×

मंडल आयोग, गुजरात दंगल धडे वगळले

Published On :    25 Sep 2020
साझा करें:

आसाम १२ वी बोर्डाच्या अभ्सासक्रम मंडळाचा आततायीपणा



गुवाहाटीः आसामच्या १२ वी बोर्डाच्या अभ्यासक्रम मंडळाने आततायीपणा करत जवाहरलाल नेहरू, मंडल आयोग अहवाल, २००२ च्या गुजरात दंगली, अयोध्या व जातींशी निगडित प्रकरणे वगळण्यात आली आहेत. कोरोनाच्या महासाथीमुळे या आधीच १२ वी बोर्डाचा ३० टक्के अभ्यासक्रम वगळण्यात आला होता. त्यानंतर ही नवी प्रकरणे वगळण्यात आली आहेत. आसामच्या उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वेबसाइटवर ही माहिती देण्यात आली आहे. नवी प्रकरणे वगळण्याचा निर्णय राज्यातील शिक्षक संघटना, शिक्षणतज्ज्ञ यांच्याशी चर्चा करून घेण्यात आल्याचा कांगवा सरकारने केला आहे.


राज्यशास्त्राच्या अभ्यासक्रमातून वगळण्यात आलेली प्रकरणेः  पहिल्या तीन सार्वत्रिक निवडणुका, राष्ट्रनिर्मितीसंदर्भातील नेहरुंचा दृष्टिकोन, भूकबळी व पंचवार्षिक योजना, नेहरुंचे परराष्ट्र धोरण, नेहरुंनंतरचे त्यांचे उत्तराधिकार अशी प्रकरणे वगळण्यात आली. याशिवाय गरीबी हटाओची घोषणा, गुजरात नवनिर्माण आंदोलन, पंजाबवरचे संकट व १९८४ च्या शीख दंगली, मंडल आयोग अहवाल, युनायटेड फ्रंट व एनडीए सरकार, २००४ च्या लोकसभा निवडणुका व यूपीए सरकार, अयोध्या वाद व २००२ चे गुजरात दंगे ही प्रकरणे वगळण्यात आली आहेत.


कॉंग्रेस पक्ष व या पक्षाचा इतिहास, काश्मीर प्रश्न, चीन व पाकिस्तानविरोधात झालेली युद्धे, आणीबाणी, जनता पक्ष- भाजपचा उदय हे विषय कायम ठेवण्यात आले आहे. इतिहासाच्या अभ्यासक्रमातून समता, जाती व वर्ग व्यवस्था ही प्रकरणे वगळण्यात आली आहेत. त्याचबरोबर इंग्रजीतील मेमरीज ऑफ चाइल्डहूड हा धडा वगळला आहे. हा धडा अमेरिकेतल्या लेखिका व समाजसुधारक झित्कला सा व भारतातील अस्पृश्य तामिळ लेखिका व शिक्षक बामा यांच्या जीवनप्रवासावर आधारित आहे.

संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
उत्तर प्रदेशवर ६.०२ लाख कोटी तर महाराष्ट्रावर ५.०२ लाख को
अधिकाराचे उल्लंघन, ही कसली शोध पत्रकारिता?
घाऊक, किरकोळ बाजारातील भाज्यांचे दर कडाडले
टीआरपी घोटाळ्यात आणखी दोन वाहिन्या
पूरग्रस्त शेतकर्‍यांना फुटकी कवडी नाही, कपिल सिब्बलांस
सोशल मीडियावर मोदी पुन्हा ‘घायाळ’
बिहारमध्ये पहिल्या टप्प्यातील ३१ टक्के उमेदवारांवर फौज
महावितरणच्या कॉस्ट कटिंगचा ४६० कंत्राटी वीज कामगारांना
सीबीआय तपासासाठी राज्य सरकारची परवानगी लागणार
‘महाराष्ट्र द्वेषाने केंद्राला पछाडलेयं, प्रधानमंत्री
वायू प्रदूषणाच्या आजारांनी भारतात १६.७ लाख लोकांचा बळी
देशातील प्रत्येक तिसरे मूल उपासमारीचा बळी
भगत सिंह कोश्यारी यांनी ४७ लाखांचे घरभाडे थकवले
जागतिक स्तरावर भारताचा प्रभाव ओसरला, सर्वात प्रभावशाली
पालघर जिल्ह्यात बालमृत्यूने गाठले टोेक
कांदा पुन्हा एकदा डोळ्यातून पाणी काढणार ?
आर्थिक आधारावर आरक्षण द्या
शेवटी एकनाथ खडसे यांना ब्राम्हणांनी दाखवला बाहेरचा रस्
हाथरस बलात्कार रिपोर्टवर प्रश्‍न उपस्थित करणार्‍या डॉक
देवणी तालुक्यात ओला दुष्काळ घोषित करण्याची मागणी
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper