×

देशात बलात्कार व बाल लैंगिक अत्याचार वाढले

Published On :    24 Sep 2020
साझा करें:

गेल्या सहा महिन्यात १३ हजार २४४ सामुहिक बलात्काराच्या तक्रारी-केंद्र सरकारची माहिती



नवी दिल्ली:  भारत देश महिलांसाठी सुरक्षित नसल्याचा पुन्हा एकदा प्रत्यय आला आहे. देशात बलात्कारांच्या संख्येत वाढ झाली असून गेल्या सहा महिन्यात १३ हजार २४४ सामुहिक बलात्काराच्या तक्रारी दाखल झाल्या आहेत. केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री स्मृती इराणी यांनी मंगळवारी संसदेत ही माहिती दिली. त्यामुळे महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.


राज्यसभेत एका प्रश्‍नाच्या लेखी उत्तरात इराणी यांनी राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाकडे (एनसीपीसीआर) १ मार्च ते ३१ ऑगस्ट दरम्यान बाल लैंगिक अत्याचाराच्या ४२० तक्रारी आल्या असल्याचे सांगितले. नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरो (एनसीआरबी) ने दिलेल्या माहितीनुसार राष्ट्रीय सायबर गुन्हे अहवाल पोर्टलवर १८ सप्टेंबर या कालावधीत बाल अश्‍लीलता, बलात्कार आणि सामूहिक बलात्काराशी संबंधित एकूण तक्रारींची संख्या १३ हजार २४४ आहे. 


चाइल्ड लाईन इंडिया फाउंडेशनला (सीआयएफ) १ मार्च ते १५ सप्टेंबर २०२० पर्यंत बाल लैंगिक अत्याचारासंदर्भात ३ हजार ९४१ कॉल प्राप्त झाले आहेत. राष्ट्रीय महिला आयोगाचा आकडेवारी शेअर करताना १ मार्च ते २० सप्टेंबर या कालावधीत देशांतर्गत महिला हिंसाचाराच्या ४ हजार ३५० तक्रारी प्राप्त झाल्या आहेत, तर याच काळात महिलांवरील घरगुती अत्याचारांची संख्या २९८ आहे.  एप्रिलमध्ये घरगुती हिंसाचाराच्या ३१५ तक्रारींसह एकूण ८०० तक्रारी प्राप्त झाल्या. घरगुती हिंसाचाराच्या ३९३ तक्रारींसह मे महिन्यात एकूण १ हजार ५०० तर जूनमध्ये ४६१ तक्रारींसह एकूण २ हजार ४३ तक्रारी प्राप्त झाल्या.


एप्रिलच्या सुरुवातीला लॉकडाऊनमुळे वाढीव घरगुती हिंसाचाराच्या घटनांवर राष्ट्रीय महिला आयोगाने चिंता व्यक्त केली होती. मार्चच्या पहिल्या आठवड्यात एनसीडब्ल्यूला देशभरातील महिलांवरील अत्याचाराच्या ११६ तक्रारी आल्या. परंतु लॉकडाऊन दरम्यान, घरगुती हिंसाचाराच्या तक्रारी २३ ते ३१ मार्च पर्यंत २५७ पर्यंत वाढल्या. याशिवाय जगभरात लॉकडाऊन दरम्यान वाढत्या घरगुती हिंसाचाराच्या घटनांवरही संयुक्त राष्ट्रांनी चिंता व्यक्त केली होती. युनायटेड नेशन्सचे सरचिटणीस अँटोनियो गुतारारे यांनी या परिस्थितीत सरकारांकडून ठोस कारवाई करण्याची मागणी केली होती.

संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
अर्णब गोस्वामीच्या ‘रिपब्लिक’विरोधात आणखी एक गुन्हा
राज्याचा हक्काचे जीएसटीचे ३८ हजार कोटी केंद्र सरकारने थ
डॉक्टरांची तडकाफडकी हकालपट्टी करण्याचा निर्णय तीन दिवस
संसदीय समितीकडून फेसबुकच्या अंखी दास यांची चौकशी
कांद्याचे भाव भिडले गगनाला
टीव्ही वाहिन्या व सोशल मीडियाकडून भारतीय समाजात फूट पाड
पूर्वीचे पत्रकार तटस्थ आणि जबाबदार, आता प्रसारमाध्यमां
हाथरस पुन्हा एकदा हादरले
बेकायदा फी वसुलीवरुन शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड - राज्य
काश्मीरचा झेंडा परत मिळेपर्यंत कोणत्याही झेंड्याला सला
मोदींनी आपल्या मित्रासाठी अंथरला लाल गालिचा
मराठा आरक्षणाच्या स्थगितीचा फटका एमपीएससीच्या यशस्वी व
टीआरपी घोटाळा, एका चॅनेलच्या बँक खात्यात आले ७०-८० कोटी
गडचिंचले हत्या प्रकरणी ३२ आरोपींना १५ दिवसांची न्यायाल
पाकिस्तान, बांग्लादेशपेक्षा भारत कर्जाच्या खाईत डुबणार
आता एमटीएनएल काढली विक्रीला
पूर्वी जाती-धर्माच्या तर आता व्हॅक्सिनच्या नावावर वाटण
एसटी महामंडळाची ४० टक्के ई- तिकीट मशिन नादुरूस्त
ही मदत आम्हाला मान्य नाही, शेतकरी तुमच्या दारात भिकेचे क
अखेर एकनाथ खडसेंच्या हाती राष्ट्रवादीचे घड्याळ
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper