×

बामसेफच्या ३७ व्या राष्ट्रीय अधिवेशनासाठी वामन मेश्राम यांचे आवाहन

Published On :    30 Oct 2020
साझा करें:

योजना बनवून कार्यकर्त्यांनी बुध्दी, वेळ, पैसा, हुनर, श्रम करून जनआंदोलनाची तयारी करावी



नवी दिल्ली:  बामसेफचे ३७ वे राष्ट्रीय अधिवेशन दि. २५ ते २९ डिसेंबर या कालावधीत होत आहे. यानिमित्त बामसेफचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांनी अधिवेशनाच्या तयारीसाठी कार्यकर्त्यांना आवाहन केले आहे. कार्यकर्त्यांनी योजनाबध्द पध्दतीने आपली बुध्दी, वेळ, पैसा, हुनर, श्रम करून काम करावे आवाहन त्यांनी केले आहे.


केंद्रीय युनिटच्या माध्यमातून या अधिवेशनाची जोरदार तयारी सुरू झाली आहे. याला आणखी गती प्राप्त करण्यासाठी व्हीडिओ जारी केले जात आहेत. कारण देशभरातील कार्यकर्त्यांनी राष्ट्रीय अधिवेशनाच्या तयारीसाठी लक्ष द्यायला हवे.  वर्तमान समस्यांवरही मेश्राम यांनी भाष्य केले. शासक वर्गाने शेतकर्‍यांना गुलाम बनवण्यासाठी त्यांच्याविरोधात कायदे पारित केले. हे कायदे शेतकर्‍यांना संकटात टाकणारे आहेत. त्यांना जमीनीतून बेदखल करण्याचे मोठे षड्यंत्र आहे. एमएसपी केवळ मौखिक स्वरूपात देण्याचा वादा करणे, त्यासाठी कायदा केलेला नाही. यावरून सिध्द होते यामागे मोठे षड्यंत्र आहे. शेतकर्‍यांची जमीन पुंजीपती उद्योगपतींच्या घशात घालण्याचे मोठे षड्यंत्र आहे. याबाबत आपल्या लोेकांनी जागरूक होणे गरजेचे आहे.


लॉकडाऊनच्या कालावधीत ज्याप्रमाणे मजुरांनी पलायन केले, स्वातंत्र्य भारताच्या इतिहासात अशी भयंकर घटना पाहायला मिळाली नाही. याशिवाय संसदेत मजुरांच्याविरोधात कायदे बनवण्यात आले. त्यासाठी उद्योगपतींसाठी पायघड्या अंथरल्या गेल्या. ३०० मजूर असतील तर कामगारांना काढू शकता असाही आदेश पारित करण्यात आला, त्यासाठी सरकारच्या अनुमतीची गरज नाही. कामगारांच्या अधिकारांसाठी लढणार्‍या युनियनवरही आघात करण्यात आले. हा भयंकर विषय आहे. याबाबत मीडिया कुठल्याही प्रकारे माहिती देत नाही असे मेश्राम म्हणाले.


हे पण वाचा :    बिहार निवडणुकीत ईव्हीएममध्ये घोटाळा ? 


दिल्लीतील दंगलीला मुसलमानांना दोषी ठरवण्यात आले. काय ही दंगल मुसलमानांनी भडकावली? ही गंभीर बाब असून तसा रिपोर्ट बनवण्यात आला. दिल्लीत केजरीवाल यांचे सरकार आहे. परंतु दिल्लीतील पोलीस केजरीवाल यांच्या अखत्यारित नाहीत तर ते केंद्र सरकारच्या अखत्यारित आहेत. मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त रिबेेरो यांना तुम्ही ऐकले असेल. त्यांनी म्हटले की, दिल्ली पोलीसांचे वर्तन कायद्यानुसार नाही. ज्या बाबींची त्यांनी तपासणी करायला हवी होती ती त्यांनी केली नाही. कायद्याला वेशीवर टांगून त्यांनी काम केले. हे समजून घेण्याची गरज आहे.


मेश्राम म्हणाले, सीएए, एनपीआर, एनआरसीच्या माध्यमातून आपल्याच लोकांना विदेशी घोषित करण्याचे मोठे षड्यंत्र आहे. कारण डीएनएनुसार ब्राम्हण विदेशी आहे. एससी, एसटी, ओबीसी ब्राम्हणांना विदेशी म्हणत आहेत, त्यावर पडदा टाकण्यासाठी ब्राम्हणांनी भारतातीलच लोकांना विदेशी ठरवण्यासाठी हा कायदा बनवला.जर पाकिस्तानातून आलेल्या लोकांना नागरिकत्व देण्याचा मुद्दा आहे तर १९५५ च्या कायद्यानुसार नागरिकत्व देता येऊ शकते. त्यासाठी २०१९ मध्ये वेगळा कायदा बनवण्याची गरज नव्हती. कायदा बनवला पाकिस्तानचे नाव घेऊन परंतु आसामधील १९ लाखांपेक्षा अधिक लोकांना विदेशी घोषित केले गेले असे का? यामध्ये १४ लाख एससी, एसटी, ओबीसी आहेत. त्या लोकांना येथे हिंदू म्हटले जाते. त्याच लोकांना त्यांनी विदेशी घोषित केले गेले आहे. ते लोक एससी, एसटी, ओबीसी आहेत हे षड्यंत्र समजणे गरजेचे आहे.


देशात ज्यावेळी कोरोनाने शिरकाव केला तेव्हा हेल्थ केअरचा ढाच्याचे प्रायव्हेटायझेशन करण्यात आले. म्हणजे कोरोना संकटापेक्षा त्यापेक्षा हे जास्त खतरनाक झाले. स्वातंत्र्य भारतात बेरोजगारी एवढ्या मोठ्या प्रमाणात कधीच पाहिलेली नाही. जे लोक केवळ हिंदू-मुसलमान विषयाला चालना देतात व लोकांना फसवण्याचा कार्यक्रम करतात. बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढल्याने अर्थव्यवस्थाही बरबाद झाली असा आरोपही मेश्राम यांनी केला.


कोरोना व्हायरसमुळे अर्थव्यवस्था बरबाद झाली असे सांगितले जात असले तरी कोरोना येण्याअगोदर अर्थव्यवस्था रसातळाला गेली होती. याबाबत जे आकडे उपलब्ध आहेत त्यावरून आपण बोलू शकतो. सारे धोरण व नीती उद्योगपतींच्या फायद्यासाठी बनवण्यात आली त्याचा हा परिणाम आहे. दोन-तीन उद्योगपतींच्या फायद्यासाठी नीती बनवण्यात आल्याने मुकेश अंबानी जगातील चौथ्या क्रमांकाचे श्रीमंत उद्योगपती बनले. हे आकड्यांच्या माध्यमातून प्रमाणित झाले आहे. एवढे मोठे षड्यंत्र लोकांविरोधात सुरू आहे. 


एवढे असूनही सरकारला याची का भीती वाटत नाही तर त्यांच्याकडे ईव्हीएम आहे. ईव्हीएम असल्यामुळे प्रत्येक वेळेला निवडणूक जिंकू शकतो असा त्यांचा होरा आहे. त्यासाठी लोकांना कशाला घाबरायला हवे अशी त्यांची धारणा बनली आहे. म्हणून याविरोधात देशव्यापी आंदोलन करण्याची गरज आहे. जनआंदोलन निर्माण करण्यासाठी आम्ही ६ लाख ५० हजार गावात एक लाख एक हजार केंद्र बनवण्याचा निर्णय घेतला आहे. या केंद्राच्या अधीन ५ किंवा ६ गावे असली तर ६ लाख गावात आमचे आंदोलन पोहचेल, त्यानंतर हे आंदोलन जनआंदोलनात रूपांतरित झालेले असेल. हे करण्यासाठी आम्ही कटीबध्द आहोत. कुठल्याही परिस्थितीत हे आम्ही करणार आहोत.  आमच्याकडे आंदोलन करण्यासाठी भारत मुक्ती मोर्चा नावाचे संघटन आहे व ज्या ऑफशुट विंग आहेत त्या माध्यमातून देशभरात जनआंदोलन करण्याची तयारी करावी लागेल. म्हणून योजनाबध्द पध्दतीने बुध्दी, पैसा, हुनर, श्रम, वेळ देऊन आंदोलन सफल करण्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे. असे केल्यास सफलता मिळू शकते असा आशावाद मेश्राम यांनी व्यक्त केला.

संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी वर्तविलेले लोकशाही समोरील धो
महिलांचा सन्मान आणि भारताचे संविधान
भारतीय संविधानाची प्रास्तविका समजली तरी जीवनाचं सार्थक
आधुनिक भारताचे निर्माते : विश्‍वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेड
आपला देश संविधानानुसार चालला आहे का?
संविधान मानणारे जागृत आहेत काय ? (भाग -१)
संविधान मानणारे जागृत आहेत का? (भाग-२)
मीडिया ट्रायल न घेण्याचे रिपब्लिक टीव्हीला आदेश द्या
शासकीय अधिकार्‍यांनी ३० नोव्हेंबरपर्यंत मालमत्तेची मा
नागरिकांच्या मालमत्तेवर सरकार कायमस्वरूपी कब्जा शकत ना
कृषी कायद्यांविरोधात शेतकर्‍यांचा आसूड कडाडला!
ईव्हीएमविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका
वेळ पडल्यास ओबीसींच्या मागण्यासाठी राज्यभर महामोर्चे क
लाचखोरीत भारत आशिया खंडात टॉपवर
शुल्क वाढ करणार्‍या खासगी शाळा राज्य सरकारलाही जुमानत न
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यावर डिसेंबरपासून नियमित सुनाव
पुण्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदींचा मार्ग अडवणार
राज्यात पथदिवे व पाणीपुरवठा योजनांच्या थकबाकीचा डोंगर
तपास केलेल्या कोणत्याही प्रकरणांत लव्ह जिहादचा संबंध न
केंद्र सरकारने आणखी ४३ मोबाइल ऍप्सवर घातली बंदी
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper