×

‘अदानी म्हणजे हायवे लुटारू’ अर्शद वारसीने ट्विट करताच वाढीव वीज बिलाची समस्या सुटली

Published On :    6 Jul 2020
साझा करें:

विजेचा वापर नसताना प्रचंड वीजबिल आल्याने मुंबईकर हैराण झाले आहेत. सामान्य ग्राहकांपासून ते अगदी सेलिब्रेटीपर्यंत वाढत्या वीज बिलाचा फटका बसला आहे. त्यामुळे सोशल मीडियावर संताप व्यक्त करण्यात येत आहे. अभिनेता अर्शद वारसी याने तर ट्विटरवर ‘अदानी म्हणजे हायवे लुटारू’ अशी पोस्ट केली. आश्‍चर्य म्हणजे त्यानंतर त्याच्या वीज बिलाची तक्रार कंपनीने दूर केली.



मुंबई: विजेचा वापर नसताना प्रचंड वीजबिल आल्याने मुंबईकर हैराण झाले आहेत. सामान्य ग्राहकांपासून ते अगदी सेलिब्रेटीपर्यंत वाढत्या वीज बिलाचा फटका बसला आहे. त्यामुळे सोशल मीडियावर संताप व्यक्त करण्यात येत आहे. अभिनेता अर्शद वारसी याने तर ट्विटरवर ‘अदानी म्हणजे हायवे लुटारू’ अशी पोस्ट केली. आश्‍चर्य म्हणजे त्यानंतर त्याच्या वीज बिलाची तक्रार कंपनीने दूर केली.


अर्शद वारसीला चालू महिन्यात आलेले बिल पाहून त्याला शॉक बसला. त्याने ट्विटरवर ‘अदानी इलेक्ट्रीसिटी’ कंपनीला टॅग करत अगदी थंड डोक्याने एक पोस्ट केली. ‘हायवे लुटारू अदानी’कडून आलेलं हे माझे बिलं. ते पाहून अदानींना हसू येत आहे. १ लाख ३ हजार ५६४ रूपये तुमच्या खात्यातून ५ जुलै रोजी डेबिट झाले. अर्शदने केलेल्या ट्विटनंतर अदानी कंपनीने त्याची तत्काळ दखल घेतली.


हे पण वाचा: वाढीव वीज बिलांच्या तक्रारींचा महावितरणच्या दारी खच


अदानी इलेक्ट्रीसिटीकडून अर्शदच्या ट्विटला प्रत्युत्यर देण्यात आले. या महिन्यात जास्त बिल आल्यामुळे तुमची चिंता आम्ही समजू शकतो. तुम्हांला आम्ही मदत करण्यासही तयार आहोत. पण वैयक्तिक बदनामी मात्र सहन केली जाणार नाही, अशा शब्दात प्रतिक्रिया दिल्यानंतर कंपनीकडून अर्शदची समस्या सोडवण्यात आली. त्यानंतर त्याने आधीचे सर्व ट्विट डिलीट करत दुसरे नवे ट्विट केले. ‘अदानी इलेक्ट्रीसिटीकडून तत्काळ प्रतिसाद मिळाला. समस्या सुटली. आपल्याला त्यांच्याशी फक्त संपर्क करायचा आहे. धन्यवाद..! असे ते ट्विट आहे.

संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
लोकांच्या विरोधानंतरही ‘सीएए’चा नियम करण्याची केंद्र स
राईट ऑफ कर्जांच्या वसुलीची माहिती नाही
श्रीरामाच्या नावाने भाजपने पाणी विकलं, विटा विकल्या, जित
स्वत:ला साधू-संत म्हणवणार्‍या ब्राम्हणांकडून उद्धव ठाक
६ सरकारी बँका खासगीकरणाच्या वरवंट्याखाली भरडणार
कुणी करतोय मजुरी, कुणी सुरू केला हातगाडीवर व्यवसाय
सुशांत सिंह राजपूत प्रकरणावरुन महाराष्ट्र, बिहारमध्ये
राफेलमध्ये बेरोजगारी आणि आर्थिक संकट दूर करण्याची क्षम
पालघर जिल्ह्यात आदिवासींच्या उपासमारीने गाठले टोक
एनईपीचा तीन भाषेचा फॉर्म्युला तामिळनाडू सरकारने नाकारल
येस बँक घोटाळा : वाधवान बंधूंचा जामीन फेटाळला
विकासाच्या नावाखाली नीतीशकुमारांनी बिहार बनवले भिकारी
अचानक मुले हुशार झाली की गुणांचा फुगवटा
रेशनचा तब्बल ११० टन तांदूळ साठा जप्त
केंद्राने महागाईवर लक्ष केंद्रित करायला हवे
अण्णा भाऊ साठेंना ‘भारतरत्न’ने सन्मानित करावे
रोजच्या भाकरीच्या विवंचनेत कुठून देणार ऑनलाईन शिक्षण
धारावी पुनर्विकास प्रकल्पाचा चेंडू केंद्र सरकारच्या को
पंजाब हादरले; विषारी दारू प्यायल्याने ८६ जणांचा मृत्यू,
मुंबईतील लोकल ट्रेन बंद असल्याने पश्‍चिम रेल्वेला २९१ क
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper