×

भीमा-कोरेगाव दंगलीची सुनावणीच होत नाही

Published On :    28 Sep 2020
साझा करें:

दंगल भडकावणार्‍या मिलींद एकबोटे, मनोहर कुलकर्णीला अभय- न्यायालयाचा दरवाजा ठोठावणार्‍या अनिता सावळे यांचा आरोप



भीमा-कोरेगाव: भीमा-कोरेगाव येथे दंगल भडकावणार्‍या मिलींद एकबोटे आणि मनोहर कुलकर्णी उर्फ संभाजी भिडेविरोधात आपण न्यायालयाचा दरवाजा ठोठावला परंतु या दंगल प्रकरणाची सुनावणीच होत नाही. दंगल भडकावणार्‍या एकबोटे, कुलकर्णी यांना अभय दिल्याचा आरोप दंगलीविरोधात तक्रार करणार्‍या अनिता सावळे यांनी केला आहे.


आपल्या जीवाला धोका असूनही सावळे यांनी पोलीसांचा पाठलाग सोडला नाही. या प्रकरणी त्वरीत कारवाई करावी अशी त्यांनी मागणी केली होती. पोलीस आपली भूमिका वठवत नसल्याचे पाहून अखेर सावळे यांनी मुंबई हायकोर्टाचा दरवाजा ठोठावला. दोन वर्षे नऊ महिने होऊनही एकबोटे, कुलकर्णी याच्यावर काय कारवाई होईल याची आशा मावळल्याचे त्यांनी सांगितले. यासंदर्भात शिक्रापूर पोलीसांनी आपण चौकशी केल्याचे सांगितले. परंतु कारवाई करण्यासाठी पोलीस महानिदेशक यांयाकडे फाईल पडून आहे. 



शिक्रापूर पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  त्याचा अहवाल आम्ही काही महिन्यांपूर्वी डीजीपी कार्यालयात पाठवला असे त्यांनी सांगितले. त्याचे आम्हांला उत्तर मिळालेले नाही. एकबोटे व कुलकर्णी याच्याविरोधात ऍट्रोसिटीअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डीजीपी कार्यालाद्वारे मंजुरी मिळाल्यानंतर ती फाईल गृह विभागाकडे पाठवण्यात येईल. तेथे मंजुरी मिळाल्यानंतर पोलीस चार्टशीट दाखल करायला मोकळे होतील असे शेलार यांनी सांगितले.


मी हिंसा करताना जवळून पाहिले. जवळपासच्या लोकांना मारले जात होते. आमच्या वाहनांना जाळण्यात आले. हल्ला करणारे एकबोटे व कुलकर्णी यांचा जयजयकार करत होते. माझ्या तक्रारीत हेच म्हणणे आहे. परंतु पोलीसांनी चौकशी करण्यासाठी विलंब लावला असा आरोपही सावळे यांनी केला आहे. भीमा-कोरेगाव दंगल व एल्गार परिषद हा विषय वेगवेगळा आहे. परंतु या विषयाची सरमिसळ केली जात आहे. पोलीसांनी एल्गार परिषदेतील लोकांना चुकीच्या पध्दतीने अटक केली आहे. भीमा-कोरेगाव दंगलीनंतर बहुजन युवकांना नाहक आरोपी बनवण्यात आले असाही आरोप सावळे यांनी केला आहे. दंगलीचा विषय देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना झाला. त्यांनी एकबोटे व कुलकर्णी याला वाचवले. आताचे महाविकास आघाडीचे सरकारही तेच करत आहे असेही सावळे यांनी स्पष्ट केले.

संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
मराठा आंदोलकांचा मुख्यमंत्र्यांना इशारा; ‘मातोश्री’वर
इंटरनेटच्या जाळ्यात अडकले अवघे विश्‍व
देशातील लोक बेरोजगारी, गरीबी, उपासमारीने त्रस्त प्रधानम
कांद्यानंतर आता बटाट्याने केले वांदे
गोहत्याच्या आरोप ठेवून ११ जणांना तुरूंगात
रिपब्लिक टीव्ही मुंबई पोलीसांच्या रडारवर
पैशाच्या वादातून अनु.जातीच्या सरपंचाच्या पतीला जिवंत ज
निवडणूक आयोग म्हणजे भाजपची एक शाखा
गुजरात विधानसभा पोटनिवडणुकीत १८ टक्के उमेदवार गुन्हेगा
आगार, बस स्थानके तारण ठेवण्याची एसटी महामंडळावर वेळ
संवेदनशील प्रकरणांवर बातमीदारी करणार्‍या मीडियासाठी म
चंद्रकांत पाटलांना घेराव.. नागरिकांच्या प्रश्‍नांना उत
इंदापूर आंदोलनाचा धसका घेत अखेर सरकार नमले
बिहारमध्ये वाढत्या बेरोजगारीच्या चक्रात जनता पिसली
बामसेफच्या ३७ व्या राष्ट्रीय अधिवेशनासाठी वामन मेश्राम
फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांविरोधात भोपाळमध्ये मुस्ल
आसाम एनआरसीमधून ‘अपात्र’ लोकांना हटविण्याच्या आदेशाला
जातींच्या लोकसंख्येनुसार आरक्षण द्या
महिला-युवतींवरील अत्याचाराविरोधात बहुजन क्रांती मोर्च
वरिष्ठांच्या कृपाशीर्वादामुळे राज्यभरात २२३ लाचखोर कर
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper