×

संस्कृत प्राध्यापकपदी मुस्लीम व्यक्तीच्या नेमणुकीस अभाविपचा विरोध

Published On :    16 Nov 2019
साझा करें:

सर्वाना समान संधी देण्याचे धोरण असल्याचे बनारस विद्यापीठाचे स्पष्टीकरण



नवी दिल्ली : बनारस हिंदू विद्यापीठाच्या संस्कृत विभागात सहायक प्राध्यापकपदी मुस्लीम व्यक्तीची नेमणूक करण्याच्या निर्णयाचे प्रशासनाने शुक्रवारी समर्थन केले. धर्म, जात, समुदाय व लिंगभेद न करता सर्वाना समान संधी देण्याचे आमचे धोरण आहे असे प्रशासनाने म्हटले आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने संस्कृत साहित्य विभागात सहायक प्राध्यापकपदी फिरोझ खान यांच्या नेमणुकीस विरोध केला होता. त्यावर विद्यापीठाने शुक्रवारी स्पष्टीकरण केले आहे.


बनारस हिंदू विद्यापीठाने म्हटले आहे, की संबंधित व्यक्तीची निवड ही एका समितीने एकमताने केलेली असून विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे त्यात पालन करण्यात आले आहे. निवड समितीच्या अध्यक्षपदी कुलगुरू राकेश भटनागर होते. त्यांच्या नेतृत्वाखाली निवड समितीची बैठक ५ नोव्हेंबरला झाली होती, त्यात फिरोझ खान यांच्या नेमणुकीची शिफारस करण्यात आली होती. 


खान यांची नियुक्ती संस्कृत साहित्य विभागात केल्याने काही विद्यार्थ्यांनी कुलगुरूंच्या कार्यालयाबाहेर धरणे आंदोलन केले होते. कुलगुरू व इतर वरिष्ठ अधिकारी यांनी गुरुवारी निदर्शकांच्या प्रतिनिधींशी दोन तास चर्चा केली. शैक्षणिक व अध्यापन पातळीवर सर्वांनाच जात, धर्म, लिंग भेद न करता सर्वाना समान संधी देण्याचे विद्यापीठाचे धोरण आहे, असे स्पष्टीकरण कुलगुरू भटनागर यांनी दिले. ‘बनारस हिंदू विद्यापीठ कायद्या’चे तंतोतंत पालन  आम्ही केले आहे. विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेऊन सहकार्य करावे असे त्यांनी म्हटले आहे. या विद्यार्थ्यांनी जे प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यावर घटनात्मक व कायदेशीर मत मागवले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

जेएनयूतील पुतळ्याच्या विटंबनेबाबत तक्रार
जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या आवारात अनावरणही न झालेल्या स्वामी विवेकानंद पुतळ्याच्या पायाशी आक्षेपार्ह संदेश लिहून ठेवण्याच्या प्रकाराबाबत प्रशासनाने पोलिसात तक्रार दाखल केली आहे. विद्यापीठात काही जण गुंडागर्दी करून वातावरण बिघडवित असल्याचा आरोप तक्रारीत केला आहे. कुलगुरू एम. जगदीश कुमार यांनी सांगितले की, गुरुवारी रात्री अकरा वाजता तक्रार दाखल करण्यात आली असून त्यात चित्रफीत व छायाचित्रांचे पुरावे देण्यात आले आहेत. पोलिसांनी शुक्रवारी सांगितले की, त्यांना तक्रार मिळाली असून त्यावर शहानिशा करण्यात येत आहे.

संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
भाजपा सरकारकडून शालेय शिक्षण निधीमध्ये ३ हजार कोटींची क
जामिनासाठी घातलेल्या अटी शिथिल करण्यासाठी आरोपी डॉक्टर
स्टेट बँकेची १२ हजार कोटींची थकीत कर्जे गायब
जातनिहाय जनगणनेतूनच ओबीसींना न्याय, ओबीसी जनगणना परिषद
नागरिकत्व सुधारणा विधेयकाला बुद्धिजीवी वर्गाचा विरोध
गुजरात दंगलीतून नरेंद्र मोदींना क्लीन चीटची मेहरबानी
अमेरिकन आयोगाची अमित शाहंवर निर्बंध लादण्याची मागणी
पावणे अकरा लाख कोटींचे राज्यावर कर्ज
देशाची वाटचाल ‘मेक इन इंडिया’पासून ‘रेप इन इंडिया’कडे
गरिबानं शिकावं की नाही
५ हजार ४५७ उंदीर मारण्यासाठी रेल्वेकडून दीड कोटी रुपयां
नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाला जगभरातील ७५० शास्त्रज्ञ,
वादग्रस्त नागरिकत्व दुरुस्ती विधेयक लोकसभेत सादर
पीएमओमधील काहींमुळेच अर्थव्यवस्था धोक्यात
नागरिकत्व दुरूस्ती विधेयक हे हिंदू राष्ट्राच्या दिशेने
भारतात गरीब हा गरिबच तर श्रीमंतांचे इमल्यावर इमले!
नागरिकत्व दुरूस्ती विधेयक एससी, एसटी, ओबीसीला गुलाम बनवण
एन्काऊंटर आरोपींचा की कायद्याचा’
उन्नाव बनली यूपीतील ‘बलात्काराची राजधानी’
देवेंद्र फडणवीस यांनी लेखी आदेश न काढल्याने शेतकर्‍यां
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper