×

इंटरनेटच्या जाळ्यात अडकले अवघे विश्‍व

Published On :    31 Oct 2020
साझा करें:

कोरोना काळात इंटरनेट बनले आधार



नवी दिल्ली: सध्याच्या जमान्यात इंटरनेट जीवनाचा महत्वाचा घटक आहे. आपले जीवन सहज आणि मनोरंजक बनवण्याचे काम इंटरनेट करत आहे. त्यामुळे दिवसागणिक त्याचा वापर करणार्‍यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.


जगातील ६० टक्के लोक इंटरनेट वापरतात. प्रत्येक सेकंदाला १४ जण इंटरनेटशी जोडले जातात. एवढेच नव्हे तर आपण दिवसाला सरासरी ७ तास इंटरनेटवर घालवतो, अशी अचंबित करणारी माहिती हाती आली आहे. कोरोना काळात तर इंटरनेट लाईफ लाईन बनले आहे.


हे पण वाचा :-   बिहार निवडणुकीत ईव्हीएममध्ये घोटाळा? 



२९ ऑक्टोबर १९६९ रोजी इंटरनेट वापराला सुरूवात झाली. २००५ मध्ये पहिल्यांदा इंटरनेट दिवस साजरा झाला. त्यानंतर २०१६ पासून २९ ऑक्टोबर रोजी जगभर इंटरनेट दिवस साजरा होऊ लागला. यानिमित्त करण्यात आलेल्या अभ्यासातून जगाची लोकसंख्या ८०० कोटी आहे. त्यापैकी ४६६ कोटी म्हणजे ६० टक्के लोक इंटरनेटशी जोडले गेेले आहेत. त्यातील ७० टक्के युजर्स भारतात आहेत. लॉकडाऊनच्या काळात इंटरनेट युजर्सची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली.


युजर्सच्या ऑनलाईन वेळेतसुध्दा लक्षणीय वाढ नोंदवली गेली. घरात बसून अभ्यास, ऑफिसचे काम, मनोरंजन आणि व्यवसायासाठी इंटरनेटचा वापर होत आहे. परिणामी एका वर्षात इंटरनेट युजर्स ३२ कोटींनी वाढले आहेत. भारतात वर्षभरात २३ कोटी युजर्स वाढले आहेत.युजर्सचे सरासरी वय १६ ते ६४ वर्षे एवढे आहे. ९१ टक्के लोकांच्या मोबाईलवर इंटरनेट आहे. तर उर्वरित लोक कॉम्प्युटरवर व लॅपटॉपवर इंटरनेट चालवतात. जुलै ते सप्टेंबर या कालावधीत १८ कोटी नवे युजर्स इंटरनेटवर आले. 


म्हणजे दिवसाला सुमारे २० लाख नवे युजर्स असे हे प्रमाण आहे. इंटरनेट युजर्सचा स्क्रीन टाईम एका तासाने वाढला आहे. दिवसाला सात तास लोक इंटरनेटवर घालवतात. आपण दिवसाला सरासरी २ तास २९ मिनिटे एवढा वेळ सोशल मीडियावर घालवतो. ऑक्टोबर २०१९ ते ऑक्टोबर २०२० पर्यंत ४५ लाखांहून अधिक युजर्स सोशल मीडियावर ऍक्टीव्ह आहेत. प्रत्येक वर्षी १२ टक्के वाढ नोंदवण्यात आली.  

संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी वर्तविलेले लोकशाही समोरील धो
महिलांचा सन्मान आणि भारताचे संविधान
भारतीय संविधानाची प्रास्तविका समजली तरी जीवनाचं सार्थक
आधुनिक भारताचे निर्माते : विश्‍वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेड
आपला देश संविधानानुसार चालला आहे का?
संविधान मानणारे जागृत आहेत काय ? (भाग -१)
संविधान मानणारे जागृत आहेत का? (भाग-२)
मीडिया ट्रायल न घेण्याचे रिपब्लिक टीव्हीला आदेश द्या
शासकीय अधिकार्‍यांनी ३० नोव्हेंबरपर्यंत मालमत्तेची मा
नागरिकांच्या मालमत्तेवर सरकार कायमस्वरूपी कब्जा शकत ना
कृषी कायद्यांविरोधात शेतकर्‍यांचा आसूड कडाडला!
ईव्हीएमविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका
वेळ पडल्यास ओबीसींच्या मागण्यासाठी राज्यभर महामोर्चे क
लाचखोरीत भारत आशिया खंडात टॉपवर
शुल्क वाढ करणार्‍या खासगी शाळा राज्य सरकारलाही जुमानत न
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यावर डिसेंबरपासून नियमित सुनाव
पुण्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदींचा मार्ग अडवणार
राज्यात पथदिवे व पाणीपुरवठा योजनांच्या थकबाकीचा डोंगर
तपास केलेल्या कोणत्याही प्रकरणांत लव्ह जिहादचा संबंध न
केंद्र सरकारने आणखी ४३ मोबाइल ऍप्सवर घातली बंदी
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper