×

ईव्हीएम असेपर्यंत देशात ईमानदारीने निवडणुका असंभव

Published On :    9 Jul 2020
साझा करें:

दिग्विजय सिंह यांच्या टीप्पणीवर वामन मेश्राम यांचे स्पष्टीकरण



पुणेे: आम्ही ईव्हीएम विरोधात जम्मू-काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत ईव्हीएम भंडाफोड राष्ट्रव्यापी परिवर्तन यात्रा काढली होती. ही यात्रा ६ महिने चालणार होती. परंतु कोरोना महामारीमुळे ती थांबली आहे. कोरोना महामारी आली नसती तर ईव्हीएम भंडाफोड यात्रा पूर्ण झाली असती. कोरोनामुळे केरळ व तामिळनाडू या दोन राज्यात आंदोलन बाकी आहे. कोरोनाचा विषय संपल्यानंतर आम्ही केरळ आणि तामीळनाडूत बाकी राहिलेले आंदोलन पुन्हा सुरू करू. त्यानंतर एका मोठे आंदोलन करण्यासाठी योजना आखण्यात येत आहे. कारण लोकतंत्राला वाचवल्याशिवाय समस्यांचे समाधान होणार नाही. ईव्हीएम असेपर्यंत देशात ईमानदारीने निवडणुका होणार नाहीत असे स्पष्टीकरण बहुजन क्रांती मोर्चाचे राष्ट्रीय संयोजक वामन मेश्राम यांनी दिले. मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री व कॉंग्रेसचे महासचिव दिग्विजय सिंह यांच्या ईव्हीएम मुद्याच्या टीप्पणीवर त्यांनी ही प्रतिकिया दिली.


भारतात ईव्हीएम आहे तोपर्यंत नरेंद्र मोदींना रोखणे कठीण आहे अशी टीप्पणी दिग्विजय सिंह यांनी केली होती, त्याचबरोबर हिंमत असेल तर मोदींनी बॅलेट पेपरवर निवडणुका घ्याव्यात असे त्यांनी आव्हान दिले होते. यावर मेश्राम यांनी आपली भूमिका मांडली आहे. भारतात ईव्हीएम असेपर्यंत ईमानदारीने निवडणुका होणार नाहीत. लोक ज्यांना निवडून देऊ इच्छिते ते निवडून येत नाहीत, तर भाजपाला कसे रोखणार असा सवाल मेश्राम यानी केला.


२००४ आणि २००९ मध्ये ईव्हीएम मशीनच्या माध्यमातून निवडणुका झाल्या. दोन्हीवेळा कॉंग्रेसचे सरकार बनले. जर कॉंग्रेसला वाटले असते तर २०१४ मध्ये बलेटवर निवडणुका झाल्या असत्या. कारण बॅलेटवर निवडणुका घेण्याचा निर्णय कॉंग्रेसच्या नियंत्रणात होता. त्याच्यात हातात होते. परंतु कॉंग्रेसने हे काम केले नाही आणि आता ईव्हीएम असेपर्यंत मोदींना रोखणे कठीण आहे असे दिग्विजय सिंह यांना पुढे करून सांगितले जात आहे. ज्यावेळी बॅलेट पेपर निवडणुका घेण्याचे स्वातंत्र्य होते त्यावेळी कॉंग्रेसने आरएसएस व भाजपाबरोबर २०१४-१९ मध्ये गुप्त समझोता केला. त्यावेळी लोकांचा विरोध होऊनही कॉंग्रेसने बॅलेट पेपर आणले नाही. कॉंग्रेसच्या अनेक नेत्यांनीही याविरोधात आवाज उठवला होता. परंतु कॉंग्रेसने मानले नाही असा आरोप मेश्राम यांनी केला.


केवळ ईव्हीएमच्या माध्यमातून मुक्त, निष्पक्ष आणि पारदर्शी निवडणुका होऊ शकत नाही असा ८ ऑक्टोबर २०१३ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला होता.त्यासाठी पेपर ट्रेल मशीन लावावी असे आदेश दिले होते. पेपर ट्रेल मशीन लावण्याचा आदेश देऊनही  २०१४ मध्ये कॉंग्रेसने ते लावले नाही. निवडणूक मुक्त, निष्पक्ष आणि पारदर्शी होऊ नये म्हणून ५६ सी, ५६ डी, ४९ एमए असे नवीन नियम लादण्यात आले. भाजपा निवडणूक जिंकावी यासाठी अनुकूल वातावरण बनवण्यात आले. एवढेच नव्हे तर पुराव्याच्या आधारे हे सांगू शकतो की, कॉंग्रेसने केलेल्या ईव्हीएम घोटाळ्याचे सर्व पुरावे आरएसएस व भाजपाच्या हाती लागले होते. त्यामुळेच आरएसएस व भाजपाला गप्प बसवण्यासाठी कॉंग्रेसने हा गुप्त समझोता केला होता असे मेश्राम म्हणाले.


२०१९ च्या कालखंडात आमचा खटला सर्वोच्च न्यायालयात होता. मार्चमध्ये निवडणुका होणार असल्याचे लक्षात आल्यानंतर कॉंग्रेसने फेब्रुवारीत खटला दाखल केला. फेब्रुवारीत खटला दाखल करून कॉंग्रेसने भाजपाला मदत केली. सर्वोच्च न्यायालयाने ८ ऑक्टोबर २०१३ रोजी पेपर ट्रेल मशीन लावून निवडणुका घेण्याचे आदेश दिले होते. त्यामध्ये असेही म्हटले होते की, कुठल्याही उमेदवाराने ईव्हीएम घोटाळ्याबाबत शंका घेतल्यास पेपर ट्रेलमधून निघणार्‍या कागदी मतपत्रिकांची गणती करायला हवी. त्याचा तो अधिकार आहे. 


याचा अर्थ १०० टक्के रिकाऊंटींगचा आदेश दिला होता.परंतु कॉंग्रेसने फेब्रुवारी २०१९ मध्ये याच्याविरोधात खटला दाखल करून ५० टक्के पावत्या जुळल्या पाहिजेत अशी मागणी केली. परंतु १०० टक्के रिकाऊंटींगचा आदेश ८ ऑक्टोबर २०१३ मध्येच देण्यात आला होता असे मेश्राम यांनी स्पष्ट केले.


१०० टक्के  मुक्त, निष्पक्ष आणि पारदर्शी निवडणुका झाल्या असत्या. परंतु भाजपाचे नुकसान होऊ नये यासाठी कॉंग्रेसचे नेते अभिषेक मनुसंघवी यांच्यामार्फत खटला दाखल करण्यात आला. त्यामुळे मुक्त, निष्पक्ष आणि पारदर्शी निवडणुकांवर गंडांतर आले. एवढेच नव्हे तर २०१९ मध्ये लोकसभा निवडणुका होणार होत्या त्यावेळी कॉंग्रेसने ईव्हीएमबाबत हंगामा केला होता. 


२०१८ मध्ये छत्तीसगड, मध्य प्रदेश, राजस्थानात विधानसभा निवडणुका होणार होत्या त्यावेळी  कॉंग्रेसने ईव्हीएमबाबत हंगामा निर्माण केला होता याची आठवण मेश्राम यांनी करून दिली.भारतात ईव्हीएम आणून लोकतंत्राची हत्या करण्याचे काम इंदिरा गांधी यांच्यावेळी करण्यात आले. त्याचा डाटा आणि पुरावे आमच्याशी आहेत. तेच पुरावे घेऊन मी सर्वोच्च न्यायालयात गेलो होतो. २४ एप्रिल २०१७ मध्ये १०० टक्के पेपर ट्रेल मशीन लावाव्यात असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने आपण दाखल केलेल्या खटल्याच्या निकालात दिला होता असे मेश्राम यांनी सांगितले.



ईव्हीएम घोटाळा करून १०० टक्के भाजपाने जिंकू नये यासाठी दिग्विजयसिंह यांची टीप्पणी असावी
देशात मुक्त, निष्पक्ष आणि पारदर्शी निवडणुका व्हाव्यात असे दिग्विजय सिंह यांना वाटत असेल तर त्यांनी ईव्हीएमविरोधात देशभरात काम सुरू करावे. त्यासाठी आम्ही त्यांना संघटनशक्तीसहित सहकार्य करायला तयार आहोत. ईव्हीएमचा मुद्दा छेडण्याबाबत भाष्य करताना मेश्राम म्हणाले, दिग्विजय सिंह यांचा आणखी एक उद्देश असावा की, निवडणुकीत १०० टक्के भाजपाने जिंकू नये. कॉंग्रेस-भाजपाच्या ५०-५० च्या सौदेबाजीनुसार दिग्वीजयसिंह यांनी ईव्हीएमबाबत टीप्पणी केली असावी. भाजपाला एकट्याला १०० टक्के फायदा होऊ नये यासाठीच त्यांनी तीर मारला असावा. तर दिग्विजय सिंह देशभरात ईव्हीएमविरोधात आंदोलन करत असतील तर त्यांना सहकार्य करू. परंतु ही ऑफर ते स्विकारणार नाहीत. असे त्यांनी केले तर दिल्लीतील कॉंग्रेसवाले त्यांना काढून टाकतील असा इशारा मेश्राम यांनी दिला.

संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
लोकांच्या विरोधानंतरही ‘सीएए’चा नियम करण्याची केंद्र स
राईट ऑफ कर्जांच्या वसुलीची माहिती नाही
श्रीरामाच्या नावाने भाजपने पाणी विकलं, विटा विकल्या, जित
स्वत:ला साधू-संत म्हणवणार्‍या ब्राम्हणांकडून उद्धव ठाक
६ सरकारी बँका खासगीकरणाच्या वरवंट्याखाली भरडणार
कुणी करतोय मजुरी, कुणी सुरू केला हातगाडीवर व्यवसाय
सुशांत सिंह राजपूत प्रकरणावरुन महाराष्ट्र, बिहारमध्ये
राफेलमध्ये बेरोजगारी आणि आर्थिक संकट दूर करण्याची क्षम
पालघर जिल्ह्यात आदिवासींच्या उपासमारीने गाठले टोक
एनईपीचा तीन भाषेचा फॉर्म्युला तामिळनाडू सरकारने नाकारल
येस बँक घोटाळा : वाधवान बंधूंचा जामीन फेटाळला
विकासाच्या नावाखाली नीतीशकुमारांनी बिहार बनवले भिकारी
अचानक मुले हुशार झाली की गुणांचा फुगवटा
रेशनचा तब्बल ११० टन तांदूळ साठा जप्त
केंद्राने महागाईवर लक्ष केंद्रित करायला हवे
अण्णा भाऊ साठेंना ‘भारतरत्न’ने सन्मानित करावे
रोजच्या भाकरीच्या विवंचनेत कुठून देणार ऑनलाईन शिक्षण
धारावी पुनर्विकास प्रकल्पाचा चेंडू केंद्र सरकारच्या को
पंजाब हादरले; विषारी दारू प्यायल्याने ८६ जणांचा मृत्यू,
मुंबईतील लोकल ट्रेन बंद असल्याने पश्‍चिम रेल्वेला २९१ क
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper