×

सरकार म्हणजे कोण?

Published On :    7 Jul 2020
साझा करें:

नैसर्गिक संकटांना जबाबदार कोण? सर्व संकटांना सरकार जबाबदार असेल तर सरकार म्हणजे कोण? याचा विचार भारतीय नागरिकांनी गांभीर्याने केला पाहिजे. हेच माहीत नसल्यामुळे प्रत्येक नागरिक सरकारला शिव्या देतो. मग प्रशासन कशाला म्हणतात प्रशासकीय यंत्रणा काय करते? नैसर्गिक संकटाचा सामना करण्यासाठी प्रशासनाला नेहमीच पूर्वनियोजन करावे लागते. त्यात स्थानिक पातळीवरील लोकप्रतिनिधीनां विचारात घ्यावे लागते. नागरिकांच्या आरोग्याचा, जीवितहानीचा,आर्थिकहानीचा विचार हा प्रशासनाला करावा लागतो.



नैसर्गिक संकटांना जबाबदार कोण? सर्व संकटांना सरकार जबाबदार असेल तर सरकार म्हणजे कोण? याचा विचार भारतीय नागरिकांनी गांभीर्याने केला पाहिजे. हेच माहीत नसल्यामुळे प्रत्येक नागरिक सरकारला शिव्या देतो. मग प्रशासन कशाला म्हणतात प्रशासकीय यंत्रणा काय करते? नैसर्गिक संकटाचा सामना करण्यासाठी प्रशासनाला नेहमीच पूर्वनियोजन करावे लागते. त्यात स्थानिक पातळीवरील लोकप्रतिनिधीनां विचारात घ्यावे लागते. नागरिकांच्या आरोग्याचा, जीवितहानीचा,आर्थिकहानीचा विचार हा प्रशासनाला करावा लागतो.


कोरोना भारतात आला तो प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या मेहरबानीने हे जगजाहीर झाले आहे.त्यांच्या एकूण कामकाजाचे मूल्यमापन करणे म्हणजे देशद्रोही गुन्हा दाखल होऊ शकतो. संविधानिक नितिनियमाचे सर्व संकेत पायदळी तुडवून ब्राम्हणवादी मनुस्मृतीची अंमलबजावणी बिनदिक्कतपणे केली जात आहे. देशातील सर्वोच्च न्यायालय किंवा राष्ट्रपती यांच्याकडे दाद मागण्याची अपेक्षा भारतीय जागृत नागरिक करू शकत नाही. त्यांनाच मानसिक व वैचारिक गुलाम बनवून ठेवण्यात आले आहे. त्यांना काही अधिकारच राहिला नाही.


उत्तर प्रदेशात विकास दुबेसारखा गुंड गँगस्टर वरीष्ठ पोलीस निरीक्षक, अधीक्षकासह आठ पोलिसांना गोळीबार करून टाकतो तरी ही राज्य व केंद्र सरकारला त्याचे दुःख होत नाही,बाकीच्या वेळा चोवीस तास गळा आवळून बोलणारे वृत्तवाहिन्या अँकर काहीच घडले नाही असा पध्दतीने वावरताना दिसतात. कोणत्या वृत्तवाहिन्यांनी त्यावर चर्चा घडवून आणली? देशभरात कोरोनाच्या घटना आणि महाराष्ट्रात महापुरांच्या संकटात सापडलेल्या पुरगस्तांच्या काही घटना ऐकल्यावर अंगावर शहारे येतात.


सरकारने हे काम केले पाहिजे होते ते काम केले पाहिजे?.असे ज्यांना कोणतीही माहिती नाही तेही बोलतात.पण सरकार म्हणजे कोण? सत्ताधारी असणारे राजकीय नेते म्हणजे सरकार का? ते काय करतात? ते एवढे बुद्धिमान असतात काय? जेवढे प्रशासकीय अधिकारी असतात. प्रशासकीय अधिकारी होण्यासाठी विशिष्ट पद्धतीने परीक्षा देऊन गुणवत्ता सिद्ध करावी लागते. 


केवळ उच्चशिक्षित असून चालत नाही. राजकीय पक्षांच्या गुंडगिरी करून नेते झालेल्या लोकप्रतिनिधीच्या दबावाखाली काम करणारा उच्चपदस्थ अधिकारी असूच शकत नाही. स्वतःच्या विवेकबुद्धीने त्याने निर्णय घेतले पाहिजे आणि नियोजन केले पाहिजे. नियोजन करण्याची विवेकबुद्धी अधिकार्‍यांच्या मेंदूत नसेल तर तो सांग काम्या असतो. कोणत्याही प्रकारचे नियोजन नसले की संकट आल्याशिवाय राहत नाही. निसर्गाचा नियम त्यांचे पालन माणसांनी केले पाहिजे. 


तसाच विज्ञानाचा नियम आहे त्याचे ही पालन माणसांनी केल्यास संकट कधीच येत नाही आणि अपघात होत नाही. म्हणूनच सुरक्षा व्यवस्थापन नेहमीच सुरक्षेच्या नियमाचे पालन करण्यास सांगते. सुरक्षा नियम न पाळल्यास अपघात होतात. पुरात अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे काम लष्कर, नौदल, आणि एनडीआरएफकडून युद्धपातळीवर झाले होते. 


आज कोरोनाने जास्त नागरिक बळी पडू नये म्हणून कोण जीवाची बाजी लावून लढतो. पोलीस, डॉक्टर, नर्स,पालिका अधिकारी,कर्मचारी कामगार या सर्वांना स्वतःची आणि माणसाची, सामानाची, मालमतेची सुरक्षा कशी करावी यांचे प्रशिक्षण दिलेलं असते. नागरिकांना ही सामाजिक सुरक्षा, आरोग्याची सुरक्षा कशी घ्यावी हे विद्यार्थी दशेपासून प्रशिक्षण दिलेले असते. पण विद्यार्थी दक्षनागरिक बनेपर्यंत त्या सुरक्षा नियमांचे पालन करत नाही. काही होत नाही असे म्हणून त्यांचे उल्लंघन करीत राहतो. सुरक्षा दल, होमगार्ड ही संस्था, संघटना प्रत्येक तालुक्यात आहे.


आणीबाणीच्या काळात पोलिसांना मदत करण्यासाठी होमगार्ड सर्व ठिकाणी मदतीला धावून जातात. नोकरीला लागतांना त्यांच्याकडून तसे प्रतिज्ञापत्र लिहून घेतले जाते. भारतीय संविधानाने दिलेल्या अटी व नियमांचे कर्तव्यनिष्ठपणे पालन करून नागरिकांना योग्य ती सेवा प्रामाणिकपणे देईल असे अभिवचन दिले असते. पण बहुसंख्येने कर्मचारी, अधिकारी राजकीय दबावाखाली काम करतात. काही कर्मचारी अधिकारी निर्भीड निःपक्षपाती राहून निर्णय घेतात. त्यांनी कर्तव्यदक्षता दाखवली तर त्यांची जात आडवी येते. हे लोक असेच असतात, यांना सरकारी नोकरीचा माज येतो. ही नेहमीची प्रतिक्रिया समाजात व्यक्त होत असते.


देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून आजपर्यंत खूप कमी अधिकार्‍यांनी भारतीय संविधानानुसार जबबदारी सांभाळून कर्तव्यदक्षता दाखविली. त्यात टी.एन.शेषन, एन.चंद्रशेखर, गो.रा.खैरनार, कृष्णप्रसाद अशी काही ठळक नांवे इतिहासात नोंदली गेली आहे.बाकी मनुस्मुतीनुसार वर्णव्यवस्था,जातीव्यवस्थाची अलिखित अंमलबजावणी करतात. देशात विषमतावादी विचारांचे सरकार आहे ते वर्णव्यवस्थेचे उघड समर्थन करते. ते संविधान मान्यच करीत नाही. 


तिचे सर्व व्यवहार मनुस्मृतीनुसार होत आहेत. लोक सुरवातीपासूनच ओरडत आहोत. सरकार कुचकामी ठरत आहे. जे राजकीय नेते विरोधी पक्षाचे आमदार शंभर दीडशे कोटीला विकत घेऊ शकतात तेच सत्ताधारी पक्षांचे पुरगस्तांच्या मदतीसाठी जनतेला भीक मागतात ही या देशाची मोठीच आश्चर्यकारक घटना होती. नऊशे ते बाराशे कोटीचे पक्षाचे कार्यालय बांधले तेव्हा पैसा कुठून आला हे विचारण्याचे धाडस प्रशासकीय यंत्रणातील कोणत्याही अधिकार्‍यांना किंवा कोण तो इडी? त्याला हे दिसत नाही, विचारण्याची हिंमत होत नाही. 


प्रशासकीय यंत्रणा राजकीय पक्षाच्या नेत्यांची गुलाम झाली तर यापुढे देशावर भयंकर संकट येणार आहेत. उच्चशिक्षित उच्चपदस्थ अधिकारी वर्गाने यांचा गांभीर्याने विचार केला पाहिजे. सरकार म्हणजे कोण? अज्ञानी अशिक्षित लोकांना कळत नाही. पण सुरक्षित नोकरी करणार्‍यांना तरी सरकार म्हणजे काय ते समजते काय? कोरोनाच्या संकटाला केंद्र सरकार जेव्हा गंभीर पाहिजे होते तेव्हा ते नव्हते,टाळ्या वाजवून दिवे लावून कोरोनाचे गांभीर्य नष्ट करू पाहत होती. त्यावेळी दहा टक्के कोरोना आणि ९० टक्के भीती वाटत होती.


केंद्रातील भाजपाला सरकारला जनतेच्या जीवितहानी आर्थिक हानीशी काही देणेघेणे नाही.त्यामुळेच नागरिकांनी आपला स्वतःचा विचार करून सुरक्षितता तिचे नियोजन करावे. सर्वच सरकारने केले पाहिजे ही अपेक्षा ठेऊ नये. सुरक्षा व्यवस्था, प्रशासकीय सल्लागार यांना वेळोवेळी लेखी पत्रव्यवहार करून विचारणा करावी.सूचना करून त्यात सुधारण्यासाठी प्रयत्नशील राहावे.


दक्ष नागरिक बनावे. तरच राजकीय मानव निर्मित संकटातून मुक्ती मिळवता येईल. म्हणूनच आपण म्हणजे सरकार असे समजले पाहिजे. प्रत्येकांनी विचारले पाहिजे,सरकार म्हणजे कोण? आम्ही निवडून दिलेले लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी वर्गाला त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यासाठी भाग पाडले पाहिजे. तरच भारतीय नागरिक येणार्‍या संकटांतून मुक्त होतील अन्यता हे संकटे दिवसेंदिवस वाढत जातील. म्हणूनच घटनाकरांनी सुरवातीलाच सांगितले होते. घटना,कायदे, कलम कितीही चांगले असून चालणार नाही. त्याची अंमलबजावणी करणारेच नालायक असतील तर दोष कोणाला देणार?


सागर तायडे

९९२०४०३८५९

संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
लोकांच्या विरोधानंतरही ‘सीएए’चा नियम करण्याची केंद्र स
राईट ऑफ कर्जांच्या वसुलीची माहिती नाही
श्रीरामाच्या नावाने भाजपने पाणी विकलं, विटा विकल्या, जित
स्वत:ला साधू-संत म्हणवणार्‍या ब्राम्हणांकडून उद्धव ठाक
६ सरकारी बँका खासगीकरणाच्या वरवंट्याखाली भरडणार
कुणी करतोय मजुरी, कुणी सुरू केला हातगाडीवर व्यवसाय
सुशांत सिंह राजपूत प्रकरणावरुन महाराष्ट्र, बिहारमध्ये
राफेलमध्ये बेरोजगारी आणि आर्थिक संकट दूर करण्याची क्षम
पालघर जिल्ह्यात आदिवासींच्या उपासमारीने गाठले टोक
एनईपीचा तीन भाषेचा फॉर्म्युला तामिळनाडू सरकारने नाकारल
येस बँक घोटाळा : वाधवान बंधूंचा जामीन फेटाळला
विकासाच्या नावाखाली नीतीशकुमारांनी बिहार बनवले भिकारी
अचानक मुले हुशार झाली की गुणांचा फुगवटा
रेशनचा तब्बल ११० टन तांदूळ साठा जप्त
केंद्राने महागाईवर लक्ष केंद्रित करायला हवे
अण्णा भाऊ साठेंना ‘भारतरत्न’ने सन्मानित करावे
रोजच्या भाकरीच्या विवंचनेत कुठून देणार ऑनलाईन शिक्षण
धारावी पुनर्विकास प्रकल्पाचा चेंडू केंद्र सरकारच्या को
पंजाब हादरले; विषारी दारू प्यायल्याने ८६ जणांचा मृत्यू,
मुंबईतील लोकल ट्रेन बंद असल्याने पश्‍चिम रेल्वेला २९१ क
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper