×

तब्बल ५ हजार ७४२ कोटींची वीज बिले थकली

Published On :    25 Sep 2020
साझा करें:

कोरोनामुळे आर्थिक संकटाचा फटका महावितरणलाही



मुंबई :  कोरोनामुळे कोसळलेल्या आर्थिक संकटाचा फटका महावितरणच्या बिल वसुलीवरही बसला. एप्रिल ते ऑगस्ट, २०२० या पाच महिन्यांत थकबाकी तब्बल ५ हजार ७४२ कोटींवर झेपावली. त्यात सर्वाधिक ३ हजार ५२१ कोटींची थकबाकी घरगुती वीज ग्राहकांकडे आहे. सरकारने केलेली आणि प्रत्यक्षात न आलेली वीज बिल माफीची घोषणा हेसुद्धा यामागचे प्रमुख कारण असल्याचे महावितरणच्या अधिकार्‍यांचे म्हणणे आहे.


एप्रिल ते ऑगस्ट, २०१९ या कालावधीत घरगुती वीज ग्राहकांना ८ हजार ९४९ कोटींची बिले पाठविण्यात आली होती. त्यापैकी ८ हजार १०७ कोटींचा भरणा ग्राहकांनी केला. यंदा याच कालावधीत महावितरणने ९ हजार १० कोटींची बिले पाठवली असून ग्राहकांनी जेमतेम ५ हजार ४८९ कोटीच जमा केल्याची माहिती हाती आली आहे.


मार्च ते मे या महिन्यांतील सरासरी बिलांमुळे घरगुती वीज ग्राहकांना जून आणि जुलैमध्ये भरमसाट बिले आली होती. त्याविरोधात असंतोष निर्माण झाल्यानंतर सरकारने या वीज बिलांमध्ये सवलत देण्याची घोषणा केली. मात्र, सवलत दिल्यास राज्याच्या तिजोरीवर भार वाढेल, अशी सबब देत वित्त विभागाने प्रस्तावित बिल माफीला अद्याप हिरवा झेंडा दाखविलेला नाही. वीज बिले माफ होतील या आशेपोटी अनेकांनी बिलांचा भरणा नाही. यापुढेही काहीतर होईल आणि बिले माफ होतील, या आशेवर अनेक ग्राहक असल्याचे अधिकार्‍यांचे म्हणणे आहे.


कोरोना संक्रमणाच्या पहिल्या टप्प्यात औद्योगिक कारखाने बंद होते. अनलॉक प्रक्रियेदरम्यान निर्बंध शिथिल करण्यात आले. त्यानंतर वीज मागणीत वाढ झाली. गेल्या पाच महिन्यांत राज्यातील औद्योगिक वीज ग्राहकांना १० हजार ३७२ कोटींची बिले दिली असून त्यापैकी ८ हजार ८८२ कोटींचा भरणाही झाला आहे. महावितरणने पाच महिन्यांत एकूण २२ हजार ५९ कोटींची बिले पाठवली असून त्यापैकी १६ हजार ३२६ कोटींची वसुली झाली आहे. सर्वाधिक औद्योगिक ग्राहकांकडे १ हजार ४९० आणि व्यावसायिक ग्राहकांकडे ७३१ कोटींची थकबाकी आहे.

व्यावसायिक आस्थापनांचे आस्ते कदम
अनलॉकच्या टप्प्यात व्यावसायिक आस्थापनांना परवानगी दिली जात असली तरी त्यांचा वापर आजही पूर्ण क्षमतेने होत नाही. त्यामुळे तेथील विजेची मागणी ३४ टक्क्यांनी कमीच आहे. गेल्या पाच महिन्यांत या आस्थापनांना २ हजार ६७७ कोटींची बिले देण्यात आली असून त्यापैकी १ हजार ९४६ कोटींची बिले या व्यावसायिकांनी भरली आहेत.

संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
उत्तर प्रदेशवर ६.०२ लाख कोटी तर महाराष्ट्रावर ५.०२ लाख को
अधिकाराचे उल्लंघन, ही कसली शोध पत्रकारिता?
घाऊक, किरकोळ बाजारातील भाज्यांचे दर कडाडले
टीआरपी घोटाळ्यात आणखी दोन वाहिन्या
पूरग्रस्त शेतकर्‍यांना फुटकी कवडी नाही, कपिल सिब्बलांस
सोशल मीडियावर मोदी पुन्हा ‘घायाळ’
बिहारमध्ये पहिल्या टप्प्यातील ३१ टक्के उमेदवारांवर फौज
महावितरणच्या कॉस्ट कटिंगचा ४६० कंत्राटी वीज कामगारांना
सीबीआय तपासासाठी राज्य सरकारची परवानगी लागणार
‘महाराष्ट्र द्वेषाने केंद्राला पछाडलेयं, प्रधानमंत्री
वायू प्रदूषणाच्या आजारांनी भारतात १६.७ लाख लोकांचा बळी
देशातील प्रत्येक तिसरे मूल उपासमारीचा बळी
भगत सिंह कोश्यारी यांनी ४७ लाखांचे घरभाडे थकवले
जागतिक स्तरावर भारताचा प्रभाव ओसरला, सर्वात प्रभावशाली
पालघर जिल्ह्यात बालमृत्यूने गाठले टोेक
कांदा पुन्हा एकदा डोळ्यातून पाणी काढणार ?
आर्थिक आधारावर आरक्षण द्या
शेवटी एकनाथ खडसे यांना ब्राम्हणांनी दाखवला बाहेरचा रस्
हाथरस बलात्कार रिपोर्टवर प्रश्‍न उपस्थित करणार्‍या डॉक
देवणी तालुक्यात ओला दुष्काळ घोषित करण्याची मागणी
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper