×

न्यायासाठी रस्त्यावर उतरले हजारो लोक

Published On :    27 Sep 2020
साझा करें:

ऍड.देवजीभाई महेश्‍वरी हत्या प्रकरण, ब्राम्हणवादी शक्तीविरोधात संतापाचा कडेलोट



कच्छ: गुजरात बामसेफचे वरिष्ठ कार्यकर्ते व इंडियन लीगल प्रोफेशनल असोसिएशनचे प्रभारी ऍड. देवजीभाई महेश्‍वरी यांची ब्राम्हणवादी शक्तींनी हत्या केली. त्यांना न्याय देण्यासाठी हजारो लोक रस्त्यावर उतरले. अद्यापही आरोपींना अटक करण्यात आलेले नाही. त्यामुळे ब्राम्हणवादी शक्तीविरोधात लोकांच्या संतापाचा कडेलोट झाला असून त्यांनी ठिकठिकाणी आंदोलन केले. आरोपींना पकडण्याचे आश्‍वासन पोलीसांनी दिले आहे. मात्र त्यांना मोकाट सोडले आहे. दरम्यान लोकांच्या संतापाला घाबरून अखेर या प्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटीची नेमणूक करण्यात आली आहे. पोलीस महानिरीक्षक जे.आर. मोथलिया यांच्या नेतृत्वाखाली ही चौकशी करण्यात येणार आहे. या एसआयटीमध्ये सात जणांचा समावेश आहे.


पोलीस प्रशासनाच्या चालढकल कारभारामुळे बामसेफ, भारत मुक्ती मोर्चा, बहुजन क्रांती मोर्चा, इंडियन लीगल प्रोफेशनल असोसिएशन, भारतीय विद्यार्थी मोर्चासहित शेकडो संघटनांनी गुजरातमध्ये उग्र प्रदर्शन केले. तथापि, देवजीभाई यांची पत्नी मीनाक्षीबेन या हजारो कार्यकर्त्यांसह २५ सप्टेंबर रात्रीपासून कच्छ जिल्ह्यातील रापर पोलीस ठाण्यासमोर धरणे प्रदर्शनाला बसली आहे. जोपर्यंत आम्हांला न्याय मिळत नाही व ९ आरोपींना पकडले जात नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणाहून हटणार नाही असा पवित्रा मीनाक्षीबेन यांनी घेतला आहे. सकाळ होताच हे आंदोलन सार्‍या गुजरातमध्ये उग्र झाले. मीनाक्षबेन यांना न्याय न मिळाल्यास हे आंदोलन उग्र होण्याचे संकेत मिळत आहेत.


स्थानिक सूत्रांनुसार कच्छ जिल्ह्याच्या १० तालुक्यांमध्ये मोठे आंदोलन करण्यात आले. अबडासार, अंजार, भचाऊ, भुज, गांधीधाम, लखपत, मांडवी, मुंद्रा, नखत्राणा, रापर या तालुक्यात आंदोलन करण्यात आले. सकाळी १० वाजता हे आंदोलन सुरू झाले. प्रत्येक रस्त्यावर हजारो लोक आले. सरकार मुर्दाबाद, पोलीस प्रशासन मुर्दाबाद अशा प्रकारे घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडण्यात आला. याशिवाय बडोदा, राजकोट, गांधीनगरसहित गुजरातच्या अन्य जिल्ह्यात कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. आरोपींना अटक करण्यात यावी अशी मागणी करण्यात येत होती. ९ आरोपींपैकी ६ आरोपींना पकडण्यात आल्याचे पोलीस सांगत आहेत, परंतु त्यांना अद्याप समोर आणलेले नाही. यावरून हा विषय शांत करण्यासाठी पोलीस खोटे बोलत आहेत. ६ आरोपींना पकडले आहे तर त्यांची नावे का जाहीर केली जात नाहीत. या हत्या प्रकरणातील मुक्ख्य आरोपी भरत जयंतीलाल रावल हा ब्राम्हण असल्याचे सांगितले जात आहे. त्याला वाचवण्यासाठी पोलीस खोटे बोलत नाहीत ना? अशी शंका घेतली जात आहे.


खरे तर या हत्येमागे जमीनीचा विषय आहे. लोहार समाजाची एक वाडी आहे. वाडी आणि आरोपींमध्ये एक खटला सुरू आहे. हा खटला घेण्यास कुणी राजी नव्हता. परंतु  हा खटला लढण्यास तयारी दर्शवली. आरोपी हे गुंड प्रवृत्तीचे आहेत. आरोपींची काही अधिकार्‍यांशी संपर्क आहे. लोहारवाडीतील लोकांना न्याय देण्यासाठी त्यांनी हा खटला हातात घेतला. त्यानंतर आरोपींनी धमकी देण्यास सुरूवात केली. या खटल्यात आपली जमीन जाईल याची भीती आरोपींना होती. त्यामुळे ते माझ्या पतीला धमकी देत होते की खटला लढवू नका अशी एफआयआर मीनाक्षीबेन यांनी नोंदवली आहे. परंतु हत्येमागे देवजीभाई यांच्या माध्यमातून करण्यात येणार्‍या ब्राम्हणविरोधी पोस्ट यामुळे त्यांची हत्या झाली असे ब्राम्हणवादी मीडिया सांगत आहे. काही वर्तमानपत्रांनी तशा बातम्या चालवल्या आहेत. रापर येथील भरत रावल या ब्राम्हणाने ब्राम्हण विरोधी पोस्ट टाकल्याने देवजीभाई यांना अनेकदा ठार मारण्याची धमकी दिली होती. एवढेच नव्हे तर देवजीभाई यांच्या कार्यालयात जाऊन त्यांना धमकी दिली होती. परंतु एफआयआरमध्ये फेसबुक पोस्टचा उल्लेख केला गेलेला नाही. जे.आर. मोथलिया यांच्यासह पोलीस अधिक्षक मयुर पाटील, व्ही.आर.पाटील, जे.टी.सोनारा, डी.एम.जाला, सी.बी.राठोड, एम. एम.जोशी हे एसआयटीच्या सदस्यांमध्ये समावेश आहे.

संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
मराठा आंदोलकांचा मुख्यमंत्र्यांना इशारा; ‘मातोश्री’वर
इंटरनेटच्या जाळ्यात अडकले अवघे विश्‍व
देशातील लोक बेरोजगारी, गरीबी, उपासमारीने त्रस्त प्रधानम
कांद्यानंतर आता बटाट्याने केले वांदे
गोहत्याच्या आरोप ठेवून ११ जणांना तुरूंगात
रिपब्लिक टीव्ही मुंबई पोलीसांच्या रडारवर
पैशाच्या वादातून अनु.जातीच्या सरपंचाच्या पतीला जिवंत ज
निवडणूक आयोग म्हणजे भाजपची एक शाखा
गुजरात विधानसभा पोटनिवडणुकीत १८ टक्के उमेदवार गुन्हेगा
आगार, बस स्थानके तारण ठेवण्याची एसटी महामंडळावर वेळ
संवेदनशील प्रकरणांवर बातमीदारी करणार्‍या मीडियासाठी म
चंद्रकांत पाटलांना घेराव.. नागरिकांच्या प्रश्‍नांना उत
इंदापूर आंदोलनाचा धसका घेत अखेर सरकार नमले
बिहारमध्ये वाढत्या बेरोजगारीच्या चक्रात जनता पिसली
बामसेफच्या ३७ व्या राष्ट्रीय अधिवेशनासाठी वामन मेश्राम
फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांविरोधात भोपाळमध्ये मुस्ल
आसाम एनआरसीमधून ‘अपात्र’ लोकांना हटविण्याच्या आदेशाला
जातींच्या लोकसंख्येनुसार आरक्षण द्या
महिला-युवतींवरील अत्याचाराविरोधात बहुजन क्रांती मोर्च
वरिष्ठांच्या कृपाशीर्वादामुळे राज्यभरात २२३ लाचखोर कर
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper