×

लाचखोरीत भारत आशिया खंडात टॉपवर

Published On :    26 Nov 2020
साझा करें:

भारताची लाचखोर प्रतिमा बनवण्यात शासकवर्गाचा हात, ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनलचा सर्व्हे



नवी दिल्ली: भारताची लाचखोर प्रतिमा बनवण्यात डीएनएनुसार विदेशी असलेल्या अल्पसंख्य शासकवर्ग ब्राम्हणांचा हात आहे. त्यामुळे भारताची प्रतिमा ही डागाळलेली आहे.सार्‍या आशिया खंडात लाचखोरीत भारत टॉपवर असल्याची बाब समोर आली आहे. ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनलच्या सर्व्हेनुसार, भारतात लाचखोरीचे प्रमाण हे ३९ टक्के आहे. गेल्या १२ महिन्यांत भ्रष्टाचारात वाढ झाल्याचे ४७ टक्के लोकांचे म्हणणं आहे.


भारतात ४६ टक्के लोक आपले काम करुन घेण्यासाठी वैयक्तिक संबंधांचा फायदा उठवतात. लाचखोरीच्या प्रकरणांमध्ये सुमारे निम्म्या लोकांकडून लाच मागण्यात आली आहे. तर वैयक्तिक संबंधांचा वापर करणारे ३२ टक्के लोकांचे म्हणणे आहे की त्यांनी जर असे केले नाही तर त्यांचे काम होतच नाही. भारतानंतर दुसर्‍या क्रमांकावर आहे कंबोडिया. या देशात ३७ टक्के लोक लाच देतात. यानंतर भ्रष्टाचाराचे प्रमाण ३० टक्के असल्याने इंडोनेशिया तिसर्‍या स्थानी आहे. तर सर्वात कमी लाचखोरी चालणारे देश आहेत मालदीव आणि जपान. या दोन्ही देशांमध्ये दोन टक्के लोकच लाच घेतात. आशिया खंडातील दक्षिण कोरियामध्ये भ्रष्टाचाराचा दर १० टक्के आहे. तसेच नेपाळमध्ये १२ टक्के लोकचं भ्रष्टाचार करतात. मात्र, या सर्व्हेमध्ये पाकिस्तानचा समावेश करण्यात आलेला नाही.


ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनलने ‘ग्लोबल करप्शन बॅरोमीटर-आशिया’ या नावाने आपला अहवाल सादर केला आहे. यामध्ये १७ देशांतून २०,००० लोकांना प्रश्न विचारण्यात आले. हा सर्व्हे जून आणि सप्टेंबर या महिन्यांदरम्यान करण्यात आला होता. या सर्व्हेमध्ये सहा प्रकारच्या सरकारी सेवांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये प्रत्येक चार लोकांपैकी तीन जणांनी त्यांच्या देशात भ्रष्टाचार ही मोठी समस्या असल्याचे म्हटले आहे.


भारतात ज्या लोकांचा सर्व्हेमध्ये समावेश होता. यांपैकी ४२ टक्के लोकांनी पोलिसांना लाच दिली आहे. सरकारी ओळखपत्र मिळवण्यासाठी ४१ टक्के लोकांना लाच द्यावी लागली. अहवालात या गोष्टीचाही खुलासा करण्यात आला की, ६३ टक्के लोकांना भ्रष्टाचाराची माहिती देण्यास भीती वाटते.

संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
चार शेतकरी नेत्यांची गोळ्या घालून हत्या करण्याचा कट
ट्रॅक्टर रॅलीतही प्रत्येक राज्यांच्या सामाजिक परंपरा व
राजस्थानात सर्राफा व्यवसायिक, दोन रिअल इस्टेट डेव्हलपर
ब्राम्हणी व्यवस्था कायम टिकवण्यासाठी ब्राम्हण-बनिया मी
देशाचा परकीय चलन साठा १.८३९ अब्ज डॉलर्सने घसरला
अर्णब गोस्वामींवर कारवाई करण्याबाबत मागवले लीगल ओपिनिय
शेतकरी आंदोलन गावा-गावापर्यंत पोहचवा
पुन्हा एकदा ईव्हीएम घोटाळा करून सत्तेवर येण्याचा एनडीए
दीड वर्षे स्थगिती नको, कृषी कायदे रद्दच करा
सिव्हिल सर्जनसह ६ जण निलंबित
फेसबुक डाटा चोरी : ‘केम्ब्रिज ऍनालिटिका’ विरोधात सीबीआय
देशाच्या सुरक्षेविषयीची गुप्त माहिती देणारा कसा काय पत
आउटर रिंग रोडवरच शेतकर्‍यांची ट्रॅक्टर रॅली
एसईबीसी वगळून इतर निवड प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सरका
महागाई-महामारीने भारताच्या गरीबीत १ कोटी २० लाखांची पडण
उद्या २० हजार शेतकर्‍यांचा नाशिक ते मुंबई भव्य वाहन मार्
छत्रपती शाहू महाराजांच्या संस्कारावर जगलो तर देशात महा
१ टक्का व्यक्तींकडे देशाची ७३ टक्के संपत्ती
टाइम्स नाऊ व रिपब्लिक वृत्तवाहिन्यांना उच्च न्यायालयान
बळाचा वापर केल्यास २६ जानेवारीला त्सुनामी येईल
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper