×

पतंजलीने दोन लायसन्स कसे मिळवले खुलासा करावा, संभ्रम करणारा कोरोना विषाणूचा फोटो हटवावा-उत्तराखंड आयुर्वेद व युनानी खात्याची नोटीस

Published On :    7 Jul 2020
साझा करें:

कोरोनावर औषध शोधल्याचा दावा करणार्‍या पतंजली आयुर्वेद कंपनीला उत्तराखंड आयुर्वेद व युनानी खात्याने ५ जुलै रोजी आणखी एक नोटीस पाठवली असून ज्या दिव्य कोरोनील गोळ्यांच्या कीटवर कोरोना विषाणूचे छायाचित्र छापले होते, ते छायाचित्र संभ्रम निर्माण करणारे असून ते त्वरित हटवावेत. तसेच दोन लायसन्स कसे मिळवले याचा खुलासा करावा असेही बजावण्यात आले आहे.



मुंबर्ई: कोरोनावर औषध शोधल्याचा दावा करणार्‍या पतंजली आयुर्वेद कंपनीला उत्तराखंड आयुर्वेद व युनानी खात्याने ५ जुलै रोजी आणखी एक नोटीस पाठवली असून ज्या दिव्य कोरोनील गोळ्यांच्या कीटवर कोरोना विषाणूचे छायाचित्र छापले होते, ते छायाचित्र संभ्रम निर्माण करणारे असून ते त्वरित हटवावेत. तसेच दोन लायसन्स कसे मिळवले याचा खुलासा करावा असेही बजावण्यात आले आहे.


त्याचबरोबर दिव्य कोरोनील टॅबलेट, दिव्य श्‍वासरी वटी व अणु तैल या औषधांच्या पॅकेजवर दोन लायसन्स क्रमांक दाखवण्यात आले आहेत. हे दोन लायसन्स क्रमांक (Uttra.­yu-६७/२००५ व UK.­Y-२७४/२०१३) ड्रग व कॉस्मॅटिक अक्ट १९४० अंतर्गत नियम १५१ चे थेट उल्लंघन असल्याचा ठपका ठेवला आहे. हे दोन लायसन्स क्रमांक कोणत्या परिस्थिती पतंजली आयुर्वेद कंपनीने मिळवले आहेत, त्याचा खुलासा त्वरित करावा आणि भविष्यात कोणत्याही औषधाच्या उत्पादनाची प्रिंट व इलेक्ट्रॉनिक माध्यमात जाहिरात करण्याअगोदर ड्रग व कॉस्मेटिक अक्ट १९४० अंतर्गत नियम १७०द्वारे औषध निरीक्षक-जिल्हा आयुर्वेदिक वा युनानी अधिकारी हरिद्वार यांच्या स्वाक्षर्‍या असणे बंधनकारक असल्याचे स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे.कोरोनावर औषध विकसित केल्याचा दावा करणार्‍या रामदेव बाबा व पतंजली आयुर्वेदचे सीईओ आचार्य बाळकृष्ण यांना हा दुसरा झटका आहे.


जेव्हा कोरोनावर आपण औषध शोधल्याचा दावा या दोघांनी केला होता तेव्हा उत्तराखंडच्या आयुर्वेद व युनानी विभागाने त्यांचा दावा फेटाळला होता तर केंद्रीय आयुष मंत्रालयाने सर्व संशोधन पुरावे सादर करावेत असे आदेश दिले होते. पण पतंजली आयुर्वेद कंपनीने आपल्या कोरोनील औषधाने कोरोनावर इलाज होतो असा कधीही दावा केला नव्हता असा पवित्रा घेतला घेत तसे उत्तर उत्तराखंड सरकारला पाठवले होते.

संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
लोकांच्या विरोधानंतरही ‘सीएए’चा नियम करण्याची केंद्र स
राईट ऑफ कर्जांच्या वसुलीची माहिती नाही
श्रीरामाच्या नावाने भाजपने पाणी विकलं, विटा विकल्या, जित
स्वत:ला साधू-संत म्हणवणार्‍या ब्राम्हणांकडून उद्धव ठाक
६ सरकारी बँका खासगीकरणाच्या वरवंट्याखाली भरडणार
कुणी करतोय मजुरी, कुणी सुरू केला हातगाडीवर व्यवसाय
सुशांत सिंह राजपूत प्रकरणावरुन महाराष्ट्र, बिहारमध्ये
राफेलमध्ये बेरोजगारी आणि आर्थिक संकट दूर करण्याची क्षम
पालघर जिल्ह्यात आदिवासींच्या उपासमारीने गाठले टोक
एनईपीचा तीन भाषेचा फॉर्म्युला तामिळनाडू सरकारने नाकारल
येस बँक घोटाळा : वाधवान बंधूंचा जामीन फेटाळला
विकासाच्या नावाखाली नीतीशकुमारांनी बिहार बनवले भिकारी
अचानक मुले हुशार झाली की गुणांचा फुगवटा
रेशनचा तब्बल ११० टन तांदूळ साठा जप्त
केंद्राने महागाईवर लक्ष केंद्रित करायला हवे
अण्णा भाऊ साठेंना ‘भारतरत्न’ने सन्मानित करावे
रोजच्या भाकरीच्या विवंचनेत कुठून देणार ऑनलाईन शिक्षण
धारावी पुनर्विकास प्रकल्पाचा चेंडू केंद्र सरकारच्या को
पंजाब हादरले; विषारी दारू प्यायल्याने ८६ जणांचा मृत्यू,
मुंबईतील लोकल ट्रेन बंद असल्याने पश्‍चिम रेल्वेला २९१ क
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper