×

भाजपवर टाटा झाले मेहरबान; ३५० कोटींची दिली देणगी

Published On :    15 Nov 2019
साझा करें:

केंद्रीय निवडणूक आयोगाला सर्व राजकीय पक्ष त्यांना मिळालेल्या देणग्यांची यादी पाठवत असतात. त्यातून ही माहिती बाहेर आली आहे.



नवी दिल्ली : २०१८-१९ या एक वर्षांत भाजपला देणगीच्या रुपात ७०० कोटी रु. हून अधिक रक्कम मिळाली. यातील सुमारे ३५६ कोटी रु.ची रक्कम देणगीच्या स्वरुपात टाटा समूहाच्या नियंत्रणातील ‘द प्रोगेसिव्ह इलेक्टोरल ट्रस्ट’कडून मिळाल्याची माहिती आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाला सर्व राजकीय पक्ष त्यांना मिळालेल्या देणग्यांची यादी पाठवत असतात. त्यातून ही माहिती बाहेर आली आहे. २० हजार रु.हून अधिक रक्कम मिळालेल्या देणगीदारांची नावे आयोगाला कळवणे हे सक्तीचे असते.


इंडियन एक्स्प्रेसमध्ये आलेल्या वृत्तानुसार २०१८-१९मध्ये भाजपला विविध कंपन्यांच्या निवडणूक ट्रस्टकडून ४७० कोटी रु. देणगीच्या रुपात मिळाले होती तर २०१७-१८ मध्ये ही रक्कम १६७.८० कोटी रु. इतकी होती.
देशातल्या अनेक बड्या कंपन्या आपल्या वार्षिक उलाढालीतील काही हिस्सा राजकीय पक्षांना देणगीच्या रुपात देत असतात. 


ही रक्कम देण्यासाठी ते स्वत:चा निवडणूक ट्रस्ट स्थापन करतात. हे ट्रस्ट समाजातील धनिक मंडळी, कॉर्पोरेट कंपन्या यांच्याकडूनही पैसा उभा करत असतात. भारतात प्रुडंट इलेक्ट्रोरल ट्रस्टकडून भाजपला ६७ कोटी ३० लाख रु. देणगी मिळाली आहे. या ट्रस्टला देणगी देणार्‍यांमध्ये भारतीय एअरटेल समूह अग्रेसर असून त्यानंतर हीरो मोटोकॉर्प, ज्युबिलंट फूडवर्क्स, ओरिएंट सिमेंट, डीएलएफ, जेके टायर्स अशा कंपन्यांचा समावेश आहे.


भाजपच्या तुलनेत कॉंग्रेसला विविध निवडणूक ट्रस्टकडून फार कमी रक्कम मिळाली आहे. २०१८-१९ मध्ये कॉंग्रेसला ९० कोटी रु. मिळाले आहेत. भाजपला ३५६ कोटी रु.ची देणगी देणार्‍या टाटा समूह नियंत्रित ‘द प्रोग्रेसिव्ह इलेक्टोरल ट्रस्ट’कडून कॉंग्रेसला फक्त ५५ कोटी रु. मिळाले आहेत. त्याचबरोबर प्रुडंट इलेक्टोरल ट्रस्टकडून ३९ कोटी रु., आदित्य बिर्ला जनरल इलेक्टोरल ट्रस्टने भाजपला २८ कोटी रु. दिले आहेत तर कॉंग्रेसला २ कोटी रु. दिले आहेत.

संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
अमेरिकन आयोगाची अमित शाहंवर निर्बंध लादण्याची मागणी
पावणे अकरा लाख कोटींचे राज्यावर कर्ज
देशाची वाटचाल ‘मेक इन इंडिया’पासून ‘रेप इन इंडिया’कडे
गरिबानं शिकावं की नाही
५ हजार ४५७ उंदीर मारण्यासाठी रेल्वेकडून दीड कोटी रुपयां
नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाला जगभरातील ७५० शास्त्रज्ञ,
वादग्रस्त नागरिकत्व दुरुस्ती विधेयक लोकसभेत सादर
पीएमओमधील काहींमुळेच अर्थव्यवस्था धोक्यात
नागरिकत्व दुरूस्ती विधेयक हे हिंदू राष्ट्राच्या दिशेने
भारतात गरीब हा गरिबच तर श्रीमंतांचे इमल्यावर इमले!
नागरिकत्व दुरूस्ती विधेयक एससी, एसटी, ओबीसीला गुलाम बनवण
एन्काऊंटर आरोपींचा की कायद्याचा’
उन्नाव बनली यूपीतील ‘बलात्काराची राजधानी’
देवेंद्र फडणवीस यांनी लेखी आदेश न काढल्याने शेतकर्‍यां
भारतात मंदीची समस्या गंभीर, मोदींनी मान्य करायलाच हवी
हैदराबाद एन्काऊंटरची राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडून ग
हैद्राबाद पोलिसांचे कृत्य कायदाविरोधी
वाहन क्षेत्र मंदीच्या खाईत, एक लाख रोजगार बुडाले
भारतात हाताने, डोक्यावरून मैला वाहण्याची प्रथा आजही काय
तेलंगण पोलिसांच्या ७ संशयित एन्काउंटर मोहिमा
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper