×

केंद्राकडून राज्यांची ४७ हजार २७२ कोटींची फसवणूक

Published On :    27 Sep 2020
साझा करें:

जीएसटी निधी बेकायदेशीर वापरला, कॅगने केला भंडाफोड



नवी दिल्ली: केंद्र सरकारकडून राज्यांचा हक्काचा जीएसटी परतावा दिला जात नाही. राज्यांची फसवणूक केली जाते याचा पुरावाच देशाच्या महालेखा परिक्षकांनी (कॅग) समोर आणला आहे. २०१७-१८ आणि २०१८-१९ या आर्थिक वर्षात जीएसटीने नुकसान भरून काढण्यासाठी ४७ हजार २७२ कोटी रूपयांचा निधी कन्सोलिडेटेड फंड ऑफइंडियामध्ये (सीएफआय)बेकायदेशीर ठेवला. ही रक्कम केंद्र सरकारने इतर कामांसाठी वापरली. हे कायद्याचे उल्लंघन आहे असे गंभीर ताशेरे ‘कॅग’ने आपल्या अहवालात मारले आहेत.


जमा केलेला उपकर आणि जीएसटी मोबदल्याचा उपकर निधी याचा परिक्षणामध्ये (संदर्भ ८,९ आणि १३) कॅगला अनेक त्रुटी आढळून आल्या आहेत. २०१७-१८ या आर्थिक वर्षात केंद्र सरकारने ४७ हजार २७२ कोटी रूपयांचा सीएफआयमध्ये ठेवली आणि इतर कामांसाठी वापरली. ही राज्यांची फसवणूक आहे. कमी रक्कम जमा करणे (शॉर्ट क्रेडीटींग) हे जीएसटी मोबदला उपकर कायदा २०१७ चे उल्लंघन आहे. जीएसटी मोबदला उपकर कायद्यानुसार जमा करण्यात आलेला उपकर हा नॉन लेप्सेबल आहे. 


हा पैसा जीएसटी मोबदला निधीमध्ये जमा करणे आवश्यक आहे. हा पैसा जनतेचा असतो. राज्यांच्या महसुलामध्ये झालेला तोटा भरून काढण्यासाठी हा विशेष निधी वापरला जातो. केंद्र सरकारने जीएसटी उपकर हा जीएसटी मोबदला निधीमध्ये ठेवण्याऐवजी सीएफआयमध्ये ठेवला आणि इतर कामांसाठी वापरला.२०१८-१९ च्या अर्थसंकल्पात ९० हजार कोटी ट्रान्सफर करण्यात येणार होते. तेवढीच रक्कम राज्यांना मोबदला म्हणून देण्यात येणार होती. ९५ हजार ८१ कोटी जीएसटी उपकर जमा झाला. पण महसूल खात्याने फक्त ५४ हजार २७५ कोटी ट्रान्सफर केले.


राज्य व केंद्र शासित प्रदेशांना मोबदला म्हणून ६९ हजार २७५ कोयी रूपये दिले. त्यातून ३५ हजार ७२५ कोटींची बचत झाली. त्यानंतर पुन्हा २० हजार ७२५ कोटी रूपयांचा मोबदला राज्यांना दिला गेला, पण ही रक्कम तुटपुंजी आहे. गेल्या आठवड्यात लोकसभेत जीएसटी परताव्याबाबत बोलताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी उपकराच्या माध्यमातून जेवढा पैसा जमा होता तेवढा पैसा राज्यांना दिला जातो. आता उपकरच जमा झाला नाही. तसेच सीएफआयमधून राज्यांची नुकसान भरपाई कायद्यानुसार देता येत नाही असे म्हटले होते. मात्र ‘कॅग’च्या अहवालाने केंद्र सरकारचा भंडाफोड झाला आहे.

संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
मराठा आंदोलकांचा मुख्यमंत्र्यांना इशारा; ‘मातोश्री’वर
इंटरनेटच्या जाळ्यात अडकले अवघे विश्‍व
देशातील लोक बेरोजगारी, गरीबी, उपासमारीने त्रस्त प्रधानम
कांद्यानंतर आता बटाट्याने केले वांदे
गोहत्याच्या आरोप ठेवून ११ जणांना तुरूंगात
रिपब्लिक टीव्ही मुंबई पोलीसांच्या रडारवर
पैशाच्या वादातून अनु.जातीच्या सरपंचाच्या पतीला जिवंत ज
निवडणूक आयोग म्हणजे भाजपची एक शाखा
गुजरात विधानसभा पोटनिवडणुकीत १८ टक्के उमेदवार गुन्हेगा
आगार, बस स्थानके तारण ठेवण्याची एसटी महामंडळावर वेळ
संवेदनशील प्रकरणांवर बातमीदारी करणार्‍या मीडियासाठी म
चंद्रकांत पाटलांना घेराव.. नागरिकांच्या प्रश्‍नांना उत
इंदापूर आंदोलनाचा धसका घेत अखेर सरकार नमले
बिहारमध्ये वाढत्या बेरोजगारीच्या चक्रात जनता पिसली
बामसेफच्या ३७ व्या राष्ट्रीय अधिवेशनासाठी वामन मेश्राम
फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांविरोधात भोपाळमध्ये मुस्ल
आसाम एनआरसीमधून ‘अपात्र’ लोकांना हटविण्याच्या आदेशाला
जातींच्या लोकसंख्येनुसार आरक्षण द्या
महिला-युवतींवरील अत्याचाराविरोधात बहुजन क्रांती मोर्च
वरिष्ठांच्या कृपाशीर्वादामुळे राज्यभरात २२३ लाचखोर कर
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper