×

केंद्र सरकार तीन सरकारी कंपन्यांच्या भागभांडवलाची करणार विक्री

Published On :    13 Oct 2019
साझा करें:

सरकारने मागितल्या निविदा, ३० टक्के हिस्सा विकणार



नवी दिल्ली : केंद्र सरकारने कंटेनर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (सीएनसीओआर), एनईईपीसीओ आणि टीएचडीसी इंडिया या तीन सरकारी कंपन्यांच्याभागभांडवलाची विक्री करणार आहे. यासाठी सरकारने निविदा मागविल्या आहेत.


केंद्रीय मंत्रिमंडळाने कॉनकॉरमधील ३० टक्के हिस्सा विकण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली. सरकारकडे सध्या कंपनीत ५४.८० टक्के हिस्सा आहे. हिस्सेदारी विक्रीनंतर सरकार कंपनीवरील व्यवस्थापकीय नियंत्रण गमावणार आहे. त्याशिवाय एनएचटीसी इंडिया आणि टीएचडीसी इंडिया आणि ईशान्येकडील इलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन या कंपन्यांमधील उर्जा विक्रीसाठी एनटीपीसीला मान्यता देण्यात आली आहे.


केंद्र आणि उत्तर प्रदेश सरकार यांच्यात टीएचडीसी एक ७५-२५ गुणोत्तर संयुक्त उपक्रम आहे. निपकोमध्ये केंद्र सरकारची १०० टक्के भागीदारी आहे. कॉनकोरचे नाव न घेता स्वतंत्र नोटिसामध्ये सरकारने म्हटले आहे की, रेल्वे मंत्रालयाच्या अखत्यारीत असलेल्या सरकारी कंपनीतील एकूण पेड-अप इक्विटी भागभांडवलाचे अंशतः निर्गुंतवणूक करण्याचा विचार सरकार करीत आहे.


गुंतवणूक आणि सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन विभागाच्या संकेतस्थळावर दिलेल्या आकडेवारीनुसार, चालू आर्थिक वर्षात निर्गुंतवणुकीतून सरकारने १.०५ लाख कोटी रुपये उभे करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. सरकार आतापर्यंत निर्गुंतवणुकीतून १२ हजार ३५७.४९ कोटी रुपये जमा करू शकली आहे. ३१ मार्च २०२० रोजी संपणार्‍या आर्थिक वर्षात सरकारच्या जीडीपीच्या ३.३ टक्के वित्तीय तूट पूर्ण करण्यासाठी निर्गुंतवणूक प्रक्रिया महत्त्वपूर्ण ठरणार आहे.


विक्रीत दोन-टप्प्यांचा लिलाव प्रक्रिया होईल, ज्याची सुरुवात एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्टने होईल. यानंतर अंतिम बोली लावण्यात येईल. भागभांडवल विक्रीची ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी अंदाजे ४-५ महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे.


या व्यतिरिक्त केंद्रीय मंत्रिमंडळाने भारत सरकारच्या एकूण ५३.२९ टक्के आणि शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या ६३.७५ टक्के भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (बीपीसीएल) मध्ये विक्री करण्यास सहमती दर्शविली आहे. २०१६ मध्ये सरकारने बीपीसीएलचा राष्ट्रीयकरण कायदा रद्द केला होता. 


अशा परिस्थितीत बीपीसीएल खासगी किंवा विदेशी कंपन्यांना विकण्यासाठी संसदेची परवानगी घेण्याची गरज भासणार नाही. देशांतर्गत इंधन किरकोळ व्यवसायात बहुराष्ट्रीय कंपन्यांना आणायचे आहे, जेणेकरून स्पर्धा वाढेल. हे लक्षात घेता सरकार बीपीसीएलमधील आपला संपूर्ण ५३.३ टक्के हिस्सा विकण्याची तयारी करत आहे. सार्वजनिक क्षेत्रातील या पाच उपक्रमांच्या निर्गुंतवणुकीमुळे सार्वजनिक तिजोरीत अंदाजे ६० हजार कोटी रुपये येणार आहेत.

संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
एनडीए कोणाची जहागीर नाही, संजय राऊत यांची परखड प्रतिक्रि
‘मूलनिवासी’ संकल्पना आणि ‘रामदेव बाबा’चे अजब तर्कट
मुंबईचे पाणी देशात सर्वाधिक शुद्ध
केंद्रातील भाजपा सरकारला लागले भिकेचे डोहाळे
संतापजनक! अनु.जातीच्या तरुणाला मारहाण करून मुत्रप्राशन
संस्कृत प्राध्यापकपदी मुस्लीम व्यक्तीच्या नेमणुकीस अभ
देशात लग्न होतायंत, ट्रेनला गर्दी आहे, मग कसली आली मंदी?
‘राष्ट्रपती राजवटीच्या आडून घोडेबाजार भरवण्याचे भाजपा
दिल्लीत होणार्‍या एनडीएच्या बैठकीला शिवसेना अनुपस्थित
क्लीनचीट मिळाली तरी सीबीआय राफेल प्रकरणात एफआयआर नोंदव
बनारस हिंदू विद्यापीठात आरएसएसच्या दादागिरीचा नमुना आल
भारतात मुस्लिम विरोधी अजेंडे रडारवर
सुन्नी बोर्ड घेत आहे कायदेशीर सल्ला
अमेरिकी माजी सैनिक विभागाला भारतीय व्यक्तीने लावला चुन
हवामान बदलाचा भारतीय बालकांना आजीवन धोका, ‘लॅन्सेट’ विज
भाजपवर टाटा झाले मेहरबान; ३५० कोटींची दिली देणगी
बदलत्या जगात वेगवान परराष्ट्र धोरण आवश्यक, परराष्ट्रमं
आरएसएसचा ड्रेसकोड आणि संगीतवाद्य विदेशी
पुढची २५ वर्ष शिवसेनेचाच मुख्यमंत्री असेल
चार वर्षांत दोन तृतीयांश दूरसंचार कंपन्या बंद
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper