×

विकासाच्या नावाखाली नीतीशकुमारांनी बिहार बनवले भिकारी

Published On :    2 Aug 2020
साझा करें:

बहुजन मुक्ती पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष व्ही.एल.मातंग यांचा घणाघात



पाटणा: लालूप्रसाद यादव सरकारची कमजोरी सांगून नीतीश कुमार यांनी सत्ता ताब्यात घेतली आणि आता १५ वर्षानंतर नीतीश कुमार आपली कमजोरी लपवण्यासाठी लालू प्रसाद यांच्यावर आरोप करत आहेत. आपण बिहारमध्ये किती विकास केला? असा सवाल करतानाच विकासाच्या नावाखाली प्रगतीशील बिहारला भिकारी बनवले असा घणाघात बहुजन मुक्ती पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष व्ही.एल.मातंग यांनी केला.


हे पण वाचा: येस बँक घोटाळा : वाधवान बंधूंचा जामीन फेटाळला


मातंग म्हणाले, ३१४ ओबीसी, एमबीसीचे विद्यार्थी क्रिमीलेअरमुळे आयएएस बनले नाहीत. त्यामुळे त्यांचे भवितव्य बरबाद झाले. या क्रिमीलेअरच्या नीतीवर नीतीशकुमार यांच्या पक्षाचे काय म त आहे? असा सवाल करतानाच देशातील एकूण साखर उत्पादनापैकी ४० टक्के उत्पादन बिहारमध्ये होते. आज बिहारमधील साखर कारखाने बंद आहेत. आपल्या १५ वर्षाच्या कालखंडात बिहारमधील उद्योग का सुरू करण्यात आले नाहीत. बिहारमध्ये नवीन उद्योग आणले असतील तर ते समोर येऊ सांगा, लपवून का ठेवत आहात? लोकांना किती काळ मूर्ख बनवत राहणार आहात? आता बिहारला वाचवायची वेळ आली आली आहे.


यावेळी मातंग यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर प्रकाशझोत टाकला. २१ जुलै १९४६ मध्ये पुणे येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की, या स्वातंत्र्याच्या आंदोलनात कुठलाही राजकीय पक्ष आपल्याला सहकार्य करणार नाही. आधुनिक भारतात ब्राम्हणांच्या गुलामीतून मूलनिवासी बहुजन समाजाला स्वातंत्र्य करण्यासाठी आंदोलन चालवत आहोत. मूलनिवासी बहुजनांच्या स्वातंत्र्याच्या आंदोलनासाठी त्यांना सहकार्य करण्यासाठी बहुजन मुक्ती पार्टी बनवण्यात आली आहे. मूलनिवासी बहुजन समाजाने आपल्या मताचा वापर हत्याराप्रमाणे केला तर ही लढाई सहज जिंकता येऊ शकते असा विश्‍वास मातंग यांनी दिला.


बहुजन मुक्ती पार्टीने लोकांच्या हितासाठी निवडणूक आयोगाला लिहले खुले पत्र

केंद्र आणि राज्य सरकार व्हर्च्युअल रॅलीच्या माध्यमातून लोकांना धोका देत आहेत-प्रवेंद्र प्रताप सिंह

बिहारमधील लोक कोरोनाशी लढत आहेत तर दुसर्‍या बाजूला १८ जिल्ह्यात महापूर आला आहे. या संकटानंतरही भाजपा आणि निवडणूक आयोग बिहारमध्ये निवडणूक घेण्याची तयारी करत आहे. अशाप्रकारे सरकार आणि निवडणूक आयोग लोकांच्या जीवाशी खेळत आहे. म्हणजे लोकांप्रती यांच्या संवेदना गोठलेल्या आहेत. या सर्व बाबी लक्षात घेऊन बहुजन मुक्ती पार्टीने निवडणूक आयोगाला पत्र लिहून २०२१ मध्ये निवडणुका घेण्याची विनंती केली आहे. याची माहिती पार्टीचे राष्ट्रीय महासचिव प्रवेंद्र प्रतापसिंह यांनी दिली.


जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार कोरोना एका वैश्‍विक महामारी आहे. त्यामुळे बिहारमधील १२ कोटी जनतेला धोका आहे. एवढेच नव्हे तर बिहारमधील १८ जिल्हे महापुराच्या विळख्यात सापडले आहेत. काही लाख गावे पाण्याखाली डुबली आहेत. परिणामी जीवन उध्वस्त झाले आहे. महापुरामुळे करोडो मतदारांची ओळखपत्रे व अन्य दस्ताऐवज पाण्यात भिजली आहेत. काही वाहून गेली आहेत. त्यामुळे मतदारांची ओळख करणे कठीण होणार आहे. यामुळे बोगस मताधिकार होण्याची दाट शक्यता आहे.


व्हर्च्युअल रॅलीमुळे प्रतिनिधींनी लोकांना जबाब दिला पाहिजे हा सिध्दांत समाप्त होतो.  सामान्य रॅलीत लोक प्रतिनिधींना सवाल विचारू शकतात. प्रत्यक्ष संवाद होत नसल्याने लोकांच्या मौलिक अधिकाराचे हनन होते. वर्तमान केंद्र सरकार आणि राज्य सरकार सरकारी मशीनरीचा व्हर्च्युअल रॅलीच्या माध्यमातून लोकांना धोका देत व मूर्ख बनवण्याचे काम सुरू आहे.वर्तमानपत्रे आणि टीव्ही चॅनेलना करोडो रूपयांची पेड न्यूज देऊन प्रचार करण्यात येत असल्याचा आरोप प्रवेंद्र सिंह यांनी केला.  निवडणुकीत ईव्हीएम मशीनचा वापर होणार आहे, त्यामुळे अनेकदा मतदारांकडून मशीनची हाताळणी होणार आहे. परिणामी संक्रमण वाढू शकते. जागतिक आरोग्य संघटनेच्या नियमांचेही उल्लंघन होऊ शकते. त्यामुळे महामारी आणि महापुराची स्थिती लक्षात घेता आताची निवडणूक स्थगित करून २०२१ मध्ये घ्यावी अशी विनंती करण्यात आल्याचे प्रवेंद्र सिंह यांनी पत्रात म्हटले आहे.

संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे टर्मिनस खासगी हा
नीरव मोदी, मेहुल चोक्सी यांनी चुना लावूनही पंजाब नॅशनल ब
कांदा निर्यातबंदीतून होणारा पाकिस्तानचा आर्थिक लाभ हा
बारामतीत उपमुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर ‘ढोल ब
राणा कपूरचा लंडनमधील १२७ कोटींचा फ्लॅटही ईडीच्या रडारव
सुट्या सिगारेट आणि विडी विक्रीवर बंदी लादताना संपूर्ण प
गुजरातमधील आयुष विभागात निकृष्ट दर्जाची औषध
गुजरात बामसेफचे वरिष्ठ कार्यकर्ते ऍड.देवजीभाई महेश्‍वर
पीएम किसान योजनेत तामिळनाडूपाठोपाठ महाराष्ट्रातही घोट
भारतीय लोकशाही Largest नौटंकी in the world
बुध्दकालीन ऐतिहासिक वारसा नष्ट करण्याचे काम ब्राम्हणां
बिहार विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले; १० नोव्हेंबरल
डहाणू, तलासरीत दोन वर्षांत ९३ लहानमोठे भूकंपाचे धक्के
तब्बल ५ हजार ७४२ कोटींची वीज बिले थकली
मंडल आयोग, गुजरात दंगल धडे वगळले
उमरचा खालिदचा गुन्हा काय?
एक लाखाचे बिल; तीन लाख भरले असतानाही मृतदेह रोखला!
फेसबुकवरील ‘कपल चॅलेंज’ पासून सावधान
राज्यात केंद्राच्या कृषी व कामगार विधेयकाची अंमलबजावणी
कंपनीने कराराची पूर्तता केलीच नाही
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper