×

एक गुंडाला तर दुसरा राजकीय पक्ष महागुंडाला निवडणूक मैदानात उतरवतो

Published On :    12 Oct 2019
साझा करें:

माजी मुख्य निवडणूक आयुक्त एस.वाय. कुरेशी यांचा राजकीय पक्षांवर निशाणा



नवी दिल्ली : अपराधी व आरोपी असणार्‍यांना निवडणूक लढवायला बंदी घालावी अशी मागणी करणारे माजी मुख्य निवडणूक आयुक्त एस.वाय.कुरेशी यांनी पुन्हा एकदा राजकीय पक्षांवर निशाणा साधला आहे. एक गुंडाला तर दुसरा राजकीय पक्ष महागुंडाला निवडणूक मैदानात उतरवतो अशा शब्दात त्यांनी फटकारले आहे. 


असोसिएशन फॉर डेमॉक्रॅटिक रिफॉर्म्स (एडीआर) आणि नॅशनल इलेक्शन वॉच(एनईडब्ल्यू) यांनी आयोजित केलेल्या चर्चेत त्यांनी आपले मत व्यक्त केले. या चर्चेत त्यांच्यासोबत माजी मुख्य निवडणूक आयुक्त नसीम झैदी, ज्येष्ठ पत्रकार आणि संशोधक सहभागी झाले होते. या लोकांनी भारतातील निवडणुकीच्या राजकारणावर विविध कंगोरे स्पष्ट केले.


ते म्हणाले, भारतात निवडणुका स्पर्धात्मक होत चालल्या आहेत. निवडणुकीत अपराधी, आरोपी, धनदांडग्यांचा वरचष्मा वाढला आहे. खासदार आणि आमदार दोषी ठरल्यानंतरही सत्तेची मजा घेतात. केवळ दोषी नेत्यालाच नव्हे तर ज्यांच्याविरोधात आरोप आहेत त्यांना निवडणूक लढवण्यास मनाई केली पाहिजे.


कुरेशी म्हणाले, गुन्हा सिध्द झाल्याशिवाय आपण दोषी नाही असे राजकीय नेत्यांना वाटते. परंतु भारतीय कारागृहांमध्ये चार लाखांहून अधिक गुन्हेगार आहेत. त्यातील ७० टक्के खटले सुरू आहेत. ते दोषी नाहीत याचा अर्थ ते निर्दोष आहेत. 


आपण त्यांचे चार मूलभूत अधिकार काढून घेतले आहेत. त्यामध्ये स्वातंत्र्याचा हक्क, भ्रमण करण्याचा अधिकार, काम करण्याचा आणि सन्मानाचा अधिकार आपण काढले आहेत. खटला सुरू असलेल्या लोकांचे चार मूलभूत अधिकार आपण काढून घेऊ शकता. परंतु आपण त्यांना निवडणुका लढण्यापासून रोखू शकत नाही.


ते म्हणाले, गुन्हेगारांना निवडणूक लढण्यापासून रोखण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने संसदेला कायदे करण्यास सांगितले आहे.  १९३ गुन्हेगारी खासदारांना असे विधेयक मंजूर करण्यास सांगण्यात आले आहे. म्हणजे मूर्खांच्या नंदनवनात वावरण्यासारखे आहे.


धनिक दांडग्या उमेदवारांची निवड आणि निवडणूक लढविण्याबाबत ते म्हणाले, जेव्हा निवडणुका अत्यंत स्पर्धात्मक ठरतात तेव्हा निवडणूक प्रक्रियेत गुन्हेगारी आणि धनदांडग्यांची भूमिका वाढते. याशिवाय गुन्हेगारांना अधिक शक्तिशाली होण्याचा सोपा मार्ग म्हणजे राजकारणात प्रवेश करणे होय. 


ज्यांच्याकडे निवडणुका जिंकण्याची क्षमता आहे त्यांनाच तिकीट देण्यात येते अशी राजकीय पक्षांची भूमिका असते. म्हणजे जिंकण्याची शक्यता कमी असलेल्या सभ्य माणसाला राजकीय पक्ष तिकीट देत नाहीत. जेव्हा एक राजकीय पक्ष गुंड मैदानात उतरवतो तेव्हा दुसरा राजकीय पक्ष महागुंडाला मैदानात उतरवतो अशी आजच्या राजकारणाची व्याख्या झाल्याचे कुरेशी यांनी स्पष्ट केले. 

संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
एनडीए कोणाची जहागीर नाही, संजय राऊत यांची परखड प्रतिक्रि
‘मूलनिवासी’ संकल्पना आणि ‘रामदेव बाबा’चे अजब तर्कट
मुंबईचे पाणी देशात सर्वाधिक शुद्ध
केंद्रातील भाजपा सरकारला लागले भिकेचे डोहाळे
संतापजनक! अनु.जातीच्या तरुणाला मारहाण करून मुत्रप्राशन
संस्कृत प्राध्यापकपदी मुस्लीम व्यक्तीच्या नेमणुकीस अभ
देशात लग्न होतायंत, ट्रेनला गर्दी आहे, मग कसली आली मंदी?
‘राष्ट्रपती राजवटीच्या आडून घोडेबाजार भरवण्याचे भाजपा
दिल्लीत होणार्‍या एनडीएच्या बैठकीला शिवसेना अनुपस्थित
क्लीनचीट मिळाली तरी सीबीआय राफेल प्रकरणात एफआयआर नोंदव
बनारस हिंदू विद्यापीठात आरएसएसच्या दादागिरीचा नमुना आल
भारतात मुस्लिम विरोधी अजेंडे रडारवर
सुन्नी बोर्ड घेत आहे कायदेशीर सल्ला
अमेरिकी माजी सैनिक विभागाला भारतीय व्यक्तीने लावला चुन
हवामान बदलाचा भारतीय बालकांना आजीवन धोका, ‘लॅन्सेट’ विज
भाजपवर टाटा झाले मेहरबान; ३५० कोटींची दिली देणगी
बदलत्या जगात वेगवान परराष्ट्र धोरण आवश्यक, परराष्ट्रमं
आरएसएसचा ड्रेसकोड आणि संगीतवाद्य विदेशी
पुढची २५ वर्ष शिवसेनेचाच मुख्यमंत्री असेल
चार वर्षांत दोन तृतीयांश दूरसंचार कंपन्या बंद
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper