×

कुणी करतोय मजुरी, कुणी सुरू केला हातगाडीवर व्यवसाय

Published On :    3 Aug 2020
साझा करें:

एसटी कर्मचार्‍यांची वेतनाअभावी होतेय उपासमार



अकोला: साडेचार महिन्यांपासून राज्यातील सार्वजनिक परिवहन सेवा बंद आहे. त्यात एसटी बस सेवाचाही समावेश आहे. बसची चाके थांबली असल्याने महामंडळाकडून कर्मचार्‍यांचे वेतनही थांबवण्यात आले आहे. अशा परिस्थितीत एसटी कर्मचार्‍यांवर उपासमारीची वेळ आली आहे. कुटुंबाचा गाडा हाकण्यासाठी कुणावर मजुरी करण्याची वेळ आली आहे तर कुणी दुसर्‍याच्या शेतात राबतो आहे. कुणी हातगाडीवर व्यवसाय सुरू करून उदर्निवाहाचे साधन शोधले आहे.


मार्चच्या शेवटच्या आठवड्यापासून सरकारने एसटीचे चाक रुतवून ठेवले आहे. त्यामुळे दररोज एसटी महामंडळाला मिळणारे २२ कोटी उत्पन्न बुडत आहे. आजवर महामंडळाचे जवळजवळ २ हजार ६४० कोटी रुपयांचे उत्पन्न बुडाले आहे. परिवहन मंत्री आणि संबंधित विभाग याबाबत अजिबात गंभीर आणि संवेदनशील नाही. त्यातच कंत्राटी सेवा देणारे कर्मचारी कमी करण्याचे आणि सक्तीने सेवा निवृत्ती देण्याचा सपाटा सरकारने सुरू केला आहे.


हे पण वाचा: ६ सरकारी बँका खासगीकरणाच्या वरवंट्याखाली भरडणार


गेली चार महिने अधिकारी व कर्मचार्‍यांचे वेतन देण्याची उपाययोजना आखण्याची तसदी देखील सरकार घेत नाही. अनेक महामंडळे व सरकारी कार्यालये पूर्ण क्षमतेने सुरू नाहीत. लॉकडाऊनच्या कालावधित सर्व सरकारी कार्यालये बहुतांशी बंद होती. परंतु त्यांचे वेतन चार महिने थांबले नाही. तोटा वाढल्याने महामंडळाची आर्थिक अवस्था बिकट झाली, हे कारण सांगून एसटी कर्मचर्‍यांना वेठीस धरले जात आहे. त्यातच ९० हजार कर्मचार्‍यांना २० दिवस सक्तीच्या रजेवर जाण्याचे तुघलकी आदेश काढण्यात आले आहेत.


एसटी सेवा सरकारने बंद ठेवली आहे, त्याला कर्मचारी जवाबदार नाहीत. सरकारने पर्यायी यंत्रणा म्हणून एसटीचा वापर केला असता तरी मालवाहतूक आणि इतर कामांसाठी एसटी कार्यरत राहिली असती. ते न करता सरकारने पगार थांबविला आहे. मार्च महिन्याचा २५ टक्के, मे महिन्याचा पन्नास टक्के पगार दिला नाही. त्यामुळे अधिकारी, कर्मचारी व त्यांचे कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे.

संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे टर्मिनस खासगी हा
नीरव मोदी, मेहुल चोक्सी यांनी चुना लावूनही पंजाब नॅशनल ब
कांदा निर्यातबंदीतून होणारा पाकिस्तानचा आर्थिक लाभ हा
बारामतीत उपमुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर ‘ढोल ब
राणा कपूरचा लंडनमधील १२७ कोटींचा फ्लॅटही ईडीच्या रडारव
सुट्या सिगारेट आणि विडी विक्रीवर बंदी लादताना संपूर्ण प
गुजरातमधील आयुष विभागात निकृष्ट दर्जाची औषध
गुजरात बामसेफचे वरिष्ठ कार्यकर्ते ऍड.देवजीभाई महेश्‍वर
पीएम किसान योजनेत तामिळनाडूपाठोपाठ महाराष्ट्रातही घोट
भारतीय लोकशाही Largest नौटंकी in the world
बुध्दकालीन ऐतिहासिक वारसा नष्ट करण्याचे काम ब्राम्हणां
बिहार विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले; १० नोव्हेंबरल
डहाणू, तलासरीत दोन वर्षांत ९३ लहानमोठे भूकंपाचे धक्के
तब्बल ५ हजार ७४२ कोटींची वीज बिले थकली
मंडल आयोग, गुजरात दंगल धडे वगळले
उमरचा खालिदचा गुन्हा काय?
एक लाखाचे बिल; तीन लाख भरले असतानाही मृतदेह रोखला!
फेसबुकवरील ‘कपल चॅलेंज’ पासून सावधान
राज्यात केंद्राच्या कृषी व कामगार विधेयकाची अंमलबजावणी
कंपनीने कराराची पूर्तता केलीच नाही
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper