अंबानीकडे १ लाख २१ हजार करोड रूपयांची संपत्ती आहे. एका दिवसात ४ हजार करोडची संपत्ती वाढते. कॉर्पोरेट कंपन्यांचे कर्जाचा हप्ता लोकांना भरावा लागत आहे. आज देशातील शेतकर्‍यांचे उत्पन्न किती आहे. त्यांना हमीभाव मिळतो का? त्यातच लादलेल्या कृषी कायद्यांमुळे शेतकर्‍यांचे कंबरडे मोडले आहे.

संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
इंधन दरवाढीमागे सात वर्षात १३७ टक्क्यांच्या करवाढीचा ब
विधानसभा निवडणुकांसाठी कोरोना आड येत नाही का?
मराठी शाळांचे कोट्यवधी रुपये सरकारच्या ताब्यात
आता शिव संवादातून होणार आक्रोश मेळावा
रेल्वे भाडे न सांगता तीन पटीने वाढवले
छत्तीसगडमध्ये दहा महिन्यांत १४१ शेतकर्‍यांच्या आत्महत
जातनिहाय जनगणनेवर न्यायालयाची केंद्राला नोटीस
शेतकरी आणि कृषी बिलाशी आपला काय संबंध ही धारणा सोडा..!
शोषणकारी व्यवस्थेला म्हणावे लागेल पुन्हा चलेजाव
‘संविधानाच्या पडद्याआड संघोट्यांचा लिंबू’ या पुस्तकाच
केंद्राने राज्याचे २९ हजार कोटी जीएसटीचे थकवले
राज्याचा ८ मार्चला अर्थसंकल्प सादर होणार
आर्य भारताचे मूलनिवासी नाहीत, ते स्थलांतरित
भारतातील तब्बल ३७.५ कोटी बालकांच्या आरोग्य आणि शिक्षणाच
भारत उपासमारीच्या खाईत असताना अब्जाधीशांच्या श्रीमंती
जास्त वेळ काम करूनही भारतीयांना मिळते तुटपुंजी मजुरी
...तर भाजपाला मोजावी लागेल मोठी किंमत
इंधन दरवाढीचा फटका पालेभाज्यांवर
केंद्रातील भाजपा सरकारने देश काढला विक्रीला
गेल्या वर्षी भारतावर झाले सर्वाधिक सायबर हल्ले
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper