×

पोलिसांशी हुज्जत घालणारी प्रियांका १ वर्षे तुरुंगातच

Published On :    28 Sep 2020
साझा करें:

पोलिस व न्याय व्यवस्थेची दमनशाही



नवी मुंबई: संपूर्ण व्यवस्था विरोधात गेली, की सामान्य माणसाची ससेहोलपट कशी होते, याचे उत्तम उदाहरण म्हणजे प्रियांका मोगरे! ही कहाणी आहे, राग आणि अहंकाराची. पोलिसांच्या दमनव्यवस्थेची. सर्वसामान्यांचे हात किती ‘लांब’ असतात हे माहिती असणार्‍या पोलिस दलाची व न्यायव्यवस्थेची. वाहतूक पोलिसांशी हुज्जत घातल्याने, एक वर्षापूर्वी अटक करण्यात आलेली सानपाडा येथील ‘झोमॅटो गर्ल’ प्रियांका मोगरे जामीन न मिळाल्याने एक वर्षापासून तुरुंगात आहे.


प्रियांकाने रागाच्या भरात पोलिसांना शिवीगाळ केली आणि पोलिसांचा ‘अहंकार’ दुखावल्याने, अतिशय किरकोळ, छोट्या गुन्ह्यासाठी तिला वर्षभर तुरुंगात राहावे लागले. ८ ऑगस्ट २०१९ रोजी संध्याकाळी ५ वाजता वाशी येथील सेक्टर १७ मध्ये नो पार्कींग झोनमध्ये दुचाकी लावल्यावरून २७ वर्षांच्या प्रियांका मोगरे हिचा वाहतूक पोलिसांशी वाद झाला होता. तिच्या विरोधात वाशी येथील वाहतूक पोलिस शिपाई मोहन सरगर यांनी वाशी पोलिस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली. तिच्यावर सरकारी कामामध्ये अडथळा आणि दरोड्याचा प्रयत्न, शांततेचा भंग, धमकी देणे, अशा कलमान्वये गुन्हा दाखल करून केला आणि २० ऑगस्टला तिला अटक करण्यात आली होती.


प्रियांका ‘झोमॅटो’ कंपनीसाठी डिलिव्हरी देण्याचे काम करीत होती. तिचा पोलिसांशी वाद झाल्यानंतर पुढच्याच चौकामध्ये ४ पोलिसांनी तिला अडवून पोलिस ठाण्यात येण्याचे आदेश दिले. या सगळ्या प्रसंगाची व्हीडिओ क्लिप काढण्यात आली आणि सोशल मीडियावर प्रसिद्ध करण्यात आली. या प्रकरणातील दोन व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. ते व्हीडिओ अजूनही इंटरनेटवर उपलब्ध आहेत. व्हीडिओमध्ये प्रियांका पोलिसांना शिव्या देताना दिसते. मात्र पोलिसांचे वर्तनही तिच्याशी सभ्यपणाचे दिसत नाही. वाहतूक पोलिसही तिला वाईट शब्द वापरताना दिसतात. तिने शिवीगाळ केल्याचा आणि वाहतूक पोलिसांशी उद्धटपणे वर्तन केल्याचा वाहतूक पोलिसांचा आरोप होता. तर आपण गाडीजवळ उभे असतानाही वाहतूक पोलिसांनी आपला आणि गाडीचा फोटो काढल्याचा प्रियांकाचा आरोप होता.


दुसर्‍या व्हीडिओमध्ये ४ वाहतूक पोलिस प्रियांकाला घेरून तिच्याशी हुज्जत घालताना आणि तिचा व्हीडिओ काढताना दिसतात. तिही त्यांना शिव्या देताना दिसते. पोलिस तिला पोलिस ठाण्यात येण्याचे सांगताना दिसतात. प्रियांकावर यांपूर्वी हेल्मेट न घातल्याचा आणि दारू पिऊन गाडी चालवल्याचा गुन्हा असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. सोशल मीडियावर प्रसिद्ध झालेल्या या तरुणीला अगोदर पोलिस कस्टडी आणि नंतर न्यायालयीन कस्टडी मिळाली. तिला जामीन मिळण्यासाठीचा पहिला अर्ज फेटाळण्यात आला. नंतर तिला सप्टेंबर २०१९ मध्ये जामीन मंजूर करण्यात आला. मात्र तिच्या जामीनासाठी २ व्यक्तीही पुढे आल्या नाहीत. तेव्हापासून आजपर्यंत प्रियांका भायखळा येथील तुरुंगात आहे. तीन वर्षांची लहान मुलगी असणार्‍या, प्रियांकाची सोशल मीडियावर बदनामी झाली म्हणून तिच्या नजीकचे, जवळचे असे कोणीही तिच्या जामीनासाठी, अन्य मदतीसाठी पुढे आले नाहीत.

संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
मराठा आंदोलकांचा मुख्यमंत्र्यांना इशारा; ‘मातोश्री’वर
इंटरनेटच्या जाळ्यात अडकले अवघे विश्‍व
देशातील लोक बेरोजगारी, गरीबी, उपासमारीने त्रस्त प्रधानम
कांद्यानंतर आता बटाट्याने केले वांदे
गोहत्याच्या आरोप ठेवून ११ जणांना तुरूंगात
रिपब्लिक टीव्ही मुंबई पोलीसांच्या रडारवर
पैशाच्या वादातून अनु.जातीच्या सरपंचाच्या पतीला जिवंत ज
निवडणूक आयोग म्हणजे भाजपची एक शाखा
गुजरात विधानसभा पोटनिवडणुकीत १८ टक्के उमेदवार गुन्हेगा
आगार, बस स्थानके तारण ठेवण्याची एसटी महामंडळावर वेळ
संवेदनशील प्रकरणांवर बातमीदारी करणार्‍या मीडियासाठी म
चंद्रकांत पाटलांना घेराव.. नागरिकांच्या प्रश्‍नांना उत
इंदापूर आंदोलनाचा धसका घेत अखेर सरकार नमले
बिहारमध्ये वाढत्या बेरोजगारीच्या चक्रात जनता पिसली
बामसेफच्या ३७ व्या राष्ट्रीय अधिवेशनासाठी वामन मेश्राम
फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांविरोधात भोपाळमध्ये मुस्ल
आसाम एनआरसीमधून ‘अपात्र’ लोकांना हटविण्याच्या आदेशाला
जातींच्या लोकसंख्येनुसार आरक्षण द्या
महिला-युवतींवरील अत्याचाराविरोधात बहुजन क्रांती मोर्च
वरिष्ठांच्या कृपाशीर्वादामुळे राज्यभरात २२३ लाचखोर कर
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper