×

नीरव मोदी, मेहुल चोक्सी यांनी चुना लावूनही पंजाब नॅशनल बँकेने ४४ हजार कोटी केले राईट ऑफ

Published On :    26 Sep 2020
साझा करें:

राईट ऑफ केलेल्या कर्जदारांची नावे गोपनीयतेच्या नावाखाली देण्यास टाळाटाळ



पंजाब: नीरव मोदी, मेहुल चोक्स यांनी हजारो कोटींचा चुना लावूनही पंजाब नॅशनल बँक ताळ्यावर येण्याचे नाव घेत नाही. पंजाब नॅशनल बँकेने ४४ हजार ५६४ रुपयांचे कर्ज राईट ऑफ केले असून, १०० कोटी रुपयांपेक्षा अधिक कर्ज असणार्‍या थकबाकीदारांचे ३१ हजार ९६६ कोटी राईट ऑफ केल्याचे उघड झाले आहे.


पंजाब नॅशनल बँकेने चार वर्षांमध्ये एकूण ४४ हजार ५६४ रुपयांचे कर्ज राईट ऑफ केले असून, त्यापैकी केवळ १२ हजार २८ कोटी रुपयेच वसूल झाले आहेत. १०० कोटी रुपयांपेक्षा जास्त कर्ज असणार्‍या मोठ्या थकबाकीदारांचे ३१ हजार ९६६ कोटी रुपयाचे कर्ज राईट ऑफ केले असून, त्यातील फक्त ७ हजार २८ कोटी रुपयांची वसूली झाली आहे. बँकेने थकबाकीदारांची नावे देण्यास नकार दिला असून, चार वर्षांपूर्वीची माहितीच उपलब्धच नसल्याचे बँकेचे म्हणणे आहे.


माहिती अधिकार कार्यकर्ते विवेक वेलणकर यांनी पंजाब नॅशनल बँकेने २०११-१२ ते २०१९-२० या आर्थिक वर्षांमध्ये १०० कोटी रुपयांपेक्षा अधिक कर्ज घेतलेल्या आणि राईट ऑफ केलेल्या कर्जांची आणि कर्जदारांची माहिती मागितली होती. तसेच यांपैकी किती कर्जांची वसूली झाली, याचीही माहिती मागितली होती.


बँकेने मात्र वेलणकर यांना अर्धवट माहिती दिली आहे. २०१६ पूर्वीची माहिती उपलब्ध नसल्याचे बँकेने कळविले असून, उरलेल्या ४ वर्षांत ३१ हजार ९६६ कोटी रुपये राईट ऑफ केल्याचे कळविले आहे.  ३१ मार्च २०२० पर्यंत त्यांपैकी ७ हजार २८ कोटी रुपयांची वसूली झाल्याचे कळविण्यात आले आहे. या राईट ऑफ केलेल्या कर्जदारांची नावे गोपनीयतेच्या नावाखाली देण्यात आलेली नाहीत.


वेलणकर म्हणाले, माहिती मुद्दामहून लपविण्यात येत आहे. यामध्ये कर्जदारांचे हितसंबंध जपले जात असून, हीच दयाबुद्धी मात्र छोट्या कर्जदारांबाबत दाखविली जात नाही. तेंव्हा गोपनीयता नसते का? वेलणकर म्हणाले, की त्यांनी बँकेच्या वेबसाईटचा अभ्यास केला असता त्यांच्या असे लक्षात आले की गेल्या १० वर्षांचे वार्षिक अहवाल उपलब्ध आहेत आणि त्या अहवालांचा जेंव्हा अभ्यास केला तेंव्हा असे दिसून आले की गेल्या आठ वर्षांत बँकेने तब्बल ६१ हजार ७४१ कोटी रुपये राईट ऑफ केले आहेत.


वेलणकर म्हणाले, की बँक जिथे स्वतःच्या संकेतस्थळावरील माहितीही बघत नाही, तिथे ते वसुलीसाठी काय प्रयत्न करीत असतील, हे उघड झाले आहे. ४ वर्षांपूर्वीची माहिती उपलब्ध नाही, याचा अर्थ त्यावेळची थकीत कर्जे माफ केली आहेत का? याचाच अर्थ राईट ऑफ म्हणजेच माफ केली असं होत नाही का? केंद्र सरकारने वसुलीसाठी कडक कायदे करूनही बँका त्यांची अंमलबजावणी करीत नाही. कर्जवसुली न करण्यात काही तरी हितसंबंध गुंतले आहेत आणि ते उघड होऊ नये म्हणून बँक बड्या कर्जदारांची माहिती देणे टाळत आहे. या बँकांच्या कामावर रिझर्व्ह बँकेचा आणि केंद्र सरकारचाही अंकुश नाही.

संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
मराठा आंदोलकांचा मुख्यमंत्र्यांना इशारा; ‘मातोश्री’वर
इंटरनेटच्या जाळ्यात अडकले अवघे विश्‍व
देशातील लोक बेरोजगारी, गरीबी, उपासमारीने त्रस्त प्रधानम
कांद्यानंतर आता बटाट्याने केले वांदे
गोहत्याच्या आरोप ठेवून ११ जणांना तुरूंगात
रिपब्लिक टीव्ही मुंबई पोलीसांच्या रडारवर
पैशाच्या वादातून अनु.जातीच्या सरपंचाच्या पतीला जिवंत ज
निवडणूक आयोग म्हणजे भाजपची एक शाखा
गुजरात विधानसभा पोटनिवडणुकीत १८ टक्के उमेदवार गुन्हेगा
आगार, बस स्थानके तारण ठेवण्याची एसटी महामंडळावर वेळ
संवेदनशील प्रकरणांवर बातमीदारी करणार्‍या मीडियासाठी म
चंद्रकांत पाटलांना घेराव.. नागरिकांच्या प्रश्‍नांना उत
इंदापूर आंदोलनाचा धसका घेत अखेर सरकार नमले
बिहारमध्ये वाढत्या बेरोजगारीच्या चक्रात जनता पिसली
बामसेफच्या ३७ व्या राष्ट्रीय अधिवेशनासाठी वामन मेश्राम
फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांविरोधात भोपाळमध्ये मुस्ल
आसाम एनआरसीमधून ‘अपात्र’ लोकांना हटविण्याच्या आदेशाला
जातींच्या लोकसंख्येनुसार आरक्षण द्या
महिला-युवतींवरील अत्याचाराविरोधात बहुजन क्रांती मोर्च
वरिष्ठांच्या कृपाशीर्वादामुळे राज्यभरात २२३ लाचखोर कर
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper