×

केंद्रातील भाजपा सरकारला लागले भिकेचे डोहाळे

Published On :    17 Nov 2019
साझा करें:

एअर इंडिया, भारत पेट्रोलियम विकण्याचा निर्णय, अर्थमंत्र्यांचे सुतोवाच



नवी दिल्ली : केंद्रातील भाजपा सरकारला भिकेचे डोहाळे लागले असून त्यांनी एअर इंडिया, भारत पेट्रोलियम मार्चपर्यंत विकण्याचा निर्णय घेतला आहे. या दोन्ही कंपन्यांच्या विक्रीची प्रक्रिया लवकरच पूर्ण करण्यात यावी असं सरकारला वाटतं, अशी माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली. पुढील वर्षाच्या सुरुवातीलाच ही दोन्ही कामे पूर्ण होण्याची अपेक्षा असून, या दोन्ही कंपन्यांच्या विक्रीतून सरकारला एक लाख कोटींचा फायदा होईल, असंही त्यांनी सांगितलं.




केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ‘टाइम्स ऑफ इंडिया’ला विशेष मुलाखत दिली. एअर इंडियाच्या विक्रीची प्रक्रिया सुरू होण्याआधीच गुंतवणुकदारांमध्ये उत्साह पाहायला मिळाला,’ असं त्या म्हणाल्या. गेल्या वर्षी गुंतवणुकदारांनी एअर इंडिया कंपनी खरेदी करण्यात रस दाखवला नव्हता. त्यामुळं कंपनी विकली गेली नव्हती. 


विशेष म्हणजे या आर्थिक वर्षात करसंकलनात झालेली घट पाहून निर्गुंतवणूक आणि धोरणात्मक विक्रीच्या माध्यमातून महसूल गोळा करण्याचा सरकारचा विचार आहे, असंही त्यांनी सांगितलं. यावेळी अर्थमंत्र्यांनी आर्थिक मंदीबाबत भाष्य केलं. आर्थिक मंदीचे मळभ दूर करण्यासाठी वेळेवर आवश्यक पावले उचलण्यात आली आहेत. अनेक क्षेत्र या मंदीतून सावरत आहेत. आपलं ताळेबंद सुधारा असं अनेक उद्योगांच्या मालकांना सांगण्यात आलं असून, त्यातील अनेकांनी नवी गुंतवणूक करण्याची तयारी सुरू केली आहे, असंही त्या म्हणाल्या.


‘स्पाइस जेट’ला रोज चार कोटींचा तोटा

काही क्षेत्रांतील सुधारणांमुळं जीएसटी संकलनात वाढ होईल अशी अपेक्षा होती. या व्यतिरिक्त सुधारणांसाठी उचललेल्या पावलांमुळं कर संकलनातही वाढ होईल, असं त्यांनी त्यांनी सांगितलं. सुप्रीम कोर्टानं एस्सार स्टील प्रकरणात जो निर्णय दिला आहे, त्यामुळं सुधारणा झाल्याचं पाहायला मिळालं. पुढील तिमाहीत त्याचा परिणाम बँकांच्या ताळेबंदावर झालेला दिसेल. लोकांमध्ये बदल झालेला आहे. सण-उत्सवांदरम्यान बँकांनी १.८ लाख कोटीचं कर्ज वितरीत केलं आहे. तर ग्राहकांची आर्थिक स्थिती रूळावर नसती तर त्यांनी बँकांमधून कर्ज घेण्याच्या विचार का केला असता? अशी स्थिती संपूर्ण देशात आहे, असंही त्या म्हणाल्या.

संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
उन्नाव बनली यूपीतील ‘बलात्काराची राजधानी’
देवेंद्र फडणवीस यांनी लेखी आदेश न काढल्याने शेतकर्‍यां
भारतात मंदीची समस्या गंभीर, मोदींनी मान्य करायलाच हवी
हैदराबाद एन्काऊंटरची राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडून ग
हैद्राबाद पोलिसांचे कृत्य कायदाविरोधी
वाहन क्षेत्र मंदीच्या खाईत, एक लाख रोजगार बुडाले
भारतात हाताने, डोक्यावरून मैला वाहण्याची प्रथा आजही काय
तेलंगण पोलिसांच्या ७ संशयित एन्काउंटर मोहिमा
९० टक्के जाळलेल्या तरुणीचा अखेर मृत्यू, उन्नाव बलात्कार
काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला १५ हजार कोटींचा फटका
अयोध्या निकालाविरोधात चार फेरविचार याचिका दाखल
२०२२ पर्यंत भारत ५ हजार अब्ज डॉलर्सची अर्थव्यवस्था बनणे
चीनने २० लाखांपेक्षा अधिक मुस्लिमांना जबरदस्तीने ठेवले
एनआरसीमध्ये १०८ कोटींचा आर्थिक घोटाळा?
झारखंडमध्ये निवडणुकीदरम्यान गोळीबार; एकाचा मृत्यू
बुध्दीस्टांनी अयोध्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात दाव
छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या गैरव्यवहाराच
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे परळ येथील निवासस्थान राष्ट्
‘राष्ट्रनिर्माते’
देशात पाण्याचे संकट गहिरे
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper