×

तपास केलेल्या कोणत्याही प्रकरणांत लव्ह जिहादचा संबंध नाही

Published On :    25 Nov 2020
साझा करें:

एसआयटीच्या अहवालाने उत्तर प्रदेश सरकार तोंडावर आपटले



लखनऊ : ‘लव्ह जिहाद’ चा बाऊ करत मुस्लीमांना टार्गेट करण्याचा चंग देशातील विविध राज्यातील भाजपा सरकारांनी आखला आहे. त्यासाठीच उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, कर्नाटसारख्या राज्यात लव्ह जिहादविरोधात कायदा करून बांग दिली जात आहे. परंतु एसआयटीच्या अहवालाने उत्तर प्रदेशातील योगी सरकार तोंडावर आपटले असून अनेक प्रकरणांमध्ये लव्ह जिहादचा संबंध नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.


आम्ही तपास केलेल्या कोणत्याही प्रकरणात ‘लव्ह जिहाद’चा दुरान्वयानेही संबंध नव्हता. ज्यांची आम्ही चौकशी केली त्या सर्वांनी निव्वळ प्रेमाखातर आंतरधर्मीय विवाह केल्याचे आम्हाला आढळून आले, असा अहवाल कथित ‘लव्ह जिहाद’ प्रकरणांचा तपास करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) सादर केला आहे. विशेष म्हणजे जबरदस्तीने धर्मांतर करण्याविरोधात कायदा आणण्याच्या तयारीत असलेल्या उत्तर प्रदेश सरकारची यामुळे चांगली पंचाईत झाली आहे.


विहिंप तसेच उजव्या विचारसरणीच्या काही संघटनांनी दाखल केलेल्या तक्रारींवरून कानपूर रेंजच्या पोलीस महानिरीक्षकांनी या प्रकरणांचा तपास करण्यासाठी एसआयटीची स्थापना केली. मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून मुस्लिम तरुण त्यांच्याशी विवाह करतात आणि विवाहानंतर मुलींना जबरदस्तीने धर्म बदलण्यास भाग पाडतात. त्यासाठी मुस्लिम तरुणांना परदेशातून मोठ्या प्रमाणात पैसे मिळतात, असे या तक्रारीत नमूद करण्यात आले होते. 


एसआयटीने यासंदर्भात केलेल्या तपासात असे काहाही होत नसल्याचा अहवाल सादर केला आहे. एकूण १४ प्रकरणांचा एसआयटीने तपास केला. मात्र, ‘लव्ह जिहाद’चा त्यांच्याशी दुरान्वयानेही संबंध नसल्याचे तपासात आढळले. तसेच आंतरधर्मीय विवाह करणार्‍या मुस्लिम तरुणांना परदेशातून पैसे मिळाले असल्याचेही तपासात निष्पन्न झाले नसल्याचे अहवाल म्हणतो. त्यामुळे ब्राम्हणवादी संघटनांचा षड्यंत्रकारी चेहरा पुन्हा एकदा समोर आला आहे.

संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
चार शेतकरी नेत्यांची गोळ्या घालून हत्या करण्याचा कट
ट्रॅक्टर रॅलीतही प्रत्येक राज्यांच्या सामाजिक परंपरा व
राजस्थानात सर्राफा व्यवसायिक, दोन रिअल इस्टेट डेव्हलपर
ब्राम्हणी व्यवस्था कायम टिकवण्यासाठी ब्राम्हण-बनिया मी
देशाचा परकीय चलन साठा १.८३९ अब्ज डॉलर्सने घसरला
अर्णब गोस्वामींवर कारवाई करण्याबाबत मागवले लीगल ओपिनिय
शेतकरी आंदोलन गावा-गावापर्यंत पोहचवा
पुन्हा एकदा ईव्हीएम घोटाळा करून सत्तेवर येण्याचा एनडीए
दीड वर्षे स्थगिती नको, कृषी कायदे रद्दच करा
सिव्हिल सर्जनसह ६ जण निलंबित
फेसबुक डाटा चोरी : ‘केम्ब्रिज ऍनालिटिका’ विरोधात सीबीआय
देशाच्या सुरक्षेविषयीची गुप्त माहिती देणारा कसा काय पत
आउटर रिंग रोडवरच शेतकर्‍यांची ट्रॅक्टर रॅली
एसईबीसी वगळून इतर निवड प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सरका
महागाई-महामारीने भारताच्या गरीबीत १ कोटी २० लाखांची पडण
उद्या २० हजार शेतकर्‍यांचा नाशिक ते मुंबई भव्य वाहन मार्
छत्रपती शाहू महाराजांच्या संस्कारावर जगलो तर देशात महा
१ टक्का व्यक्तींकडे देशाची ७३ टक्के संपत्ती
टाइम्स नाऊ व रिपब्लिक वृत्तवाहिन्यांना उच्च न्यायालयान
बळाचा वापर केल्यास २६ जानेवारीला त्सुनामी येईल
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper