×

‘मूलनिवासी’ संकल्पना आणि ‘रामदेव बाबा’चे अजब तर्कट

Published On :    17 Nov 2019
साझा करें:

बामसेफ संघटना आणि मूलनिवासी संकल्पना रूजवणारे ‘वैचारिक आतंकवादी’ असल्याचे योगगुरू म्हणवणार्‍या रामदेव बाबाने रिपब्लिक टीव्हीला मुलाखत देताना अजबच तर्कट मांडले आहे. अर्णव गोस्वामी या पत्रकाराने मुलाखत घेतली होती. रामदेव बाबाच्या अजब तर्कटाची पोलखोल करायला हवी आणि मूलनिवासी संकल्पना काय आहे यावर भाष्य करणारा हा लेख.



बामसेफ संघटना आणि मूलनिवासी संकल्पना रूजवणारे ‘वैचारिक आतंकवादी’ असल्याचे योगगुरू म्हणवणार्‍या रामदेव बाबाने रिपब्लिक टीव्हीला मुलाखत देताना अजबच तर्कट मांडले आहे. अर्णव गोस्वामी या पत्रकाराने मुलाखत घेतली होती. रामदेव बाबाच्या अजब तर्कटाची पोलखोल करायला हवी आणि मूलनिवासी संकल्पना काय आहे यावर भाष्य करणारा हा लेख.


सर्वप्रथम या देशात ब्राम्हणी व्यवस्थेविरोधात लढा दिला तो सर्वोत्तम भूमीपुत्र तथागत गौतम बुध्द यांनी. कारण त्यावेळी व्यवस्था ही अल्पजन हिताय व अल्पजन सुखाय होती. ब्राम्हणांचे हित अगोदरच झाले होते. म्हणून बुध्दांनी ‘बहुजन हिताय, बहुजन सुखाय’ चा नारा दिला. बुध्दांच्या तर्कापुढे ब्राम्हणी व्यवस्था हतबल झाली होती. म्हणून रक्ताचा एकही थेंब न सांडता बुध्दांनी क्रांती केली. म्हणजे बुध्दांनी शांतीचा नव्हे तर क्रांतीचा संदेश दिला होता हे अधोरेखित होते. 


बुध्द यांच्यानंतर ही क्रांती ‘वारकरी’ संप्रदायाचा पाया रचून संत नामदेव महाराज यांनी केली. ‘नामदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस’ असे वारकरी संप्रदायाचे वर्णन करताना लिहले पाहिजे. शुद्र-अतिशुद्रांना अधिकार मिळाले पाहिजेत यासाठी नामदेव महाराज, चोखामेळा, सावता माळी, गोरा कुंभार, तुकाराम महाराज यांनी वारकरी संप्रदायाची पताका फडकावत ठेवली. ‘वारकरी’ संप्रदायाने बुध्दस्वरूप पंढरपूरच्या ‘विठ्ठला’ला त्यांनी आराध्य दैवत मानले. आमचा विठ्ठल कसा आहे हे संत नामदेव महाराजांनी अंभगातून सांगितले.


आमुचा विठ्ठल प्रचंड! इतर देवाचे न पाहू तोंड!!
एका विठ्ठलावाचून! न करू आणिक भजन!!
आम्हा एकविध भाव! कदा न म्हणून इतरा देव!!
नित्य करू हा अभ्यास! म्हणे नामा विठूदास!!


विठ्ठलच सर्वांपेक्षा श्रेष्ठ आहे असे नामदेव महाराजांना सांगायचे आहे. त्यांनी ब्राम्हण निर्मित ३३ कोटी देवांना नाकारले. वारकरी संप्रदायाची भगवी पताका ही तथागत बुध्दांकडूनच आलेली आहे.  कारण तथागत बुध्दांचे चिवर हे काषाय केशरी होते. याचा अर्थच भगवा रंग हा मूलनिवासी बहुजनांचा आहे. तोच भगवा पुढे रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्विकारला. 


छत्रपती शिवाजी महाराजांचा लढा देखील ब्राम्हणी व्यवस्थेविरोधातच होता. म्हणून त्यांनी ‘ब्राम्हण म्हणून कोण मुलाहिजा राखितो’ अशी ललकारी देत कृष्णा भास्कर कुलकर्णीचे दोन तुकडे केले होते. ‘मावळा’ या नावाखाली त्यांनी अठरापगड जातीतील लोकांना गोळा करून रयतेचे राज्य निर्माण केले. खर्‍या अर्थाने ‘मूलनिवासी’ या संकल्पनेला जन्म दिला ते राष्ट्रपिता ज्योतीराव फुले यांनी! ‘गुलामगिरी’ या त्यांच्या ग्रंथात ’Indegenious People’ असा शब्दप्रयोग केला आहे. 


ज्योतीराव फुले यांनी ‘शेठजी, भटजी, लाटजी विरूध्द शुद्र-अतिशुद्र’ असा शब्दप्रयोग करत दुश्मन कोण आहे हे दाखवून दिले. त्यापुढे जाऊन पर्याप्त प्रतिनिधीत्वाचे जनक (आरक्षण) करवीर संस्थानात लोकराजे छत्रपती शाहू महाराज यांनी दि. २६ जुलै १९०२ रोजी बहुजनांना ५० टक्के आरक्षण दिले. 


या आरक्षणात ब्राम्हणांना स्थान नाही. या सर्व महापुरूषांचा आदर्श मानून विश्‍वरत्न, महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानात एससी, एसटी, ओबीसी, एनटी, डीएनटी, व्हीजेएनटी यांना पर्याप्त प्रतिनिधीत्व दिले. फुलेंच्या भाषेतील शुद्र-अतिशुद्र हे बाबासाहेबांच्या भाषेत आजचे एससी, एसटी, ओबीसी आहेत. सर्वच मूलनिवासी महापुरूषांचा लढा हा बहुजनांसाठीच होता हे लक्षात येते.


दरम्यान डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे ’Annihilation of Caste’ हे एकच पुस्तक वाचून १९८०-९० च्या दशकात बहुजन महापुरूषांचा लढा बहुजननायक मान्यवर कांशीरामजी यांनी तीव्र केला. सामाजिक अनुभव पणाला लावत कांशीरामजी यांनी ८५ विरूध्द १५ अशी संकल्पना जन्मास घातली. ८५ टक्के म्हणजे एससी, एसटी, ओबीसी व मायनॉरिटी या जातींचा समूह होय. १५ टक्के म्हणजे ब्राम्हण, क्षत्रिय, वैश्य होत. परंतु मान्यवर कांशीरामजी यांच्या संकल्पनेला काऊंटर करण्यासाठी ब्राम्हणी व्यवस्थेने  ‘रामाला मानणारे आणि न मानणारे’ अशी विभागणी केली. म्हणून राम मंदिराचा मुद्दा जाणीवपूर्वक निर्माण करण्यात आला. 


जे रामाला मानत होते ते एससी, एसटी, ओबीसीतील अनेक लोक ब्राम्हणांच्या कळपात शिरले आणि करसेवक या नावाखाली बाबरी मशीद पाडली. त्याचवेळी मंडल आयोगाच्या आंदोलनाला दाबण्यासाठी राम मंदिराचा मुद्दा उपस्थित करून ब्राम्हणांनी कमंडल हाती घ्यायला लावला.


या सर्व बाबींचा विचार करून बामसेफचे संस्थापक सदस्य मान्यवर डी.के.खापर्डे यांनी १९९९ मध्ये ‘मूलनिवासी’ संकल्पनेवर मोठ्या प्रमाणात जोर दिला. त्याचा प्रचार व प्रसार सुरू केला. तेवढ्यात दि. २१ मे २००१ रोजी भारतातील ब्राम्हणांचा डीएनए हा युरेशियन लोकांशी जुळतो असा डीएनएचा अहवाल आला. तशी बातमी टाइम्स ऑफ इंडियाने छापली. युरोप आणि रशियाजनिक काळा समुद्रालगत असलेल्या मोरूआ या जातीशी ब्राम्हणांचा डीएनए जुळतो. याचा अर्थ ब्राम्हण विदेशी आहेत हे सप्रमाण सिध्द झाले आहे. कारण डीएनएला कुठेच चॅलेंज नाही. 


बामसेफने केलेल्या जाणीव जागृतीमुळेच देशभरात आता तर ‘मूलनिवासी’ संकल्पनेने जोर पकडला आहे. त्यातच सोशल मीडियामुळे जास्तच त्याचा फैलाव झाला आहे. म्हणून ब्राम्हणी व्यवस्थेच्या बुडाखाली आग लागली आहे. त्यासाठीच हरियाणातील अहिर-यादव या जाती समूहातील रामदेव बाबासारख्या ओबीसीला पुढे करून ‘मूलनिवासी’ या संकल्पनेवर गरळ ओकायला लावली. कारण ब्राम्हण हा कधीच पुढे येत नसतो. तो एससी, एसटी, ओबीसीच्या खांद्यावर बंदूक ठेवतो आणि आपली पोळी भाजून घेतो.


रायटिंग ऍन्ड स्पिचेसच्या पहिल्या खंडात पान ५२ वर डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, ब्राम्हणांचा हेतू काय राहतो? तो स्वजातीचे हित सांभाळण्याचा असतो. स्वजातीच्या हितासाठीच ब्राम्हण जगतात आणि मरतात. ब्राम्हणांच्या जीवनाचं उद्दीष्टच ‘स्वजाती’चं हित असतं. बाबासाहेबांचे म्हणणे आज तंतोतत लागू पडते आहे. आता ‘मूलनिवासी’ या चक्रव्यूहात ब्राम्हण पुरता अडकला आहे. त्याला बाहेर पडताच येणार नाही. भारतात ‘मूलनिवासी’ विरूध्द ‘युरेशियन ब्राम्हण विदेशी’ असा लढा सुरू झाला आहे. या लढ्यात मूलनिवासींची जीत होणारच आहे. कारण नाग लोकांनी कधीच हार मानलेली नाही हा इतिहास आहे.

दिलीप बाईत
९२७०९६२६९८

संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
अमेरिकन आयोगाची अमित शाहंवर निर्बंध लादण्याची मागणी
पावणे अकरा लाख कोटींचे राज्यावर कर्ज
देशाची वाटचाल ‘मेक इन इंडिया’पासून ‘रेप इन इंडिया’कडे
गरिबानं शिकावं की नाही
५ हजार ४५७ उंदीर मारण्यासाठी रेल्वेकडून दीड कोटी रुपयां
नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाला जगभरातील ७५० शास्त्रज्ञ,
वादग्रस्त नागरिकत्व दुरुस्ती विधेयक लोकसभेत सादर
पीएमओमधील काहींमुळेच अर्थव्यवस्था धोक्यात
नागरिकत्व दुरूस्ती विधेयक हे हिंदू राष्ट्राच्या दिशेने
भारतात गरीब हा गरिबच तर श्रीमंतांचे इमल्यावर इमले!
नागरिकत्व दुरूस्ती विधेयक एससी, एसटी, ओबीसीला गुलाम बनवण
एन्काऊंटर आरोपींचा की कायद्याचा’
उन्नाव बनली यूपीतील ‘बलात्काराची राजधानी’
देवेंद्र फडणवीस यांनी लेखी आदेश न काढल्याने शेतकर्‍यां
भारतात मंदीची समस्या गंभीर, मोदींनी मान्य करायलाच हवी
हैदराबाद एन्काऊंटरची राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडून ग
हैद्राबाद पोलिसांचे कृत्य कायदाविरोधी
वाहन क्षेत्र मंदीच्या खाईत, एक लाख रोजगार बुडाले
भारतात हाताने, डोक्यावरून मैला वाहण्याची प्रथा आजही काय
तेलंगण पोलिसांच्या ७ संशयित एन्काउंटर मोहिमा
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper