×

२४ सप्टेंबर १८७३ सत्यशोधक समाजाची स्थापना- राष्ट्रपिता महात्मा ज्योतीराव फुले

Published On :    24 Sep 2020
साझा करें:

राष्ट्रपिता महात्मा ज्योतीराव फुले यांनी २४ सप्टेंबर १८७३ रोजी सत्यशोधक समाजाची स्थापना पुण्यामध्ये केली. २४ सप्टेंबर हा दिवस म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा द्वितीय राज्याभिषेक याच दिवशी झालेला होता आणि त्यामुळेच महात्मा फुले यांनी या दिवसाची निवड केली असावी.राष्ट्रपिता महात्मा ज्योतीराव फुले यांनी २४ सप्टेंबर  १८७३ रोजी सत्यशोधक समाजाची स्थापना पुण्यामध्ये केली. २४ सप्टेंबर हा दिवस म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा द्वितीय राज्याभिषेक याच दिवशी झालेला होता आणि त्यामुळेच महात्मा फुले यांनी  या दिवसाची निवड केली असावी. छत्रपती शिवाजी महाराजांकडून प्रेरणा घेऊन याच दिवशी त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. प्रस्थापित समाज कर्मकांड, रूढी-परंपरा पुरोहितशाही यामध्ये पूर्णपणे बंदिस्त झाला होता. आपल्या बांधवांची दशा पाहून महात्मा फुले यांचे मन हळहळत असे. बहुजनांच्या दुरवस्थेचे पहिले कारण म्हणजे अज्ञान होय. हे त्यांनी ओळखले होते. अज्ञानात जीवन जगत असल्यामुळे लोकांना गुलामगिरीचे ओझे वाटत नव्हते. समाजाला गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी समविचारी लोकांना घेऊन महात्मा फुलेंनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली.


सर्वसाक्षी जगत्पती!! त्याला नकोच मध्यस्थी!! हे सत्यशोधक समाजाचे घोषवाक्य होते. निर्मिकाचा  धर्म सत्य आहे. मग भांडणे अनेक  कशासाठी अशी विचारधारा महात्मा फुले यांची होती. अज्ञानापोटी लोक वेगवेगळ्या प्रकारचे कर्मकांड करतात व नाडले जातात. त्यामुळे त्यांना शिक्षण घेण्याची सद्बुद्धी सुचत नाही. अशी त्या काळातील बहुजनांची दशा होती. यातून त्यांना बाहेर काढण्यासाठी अंतिम सत्याची व बहुजनांची भेट घालून देण्यासाठी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. समाजातील दीनदुबळ्या लोकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी व मानवता धर्माची प्रेरणा देण्यासाठी सत्यशोधक समाजाची आवश्यकता होती.


महात्मा ज्योतीराव फुले यांचा ग्रंथप्रामाण्याला विरोध होता. वेदवाक्य प्रमाणम! त्यांना मान्य नव्हते. मुळात त्यांना चातुर्वर्ण्यव्यवस्थाच मान्य नव्हती. महात्मा फुले यांनी सर्व धर्माचा अभ्यास केला होता . धर्माच्या नावाने शुद्र अतिशुद्र  स्त्रियांची जी दुर्दशा झाली होती. ती त्यांना मान्य नव्हती. धर्माच्या नावाखाली कर्मकांड , रूढी , परंपरा याद्वारे बहुजनांना लुटले जात होते. महात्मा फुले यांना मानवता धर्म अभिप्रेत होता व ब्राम्हणी धर्म हा त्यांच्या अपेक्षा पूर्ण करणारा नव्हता. म्हणून त्यांनी ब्राम्हण धर्म नाकारला व सत्यशोधक समाजाची स्थापना केली .सत्यशोधक समाजाचा प्रमाणग्रंथ म्हणजे सार्वजनिक सत्यधर्म होय !
महात्मा फुले म्हणतात, निर्मिकाची  भक्ती निरपेक्ष भावनेने करावी. त्यात कोणाचीही मध्यस्थी नसावी. महात्मा फुलेंना विज्ञानवादी, मानवतावादी, समतावादी धर्म अपेक्षित होता. त्यांना स्वर्ग-नरक नामस्मरण, अनुष्ठान, पुनर्जन्म या संकल्पना मान्य नव्हत्या. निर्माणकर्ता  एकच आहे मग त्याने निर्माण केलेल्या प्रत्येक गोष्टीवर सर्वांचा हक्क असावा अधिकार असावा. विशिष्ट एखादी नदी पवित्र कशी?कोणी पवित्र कोणी अपवित्र? कोणी श्रेष्ठ तर कोणी कनिष्ठ असा भेदभाव कोणी निर्माण केला. धर्मग्रंथ हे ईश्वराने नाहीतर मानवाने निर्माण केलेले आहेत. म्हणूनच त्यात असा भेदभाव करण्यात आला. असा क्रांतिकारी विचार महात्मा ज्योतीराव फुले यांनी मांडला. महात्मा ज्योतीराव फुले यांना मुर्तीपुजा मान्य नव्हती. पूजाअर्चा नैवेद्य या गोष्टी मान्य नव्हत्या. ते म्हणतात,  ईश्वराने निर्माण केलेल्या वस्तूचा त्याला उलटा नेवेद्य कसा दाखवता?  ग्रह, शनी, जन्मरास,  जन्मपत्रिका याविषयी विज्ञानवादी विचार महात्मा फुले मांडतात.  हे विचार जर आपल्या उच्चशिक्षित लोकांनी अंगीकारले असते, तर ते अशा प्रकारे अंधश्रद्धेचे बळी ठरले नसते. शनीच्या पिडेविषयी महात्मा फुले म्हणतात,
 ग्रहामाजी शनि आकाशी रमला
 तुझ्या पायी  येथे कैसा

 आजही विज्ञान शिकलेले लोक उच्चविद्याविभूषित लोक शनिवारी शनीचा उपवास करतात. काय तर म्हणे शनीच्या पीडेपासून वाचण्यासाठी हा खटाटोप आणि हो हा उपवास पकडणारे पुरुष मंडळी असतात. नेहमी उपवासवरून स्त्रियांना बोलले जाते. मात्र आमचे पुरुष बांधवही कुठे मागे नाहीत. माफ करा पण महात्मा फुलेंचे विचार स्वीकारले असते, तर अशा थोतांडात आपण पडलो नसतो. महात्मा फुले यांनी सर्वप्रथम अंधश्रद्धेविरुद्ध आवाज उठवला. शूद्रातिशूद्रांची, स्त्रियांची गुलामगिरी त्यांना मान्य नव्हती. कर्मकांडाच्या नावाखाली बहुजनांना लुटले जाई. विवाह प्रसंगी उलट सुलट विधी करून बहुजनांचे विवाह लावले जात. त्यासाठी त्यांनी पुरोहिताशिवाय विवाह लावले. मराठीत मंगलाष्टके रचली. सत्यशोधक पद्धतीने पहिला विवाह घडवून आणला. ज्ञानोबा निंबाळकर यांची मुलगी राधा हिचा विवाह सिताराम जम्बाजी अल्लाट यांच्याशी सत्यशोधक पद्धतीने संपन्न झाला. या विवाहाला देशभरातून विरोध झाला. परंतु ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले डगमगले नाहीत. जे जे विधी पुरोहिताकडून केले जात होते, ते सर्व विधी ब्राह्मणेतरांकडून करून घेण्याचा आग्रह धरला.विवाह, दशपिंडविधी, वास्तुशांती वगैरेसारखे विधी  पुरोहिताशिवाय संपन्न होऊ लागले.


सत्यशोधक समाजाची स्थापना झाल्यावर बहुजनांमध्ये शिक्षणाची आवड निर्माण झाली. सत्यशोधक समाजाच्या वतीने विविध कार्यक्रम संपन्न होत. दर पंधरा दिवसातून एक व्याख्यान आयोजित केले जाई. वर्षातून चार सभा घेतल्या जाई. लोकशाही पद्धतीने कार्यकारी मंडळाची निवड बहुमताने केली जाई. विषमता नष्ट करून तळागाळातील लोकांपर्यंत शिक्षण पोहोचवणे हा उद्देश होता. गरीब विद्यार्थ्यांना शिष्यवृत्त्या देण्यात येई. गरीब विद्यार्थ्यांसाठी आर्थिक मदत तसेच वस्तीगृह चालवले जाई. समाजातील दीनदुबळ्या लोकांना मदत पुरविली जाई. शुद्र अतिशुद्र, स्त्रिया या समाजातील पीडित लोक या चळवळीकडे आकर्षित झाले होते. कारण ही चळवळ जनसामान्यांसाठी होती. सत्यशोधक चळवळीचे कार्य वेगवेगळ्या पद्धतीने सुरू होते. १८७९ मध्ये स्त्रियांच्या निबंधवाचनाचा समारंभ थेटरमध्ये ठेवण्यात आला होता. शेतकर्‍याच्या दूरस्थिती व पिळवणुकीविरुद्ध  बारामती तालुका चिंचोली गावात १८८० मध्ये शेतसारा, कर्ज, सक्तीचे शिक्षण इत्यादी ठराव संमत केले होते. सत्यशोधक समाजाचे खंदे पुरस्कर्ते नारायण मेघाजी लोखंडे यांनी सत्यशोधक समाजाच्या प्रेरणेने मुंबईमध्ये मिलहॅन्ड असोसिएशनची स्थापना केली.  याद्वारे कामगाराचे महत्वाचे प्रश्न सोडवले जात होते. कृष्णराव भालेकर यांनी विदर्भ मध्यप्रदेशात चळवळीचा प्रसार केला. सत्यशोधक चळवळीचे पहिले अधिवेशन १९११ साली  झाले. त्याचे अध्यक्षपद स्वामी व्यंकय्या अय्यावारू यांच्याकडे होते. २००७ पर्यंत सत्यशोधक चळवळीचे एकूण ३५ अधिवेशने झाली.


सत्यशोधक चळवळीअंतर्गत प्रचार-प्रसारासाठी दीनबंधू, सत्सार, सत्य दीपिका, सुबोधपत्रिका, इंदुप्रकाश , प्रमोद सिंधू इत्यादी वृत्तपत्राद्वारे सार्वजनिक सत्य मांडले जाई. वृत्तपत्रे हा समाजाचा आधारस्तंभ आहे. त्यासाठी वृत्तपत्राने नेहमी सत्य आणि सत्यच मांडले पाहिजे अशी त्यांची भूमिका होती. सार्वजनिक सत्यधर्माचे एकूण ३३ सत्यवर्तनाचे नियम दिले आहेत. त्यानुसार प्रत्येक स्त्री-पुरुषाला वर्तन करावे लागेल. प्रत्येक नियमांमध्ये स्त्री व पुरुष असा स्वतंत्र उल्लेख करण्यात आला. ब्राम्हणी धर्माने स्त्रीला दुय्यम स्थान दिले. तर सार्वजनिक सत्यधर्माने स्त्रियांना मानाचे स्थान दिले. सत्यवर्तनाचे ३३ नियम म्हणजे तेहतीस कोटी देवांना नाकारणारे नियम आहेत. सत्यवर्तन केल्याशिवाय मानव प्राणी सुखी होणार नाही, असे महात्मा फुले म्हणतात. म्हणून सार्वजनिक सत्यधर्मामध्ये सत्यवर्तनाला  महत्त्वाचे स्थान दिले आहे. प्रत्येक मानवाने सत्याने आचरण केल्यास कुणावरही  काही अन्याय, अत्याचार होणार नाही. कोणत्याही पुरुषाने स्त्रियांच्या मानवी हक्काच्या आड येऊ नये.  हा महत्त्वाचा नियम या ३३ नियमांमध्ये दिलेला आहे. सार्वजनिक सत्यधर्मानुसार प्रत्येक मानवाने आचरण केल्यास, प्रत्येक मानव सुखासमाधानाने जीवन जगेल. आजही प्रत्येक बहुजनाने या पद्धतीने जीवन जगले तर त्यांच्या जीवावर जगणारी व्यवस्था नष्ट होईल.
महात्मा फुले यांच्या मृत्यूनंतर सावित्रीबाई फुले यांनी सत्यशोधक समाजाची धुरा सांभाळली. त्या सत्यशोधक समाजाच्या राष्ट्रीय अध्यक्ष झाल्या. कारण ही चळवळ पुण्यापुरती मर्यादित राहिली नाही. तर राष्ट्रीय चळवळ झाली होती. १८९६ च्या दुष्काळातील सावित्रीबाईंचे कार्य उल्लेखनीय होते. त्यानंतर सत्यशोधक चळवळीचा विचार महाराष्ट्रात नेण्याचे काम राजर्षी शाहू महाराजांनी केले. सत्यशोधक चळवळीत शाहू महाराजांचे योगदान महत्वाचे आहे.  जागृती या पत्राने शाहू महाराजांवरील मृत्यूलेखात शाहूंच्या मृत्यूमुळे सत्यशोधक चळवळीचा हात गळून पडला असे म्हटले होते. लोकांचा सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक,  सांस्कृतिक विकास व्हावा यासाठी सत्यशोधक चळवळ कार्यरत होती. आजही सत्यशोधक विचारांची समाजाला गरज आहे.


महात्मा फुले यांच्या सत्यशोधक चळवळीच्या विचारानुसार आज त्यांच्या प्रत्येक अनुयायाने आचरण करणे आवश्यक आहे. काही प्रमाणात काही ठिकाणी आज सत्यशोधक पद्धतीने विवाह होत आहेत . ही उल्लेखनीय बाब आहे. विवाहाप्रमाणेच सत्यशोधक पद्धतीने दशक्रियाविधी, वास्तुशान्ती वगैरे विधी झाले तर बहुजनांची होणारी लूट कमी होईल. बहुजनांच्या कष्टावर जगणारी व्यवस्था नष्ट होईल. समाज शिक्षणाकडे आकर्षित होईल. विज्ञानवादी पिढी निर्माण होईल. मंदिरात जाणारे लोक ग्रंथालयात जातील. बहुजनांना आपला इतिहास समजेल आणि इतिहास समजला तरच ते आपलं उज्ज्वल भविष्य घडवू शकतील. त्यासाठी सत्यशोधक विचारांची खरी गरज आहे. चला तर मग महात्मा फुलेंच्या सत्यशोधक  चळवळीच्या विचारांचा अंगीकार करू आणि आपल्या पुढच्या पिढीला सकारात्मक दृष्टिकोन देऊ!!

मनिषा अनंता अंतरकर (जाधव)
७८२२८२८७०८

संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
अर्णब गोस्वामीच्या ‘रिपब्लिक’विरोधात आणखी एक गुन्हा
राज्याचा हक्काचे जीएसटीचे ३८ हजार कोटी केंद्र सरकारने थ
डॉक्टरांची तडकाफडकी हकालपट्टी करण्याचा निर्णय तीन दिवस
संसदीय समितीकडून फेसबुकच्या अंखी दास यांची चौकशी
कांद्याचे भाव भिडले गगनाला
टीव्ही वाहिन्या व सोशल मीडियाकडून भारतीय समाजात फूट पाड
पूर्वीचे पत्रकार तटस्थ आणि जबाबदार, आता प्रसारमाध्यमां
हाथरस पुन्हा एकदा हादरले
बेकायदा फी वसुलीवरुन शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड - राज्य
काश्मीरचा झेंडा परत मिळेपर्यंत कोणत्याही झेंड्याला सला
मोदींनी आपल्या मित्रासाठी अंथरला लाल गालिचा
मराठा आरक्षणाच्या स्थगितीचा फटका एमपीएससीच्या यशस्वी व
टीआरपी घोटाळा, एका चॅनेलच्या बँक खात्यात आले ७०-८० कोटी
गडचिंचले हत्या प्रकरणी ३२ आरोपींना १५ दिवसांची न्यायाल
पाकिस्तान, बांग्लादेशपेक्षा भारत कर्जाच्या खाईत डुबणार
आता एमटीएनएल काढली विक्रीला
पूर्वी जाती-धर्माच्या तर आता व्हॅक्सिनच्या नावावर वाटण
एसटी महामंडळाची ४० टक्के ई- तिकीट मशिन नादुरूस्त
ही मदत आम्हाला मान्य नाही, शेतकरी तुमच्या दारात भिकेचे क
अखेर एकनाथ खडसेंच्या हाती राष्ट्रवादीचे घड्याळ
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper