×

एका दिवसात चित्रपट १०० कोटी कमवतात; मग आर्थिक मंदी कसली?

Published On :    13 Oct 2019
साझा करें:

केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांचा अजब सवाल



मुंबई : देशात आर्थिक मंदीची लाट येत असल्याचं निरिक्षण अनेकांनीच वर्तवलं असताना केंद्रीय मंत्री मात्र या परिस्थितीवर अतिशय वेगळं मत आहे. केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी भारतीय अर्थव्यवस्था अगदी सुरळीतपणे कार्यरत असल्याचं मत शनिवारी मांडलं. यावेळी त्यांनी आपल्या या वक्तव्याचा सिध्द करण्यासाठी म्हणून एक अजब उदाहरणही दिलं.


आगामी विधानसभा निवडणुकांच्या निमित्ताने सुरु असणार्‍या भाजपाच्या प्रचारादरम्यान मुंबईत त्यांनी हे वक्तव्य केलं. तीन चित्रपटांच्या कमाईचा आधार घेत यातून मात्र अर्थव्यवस्थेचं वेगळं चित्र समोर येत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. २ ऑक्टोबर या सुट्टीच्या दिवशी तीन हिंदी चित्रपटांनी जवळपास १२० कोटींचा गल्ला जमवला. आता अर्थव्यवस्था सुरळीत नसल्याशिवाय फक्त या तीन चित्रपटांनी अवघ्या एकाच दिवसात इतकी कमाई कशी केली?’, असं ते म्हणाले.


पाच वर्षांमध्ये देशाची अर्थव्यस्था मंदीच्या वाटेवर असल्याचं काही दिवसांपूर्वीच समोर आलं. ज्यानंतर काहीजण बेरोजगारीच्या मुद्याचा वापर करत जनतेची दिशाभूल करत आहेत. ’आम्ही सर्वांना सरकारी नोकर्‍या देऊ असं कधीच म्हटलं नव्हतं’, असं म्हणत रवीशंकर प्रसाद यांनी हात झटकले.


करदात्यांच्या संख्येत दुपटीने वाढ झाल्याचं सांगत जागतिक मंदीच्या काळातही देशाची आर्थिक वाटचाल ही ६ टक्क्यांहून अधिक इतक्या गतीने होत असल्याचं वक्तव्य त्यांनी केलं. त्यांच्या या वक्तव्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या, तर काहींचं लक्ष पुन्हा एकदा देशाच्या अर्थव्यवस्थेकडे वेधलं गेलं.  

संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
‘असं वाटतं मरु तर बरं, पण मरायची नाय...’
देशातील ९ दशलक्ष कामगारांचा रोजगार बुडाला, अझिम प्रेमजी
सर्वोच्च न्यायालयाची बंदी असताना भाजपच्या कार्यालयाचे
एनडीए कोणाची जहागीर नाही, संजय राऊत यांची परखड प्रतिक्रि
‘मूलनिवासी’ संकल्पना आणि ‘रामदेव बाबा’चे अजब तर्कट
मुंबईचे पाणी देशात सर्वाधिक शुद्ध
केंद्रातील भाजपा सरकारला लागले भिकेचे डोहाळे
कॉपी, पेस्टची चूक ईडीवर भारी, सर्वोच्च न्यायालयाने फेटाळ
एनआरसी हे भारतातील मुस्लिमांना बाहेर काढण्याचे हत्यार
संतापजनक! अनु.जातीच्या तरुणाला मारहाण करून मुत्रप्राशन
संस्कृत प्राध्यापकपदी मुस्लीम व्यक्तीच्या नेमणुकीस अभ
देशात लग्न होतायंत, ट्रेनला गर्दी आहे, मग कसली आली मंदी?
‘राष्ट्रपती राजवटीच्या आडून घोडेबाजार भरवण्याचे भाजपा
दिल्लीत होणार्‍या एनडीएच्या बैठकीला शिवसेना अनुपस्थित
क्लीनचीट मिळाली तरी सीबीआय राफेल प्रकरणात एफआयआर नोंदव
बनारस हिंदू विद्यापीठात आरएसएसच्या दादागिरीचा नमुना आल
भारतात मुस्लिम विरोधी अजेंडे रडारवर
सुन्नी बोर्ड घेत आहे कायदेशीर सल्ला
अमेरिकी माजी सैनिक विभागाला भारतीय व्यक्तीने लावला चुन
हवामान बदलाचा भारतीय बालकांना आजीवन धोका, ‘लॅन्सेट’ विज
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper