×

माहिती सार्वजनिक करण्याचे आमिष दाखवून सरकार घालणार कुलंगड्यांवर पांघरूण, केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा आरटीआयवर अति‘शहा’णपणाचा उतारा

Published On :    12 Oct 2019
साझा करें:

सरकारचे घोटाळे, भ्रष्टाचार व कुलंगड्यांवर पांघरूण घालण्यासाठी केंद्र सरकार पुढे सरसावले असून आरटीआयचा वापर कमी करण्यासाठी पावले उचलण्यात येत आहेत. जास्तीत जास्त माहिती सार्वजनिक करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सरकारकडून आमिष दाखवण्यात आले आहे.



नवी दिल्ली: सरकारचे घोटाळे, भ्रष्टाचार व कुलंगड्यांवर पांघरूण घालण्यासाठी केंद्र सरकार पुढे सरसावले असून आरटीआयचा वापर कमी करण्यासाठी पावले उचलण्यात येत आहेत. जास्तीत जास्त माहिती सार्वजनिक करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सरकारकडून आमिष दाखवण्यात आले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आरटीआयवर अशा प्रकारचा अति‘शहा’णपणाचा उतारा दिल्याने आरटीआय कायकर्त्यांमध्ये तीव्र नाराजीचा सूर उमटला आहे. नवी दिल्लीत केंद्रीय माहिती आयोगाच्या १४ व्या वार्षिक अधिवेशनात ते बोलत होते.


शहा म्हणाले, जगातील सर्व देशांनी माहिती अधिकार कायदा तयार केल्यानंतर तो बंद केला आहे. या देशांना असं वाटतंय की त्यांनी त्यांची जबाबदारी पार पाडली आहे. मात्र, भारत सरकारने असा विचार केलेला नाही. मोदी सरकारला याबाबत एक अशी व्यवस्था बनवायची आहे, ज्यामुळे आरटीआयचे प्रमाण कमी होईल. कोणालाही आरटीआयद्वारे अर्ज करण्याची गरज पडणार नाही.


आरटीआयअंतर्गत किती अर्ज दाखल झाले त्यात सरकारचे यश अवलंबून नसते. यावर सरकारचे यश यावर अवलंबून असते जेव्हा सरकार एक अशी यंत्रणा तयार करते ज्यामुळे आरटीआय अंतर्गत किती कमी प्रमाणात अर्ज दाखल होतात. या यंत्रणेच्या माध्यमातून सरकारने स्वतःहून सर्व माहिती लोकांसाठी उपलब्ध करुन द्यायला हवी, त्यामुळे लोकांना आरटीआयमधून अर्ज करावासाच वाटणार नाही.


२००५ मध्ये जेव्हा माहिती अधिकाराचा कायदा अस्तित्वात आला या काळात जनता आणि प्रशासन यांच्यामध्ये एक दरी होती. मात्र, आरटीआयद्वारे गेल्या १४ वर्षात ही दरी कमी करण्यासाठी मोठे काम करण्यात आले. त्यामुळे उत्तरदायित्व आणि पारदर्शी कामासाठी आरटीआयचा कायदा आवश्यक आहे असे सांगतानाच त्याचा वापर मात्र कमी झाला पाहिजे ही शहांची भूमिका दुटप्पीपणाचा म्हणावा लागेल अशा प्रतिक्रिया लोक व्यक्त करीत आहेत. 

संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
‘असं वाटतं मरु तर बरं, पण मरायची नाय...’
देशातील ९ दशलक्ष कामगारांचा रोजगार बुडाला, अझिम प्रेमजी
सर्वोच्च न्यायालयाची बंदी असताना भाजपच्या कार्यालयाचे
एनडीए कोणाची जहागीर नाही, संजय राऊत यांची परखड प्रतिक्रि
‘मूलनिवासी’ संकल्पना आणि ‘रामदेव बाबा’चे अजब तर्कट
मुंबईचे पाणी देशात सर्वाधिक शुद्ध
केंद्रातील भाजपा सरकारला लागले भिकेचे डोहाळे
कॉपी, पेस्टची चूक ईडीवर भारी, सर्वोच्च न्यायालयाने फेटाळ
एनआरसी हे भारतातील मुस्लिमांना बाहेर काढण्याचे हत्यार
संतापजनक! अनु.जातीच्या तरुणाला मारहाण करून मुत्रप्राशन
संस्कृत प्राध्यापकपदी मुस्लीम व्यक्तीच्या नेमणुकीस अभ
देशात लग्न होतायंत, ट्रेनला गर्दी आहे, मग कसली आली मंदी?
‘राष्ट्रपती राजवटीच्या आडून घोडेबाजार भरवण्याचे भाजपा
दिल्लीत होणार्‍या एनडीएच्या बैठकीला शिवसेना अनुपस्थित
क्लीनचीट मिळाली तरी सीबीआय राफेल प्रकरणात एफआयआर नोंदव
बनारस हिंदू विद्यापीठात आरएसएसच्या दादागिरीचा नमुना आल
भारतात मुस्लिम विरोधी अजेंडे रडारवर
सुन्नी बोर्ड घेत आहे कायदेशीर सल्ला
अमेरिकी माजी सैनिक विभागाला भारतीय व्यक्तीने लावला चुन
हवामान बदलाचा भारतीय बालकांना आजीवन धोका, ‘लॅन्सेट’ विज
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper