×

‘राष्ट्रपती राजवटीच्या आडून घोडेबाजार भरवण्याचे भाजपाचे मनसुबे’

Published On :    16 Nov 2019
साझा करें:

सरकार स्थापनेच्या दाव्यावरुन शिवसेनेची भाजपावर टीका



मुंबई : महाराष्ट्रातला सत्ता स्थापनेचा पेच अद्याप सुटलेला नाही. अशात आता शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस अशा तीन पक्षांचे सरकार महाराष्ट्राला मिळू शकते. मात्र त्यांच्यातल्या वाटाघाटी अजूनही सुरु आहेत. १७ नोव्हेंबरला म्हणजेच बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीच्या दिवशी सरकार स्थापन होणे अवघड आहे हे दस्तुरखुद्द शरद पवार यांनी स्पष्ट केले आहे. 


एवढंच नाही तर अजून बराच वेळ लागेल असेही त्यांनी म्हटले आहे. मात्र शिवसेना सातत्याने मुख्यमंत्री शिवसेनेचाच होईल हे सांगते आहे. या सगळ्या परिस्थितीवर वेट अँड वॉचची भूमिका घेतलेल्या भाजपाने आता सरकार भाजपाचेच येणार असा दावा केला आहे. त्यावर शिवसेनेने कडाडून टीका केली आहे.


सरकार स्थापन करण्यास आम्ही असमर्थ आहोत असं सांगणारे राष्ट्रपती राष्ट्रपती राजवट लागू होताच आता सरकार फक्त आमचेच बरे का! हे कोणत्या तोंडाने सांगत आहेत? राष्ट्रपती राजवटीच्या आड घोडेबाजार भरवण्याचे हे मनसुबे आता उघड झाले आहेत. पुन्हा आमचेच सरकार अशा किंकाळ्यांमुळे महाराष्ट्राच्या कानाचे पडदे फाटत आहेत. अशाने जनतेचे कान बधिर होतील, पण किंकाळ्या मारणार्‍यांचे मानसिक संतुलन बिघडेल का? याची आम्हाला चिंता वाटत असल्याचे शिवसेनेने म्हटले आहे.


राज्यात नवी समीकरणे जुळून येत असल्याने अनेकांना पोटाचे विकार सुरू झाले आहेत. कोण कसे सरकार बनवतो तेच पाहतो अशा प्रकारची अप्रत्यक्ष भाषा व कृती सुरू झाली आहे. सरकार बनवलेच तर ते कसे आणि किती दिवस टिकते ते पाहू असे शाप दिले जात आहेत. सहा महिन्यांच्या वर सरकार टिकणार नाही असे ‘भविष्य’ सांगितले जात आहे. 


हा नवा धंदा लाभदायक असला तरी अंधश्रद्धा कायद्यात मोडतो. स्वतःचे षंढत्व लपवण्यासाठी सुरू झालेले हे उद्योग महाराष्ट्राच्या मुळावर येणारे आहेत. महाराष्ट्राचे आपण मालक आहोत व देशाचे आपण बाप आहोत असे कुणाला वाटत असेल तर त्यांनी या खुळ्या मानसिकतेतून सर्वप्रथम बाहेर पडले पाहिजे. ही मानसिक अवस्था १०५ वाल्यांच्या आरोग्यास धोकादायक आहे. ही स्थिती जास्त काळ राहिली तर मानसिक संतुलन बिघडून वेडेपणाच्या दिशेने त्यांचा प्रवास सुरू होईल.

संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
भाजपा सरकारकडून शालेय शिक्षण निधीमध्ये ३ हजार कोटींची क
जामिनासाठी घातलेल्या अटी शिथिल करण्यासाठी आरोपी डॉक्टर
स्टेट बँकेची १२ हजार कोटींची थकीत कर्जे गायब
जातनिहाय जनगणनेतूनच ओबीसींना न्याय, ओबीसी जनगणना परिषद
नागरिकत्व सुधारणा विधेयकाला बुद्धिजीवी वर्गाचा विरोध
गुजरात दंगलीतून नरेंद्र मोदींना क्लीन चीटची मेहरबानी
आंध्र प्रदेश सरकारचा नवा कायदा, बलात्काराचा खटला १५ दिवस
अमेरिकन आयोगाची अमित शाहंवर निर्बंध लादण्याची मागणी
पावणे अकरा लाख कोटींचे राज्यावर कर्ज
देशाची वाटचाल ‘मेक इन इंडिया’पासून ‘रेप इन इंडिया’कडे
गरिबानं शिकावं की नाही
५ हजार ४५७ उंदीर मारण्यासाठी रेल्वेकडून दीड कोटी रुपयां
नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाला जगभरातील ७५० शास्त्रज्ञ,
वादग्रस्त नागरिकत्व दुरुस्ती विधेयक लोकसभेत सादर
पीएमओमधील काहींमुळेच अर्थव्यवस्था धोक्यात
नागरिकत्व दुरूस्ती विधेयक हे हिंदू राष्ट्राच्या दिशेने
भारतात गरीब हा गरिबच तर श्रीमंतांचे इमल्यावर इमले!
नागरिकत्व दुरूस्ती विधेयक एससी, एसटी, ओबीसीला गुलाम बनवण
एन्काऊंटर आरोपींचा की कायद्याचा’
उन्नाव बनली यूपीतील ‘बलात्काराची राजधानी’
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper